आज सोमवारी (दि.१८) शेअर बाजार सलग सातव्या सत्रांत घसरला. (file photo)
अर्थभान

एका वक्तव्याने IT शेअर्स धडाधड कोसळले, शेअर बाजारात आज नेमके काय घडले?

Stock Market Closing Bell | सेन्सेक्स- निफ्टीची सलग सातव्या सत्रांत घसरण

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हची व्याजदराबाबतची भूमिका, कार्पोरेट कंपन्यांची कमकुवत कमाई आणि विदेशी संस्था गुंतवणूकदारांकडून सातत्याने होत असलेला विक्रीचा मारा आदी घटक भारतीय शेअर बाजाराच्या घसरणीला कारणीभूत ठरले आहेत. आज सोमवारी (दि.१८) शेअर बाजार (Stock Market) सलग सातव्या सत्रांत घसरला. सेन्सेक्स २४१ अंकांनी घसरून ७७,३३९ वर बंद झाला. तर निफ्टी ७८ अंकांच्या घसरणीसह २३,४५३ वर स्थिरावला.

निफ्टी मेटल टॉप गेनर

क्षेत्रीय निर्देशांकातील निफ्टी आयटीचे मोठे नुकसान झाले. हा निर्देशांक २.३ टक्के घसरला. त्याचबरोबर हेल्थकेअर, एनर्जी यांनाही फटका बसला. दुसरीकडे निफ्टी मेटल टॉप गेनर ठरला. हा निर्देशांक १.९ टक्के वाढून बंद झाला. निफ्टी बँकमध्येही वाढ दिसून आली. बीएसई मिडकॅप ०.१ टक्के आणि स्मॉलकॅप ०.६ टक्के घसरला.

IT शेअर्स आज गडगडले, कारण काय?

आयटी कंपन्यांचे शेअर्स आज गडगडले. निफ्टी आयटी निर्देशांक आजच्या ट्रेडिंगदरम्यान सुमारे १,३०० अंकांनी म्हणजे ३ टक्क्यांनी घसरला. त्यानंतर तो २.३ टक्के घसरणीसह बंद झाला. निफ्टी आयटीवर टीसीएस, Mphasis, विप्रो, इन्फोसिस, LTIMindtree हे शेअर्स २ ते ३ टक्क्यांनी घसरले. आयटी शेअर्समधील घसरण ही अमेरिकेचे फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल (US Fed Chair Jerome Powell) यांच्या वक्तव्यानंतर झाली आहे. पॉवेल यांनी व्याजदरात कपातीची घाई नसल्याचे म्हटले आहे. हे त्यांच्या वक्तव्याने भारतीय कंपन्यांना झटका बसला आहे. अमेरिकेतील महागाई दर अजूनही २ टक्के लक्ष्याच्या वर राहिली आहे. याचदरम्यान यूएस फेड अध्यक्षांनी व्याजदराबाबत वक्तव्य केले आहे.

Sensex Today : कोणते शेअर्स घसरले, कोणते वाढले?

सेन्सेक्सवर टीसीएस, इन्फोसिस, टेक महिंद्रा, एनटीपीसी, बजाज फिनसर्व्ह, सन फार्मा, अल्ट्राटेक सिमेंट, एचसीएल टेक, इंडसइंड बँक हे शेअर्स १ ते ३ टक्के घसरले. तर टाटा स्टील, हिंदुस्तान युनिलिव्हर, एसबीआय, नेस्ले इंडिया, जेएसडब्ल्यू स्टील, अदानी पोर्ट्स, एम अँड एम हे शेअर्स १ ते २ टक्क्यांनी वाढले.

सेन्सेक्सवर टीसीएसचा शेअर्स ३ टक्के घसरला.

निफ्टी ५० निर्देशांक आज २३,६०५ वर खुला झाला होता. त्यानंतर तो २३,३५० पर्यंत खाली आला. त्यानंतर त्यात रिकव्हरी दिसून आली आणि तो २३,४५३ च्या पातळीवर स्थिरावला. निफ्टीवर बीपीसीएल, टीसीएस, ट्रेंट, इन्फोसिस, विप्रो हे शेअर्स २.५ ते ३ टक्क्यांनी घसरले. तर हिंदाल्को, हिरो मोटोकॉर्प, टाटा स्टील, हिंदुस्तान युनिलिव्हर, नेस्ले इंडिया हे शेअर्स १ ते ४ टक्क्यांपर्यंत वाढले.

निफ्टी ७८ अंकांच्या घसरणीसह २३,४५३ वर बंद झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT