सेन्सेक्स आज ५८१ अंकांच्या घसरणीसह ७८,८८६ वर बंद झाला. File photo
अर्थभान

शेअर बाजार पुन्हा अस्थिर! सेन्सेक्स ५८१ अंकांनी घसरून बंद

Stock Market Closing Bell | मेटल शेअर्समध्ये मोठी घसरण

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या रेपो दर ६.५ टक्के एवढा जैसे थे ठेवण्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आज गुरुवारी (दि.८) भारतीय शेअर बाजारात अस्थिरता दिसून आली. सेन्सेक्स (Sensex) आज ५८१ अंकांच्या घसरणीसह ७८,८८६ वर बंद झाला. तर निफ्टी (Nifty) १८० अंकांनी घसरून २४,११७ वर स्थिरावला. आजच्या सत्रात मेटल शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. (Stock Market Closing Bell)

बाजारातील ठळक घडामोडी

  • सेन्सेक्स ५८१ अंकांच्या घसरणीसह ७८,८८६ वर बंद.

  • निफ्टी १८० अंकांनी घसरून २४,११७ वर स्थिरावला.

  • मेटल शेअर्स गडगडले, निफ्टी मेटल १.७ टक्क्यांनी घसरला.

  • फार्मा, हेल्थकेअर, मीडिया वगळता इतर सर्व निर्देशांक लाल रंगात बंद.

  • बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.४ टक्क्यांनी घसरला.

  • स्मॉलकॅप निर्देशांक सपाट पातळीवर बंद.

क्षेत्रीय निर्देशांकात फार्मा, हेल्थकेअर आणि मीडिया वगळता इतर सर्व निर्देशांक लाल रंगात बंद झाले. मेटल, रियल्टी, ऑईल आणि गॅस, आयटी १ ते २ टक्क्यांनी घसरले. बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.४ टक्क्यांनी घसरला. स्मॉलकॅप निर्देशांक सपाट पातळीवर बंद झाला.

गुंतवणूकदारांचे २.७९ लाख कोटी बुडाले

बाजारातील घसरणीमुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ८ ऑगस्ट रोजी ४४५.७८ लाख कोटींवर पोहोचले. याआधीच्या सत्रात बुधवारी ७ ऑगस्ट रोजी बाजार भांडवल ४४८.५७ लाख कोटी होते. याचाच अर्थ आज बीएसई सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलात २.७९ रुपयांची घट झाली आहे.

Sensex Today : एशियन पेंट्सचा शेअर्स ३ टक्क्यांनी घसरला.

सेन्सेक्सवर आज चढ-उतार दिसून आला. सेन्सेक्सवर एशियन पेंट्स, इन्फोसिस, जेएसडब्ल्यू स्टील, एलटी, अल्ट्राटेक सिमेंट, पॉवर ग्रिड, एचसीएल टेक, टाटा स्टील, एनटीपीसी, बजाज फायनान्स हे शेअर्स २ त ३ टक्क्यांनी घसरले. तर टाटा मोटर्स, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल हे शेअर्स तेजीत राहिले.

सेन्सेक्सवर आज चढ-उतार दिसून आला.

निफ्टीवर LTIMindtree शेअर्सची ४ टक्क्यांची घसरण

निफ्टीवर LTIMindtree चा शेअर्स ४ टक्क्यांनी घसरुन बंद झाला. त्याचबरोबर ग्रासीम, एशियन पेंट्स, अपोलो हॉस्पिटल, इन्फोसिस हे शेअर्सही प्रत्येकी ३ टक्क्यांनी घसरले. तर टाटा मोटर्स, एचडीएफसी लाईफ, एसबीआय लाईफ, सिप्ला, एचडीएफसी बँक हे शेअर्स १ ते २ टक्क्यांपर्यंत वाढले.

निफ्टी ५० चा आजचा ट्रेडिंग आलेख.

सलग नवव्यांदा रेपो दरात बदल नाही

भारतीय रिझर्व्ह बँकने (RBI) रेपो रेटमध्ये (repo rate) कोणताही बदल न करता तो सलग नवव्यांदा ६.५ टक्के एवढा कायम ठेवला आहे. याबाबतचा निर्णय आज गुरुवारी (दि.८) आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास (RBI governor Shaktikanta Das) यांनी पतविषयक धोरण (RBI monetary policy) बैठकीनंतर जाहीर केला. गेल्या काही महिन्यांपासून किरकोळ महागाई उच्चांकी पातळीवर राहत असल्याने रेपो दरही आरबीआयने ६.५ टक्क्यांवर रोखून धरला आहे. रेपो दर हा व्याजदर आहे; ज्यावर आरबीआय इतर बँकांना कर्ज देते. (Monetary Policy decision)

परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री

परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचा (foreign institutional investors) भारतीय शेअर बाजारात विक्रीवर जोर राहिला आहे. त्यांनी बुधवारी ३,३१४ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली. तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी याच दिवशी ३,९०१ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT