सेन्सेक्स आज ४४३ अंकांनी वाढून ७९,४७६ वर बंद झाला.  file photo
अर्थभान

Stock Market Closing Bell | सेन्सेक्स ४४३ अंकांनी वाढून बंद, IT शेअर्समध्ये जोरदार खरेदी

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

सपाट खुला झालेला भारतीय शेअर बाजार सोमवारी (दि.१ जुलै) तेजीत बंद झाला. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये काही प्रमाणात चढ- उतार दिसून आला. पण त्यानंतर बाजारात रिकव्हरी झाली आणि दोन्ही निर्देशांक उच्च पातळीवर बंद झाले. सेन्सेक्स ४४३ अंकांनी वाढून ७९,४७६ वर बंद झाला. तर निफ्टी १३१ अंकांच्या वाढीसह २४,१४१ वर स्थिरावला.

सप्टेंबरमध्ये अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह व्याजदर कपात करेल, या नव्या आशेने आणि जून महिन्याच्या विक्रीच्या आकडेवारीच्या आधी आयटी शेअर्समधील तेजीच्या जोरावर भारतीय शेअर बाजारात सोमवारी तेजी दिसून आली. बॅँकिंग शेअर्समुळेही बाजारातील वाढीला सपोर्ट मिळाला.

IT शेअर्स मजबूत स्थितीत

क्षेत्रीय आघाडीवर पॉवर, पीएसयू बँक आणि रियल्टी वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले. आयटी निर्देशांक जवळपास २ टक्क्यांनी वाढला. बीएसई मिडकॅप १.११ टक्क्यांनी तर स्मॉलकॅप १.५८ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. विशेष म्हणजे दुपारच्या व्यवहारात दोन्ही निर्देशांकांनी नव्या सर्वकालीन उच्चांकाला स्पर्श केला.

टेक महिंद्रा टॉप गेनर

सेन्सेक्स आज ७९,०४३ वर खुला झाला होता. त्यानंतर त्याने ७९,५२१ अंकाला स्पर्श केला. सेन्सेक्सवर टेक महिंद्रा, बजाज फायनान्स अल्ट्राटेक सिमेंट, टीसीएस, इन्फोसिस, हिंदुस्तान युनिलिव्हर, एचडीएफसी बँक, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा मोटर्स, नेस्ले इंडिया हे शेअर्स १ ते २ टक्क्यांनी वाढले. तर एनटीपीसी, एलटी, ॲक्सिस बँक, एसबीआय हे शेअर्समध्ये घसरण झाली.

सेन्सेक्सवरील शेअर्स.

निफ्टी ५० वर टेक महिंद्रा, विप्रो, अल्ट्राटेक सिमेंट, ग्रासीम, बजाज फायनान्स हे शेअर्स २ ते ३ टक्क्यांपर्यंत वाढून टॉप गेनर्स राहिले. तर एनटीपीसी, अपोलो हॉस्पिटल, डॉ. रेड्डीज हे शेअर्स टॉप लूजर्स होते. निफ्टी बँक आणि निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसेस निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाला.

निफ्टी ५० चा ट्रेडिंग आलेख.

विप्रोचा शेअर्स तेजीत

IT कंपनी विप्रोचा शेअर्स (Wipro Share Price) आज बीएसईवर ३.५ टक्क्यांनी वाढून ५३३.२५ रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला. एका ब्रोकरेज फर्मने विप्रोचे रेटिंग वाढवून ते ‘आउटपरफॉर्म’ केले आहे. तर त्याची टार्गेट प्राइस वाढवून ६०७ रुपयांपर्यंत केली आहे. पूर्वी याचे रेटिंग ‘अंडरपरफॉर्म’ होते.

'Kalki 2898 AD'मुळे 'या' शेअर्सला चालना

मल्टिप्लेक्स ऑपरेटर PVR-Inox या कंपनीचा शेअर्स आज एनएसईवर ४ टक्क्यांहून अधिक वाढून सुमारे १,५०० रुपयांवर पोहोचला. काही चित्रपटांच्या मजबूत बॉक्स ऑफिस कलेक्शनमुळे या शेअर्सला चालना मिळाली असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. नुकताच प्रदर्शित झालेला प्रभासचा मल्टी-स्टारर 'कल्की 2898 एडी'ने (Kalki 2898 AD) बॉक्स ऑफिसवर धमाका केला. हा चित्रपट अवघ्या तीन दिवसांत २०२४ चा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट बनला आहे. काही चित्रपट व्यापार विश्लेषकाच्या मते या चित्रपटाने जगभरात ५०० कोटींचा टप्पा पार केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT