आजच्या शुक्रवारच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स १,३५९ अंकांनी वाढून ८४,५४४ वर बंद झाला. (file photo)
अर्थभान

बाजार सुसाट! सेन्सेक्सची १,३५९ अंकांची उसळी, ६.५ लाख कोटींची कमाई

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क

जागतिक आणि आशियाई बाजारातील सकारात्मक संकेतांदरम्यान भारतीय शेअर बाजाराने आज शुक्रवारी जोरदार उसळी घेतली. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्सने ८४,६९४ चा सर्वकालीन उच्चांक नोंदवला. त्यानंतर सेन्सेक्स १,३५९ अंकांनी वाढून ८४,५४४ वर बंद झाला. तर निफ्टीने २५,८४९ च्या विक्रमी उच्चांकाला स्पर्श केला. त्यानंतर निफ्टी ३७५ अंकांच्या वाढीसह २५,७९० वर स्थिरावला.

ठ‍ळक मुद्दे

  • सेन्सेक्स- निफ्टीने नोंदवला सर्वकालीन उच्चांक.

  • सेन्सेक्स १,३५९ अंकांनी वाढून ८४,५४४ वर बंद.

  • निफ्टी ३७५ अंकांच्या वाढीसह २५,७९० वर स्थिरावला.

  • Nifty Bank सलग सातव्या सत्रांत वाढून बंद

  • मिडकॅप आणि स्मॉलकॅप प्रत्येकी १ टक्के वाढून बंद.

  • ICICI, HDFC bank हेवीवेट्स शेअर्सचे तेजीत मोठे योगदान.

गुंतवणूकदारांना ६.५ लाख कोटींचा फायदा

यामुळे २० सप्टेंबर रोजी बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ६.५ लाख कोटींनी वाढून ४७१.९७ लाख कोटींवर पोहोचले. याआधी १९ सप्टेंबर रोजी बाजार भांडवल ४६५.४७ लाख कोटी रुपयांवर होते. याचाच अर्थ गुंतवणूकदारांना ६.५ लाख कोटींचा फायदा झाला.

Sensex Today : कोणते शेअर्स तेजीत? 

सेन्सेक्सने आज ८४,६२२ चा नवा विक्रमी उच्चांक नोंदवला. सेन्सेक्सवर एम अँड एमचा शेअर्स ५.५ टक्के वाढीसह टॉप गेनर ठरला. त्याचबरोबर आयसीआयसीआयचा शेअर्स ४ टक्क्यांहून अधिक वाढला. जेएसडब्ल्यू स्टील, एलटी हे शेअर्स प्रत्येकी प्रत्येकी ३ टक्क्यांनी वाढले. भारती एअरटेल, नेस्ले इंडिया, अदानी पोर्ट्स, मारुती, हिंदुस्तान युनिलिव्हर, कोटक बँक हे शेअर्स प्रत्येकी २ टक्क्यांनी वाढले.

सेन्सेक्सवर एम अँड एमचा शेअर्स ५.५ टक्के वाढीसह टॉप गेनर ठरला.

Nifty ने गाठले नवे शिखर

एनएसई निफ्टी ५० निर्देशांकाने आज २५,८३१ च्या नव्या विक्रमी उच्चांकाला स्पर्श केला. निफ्टीवर एम अँड एम, आयसीआयसीआय बँक, जेएसडब्ल्यू स्टील, एलटी आणि भारती एअरटेल हे शेअर्स २ ते ५ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. तर ग्रासीम, एसबीआय हे शेअर्स घसरले.

एनएसई निफ्टी ५० निर्देशांकाने आज २५,८३१ च्या नव्या विक्रमी उच्चांकाला स्पर्श केला.

Nifty Bank सलग सातव्या सत्रांत वाढून बंद

आज सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले. ऑटो, बँक, कॅपिटल गुड्स, हेल्थकेअर, एफएमसीजी, पॉवर, टेलिकॉम, मेटल आणि रियल्टी १ ते ३ टक्क्यांदरम्यान वाढले. निफ्टी बँक निर्देशांक (Nifty Bank index) सलग सातव्या सत्रांत वाढून बंद झाला. निफ्टी बँकने आज ५४,०४९ चा नवा विक्रमी उच्चांक गाठला. त्यानंतर तो १.४ टक्के वाढीसह ५३,७९३ वर स्थिरावला. निफ्टी बँकवर आयसीआयसीआयचा शेअर ४ टक्क्यांनी वाढून टॉप गेनर राहिला.

मिडकॅप- स्मॉलकॅपच्या घसरणीला ब्रेक

बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप दोन्ही निर्देशांकांच्या तीन दिवसांच्या घसरणीला आज ब्रेक लागला. दोन्ही निर्देशांक आज प्रत्येकी १ टक्के वाढले.

जागतिक बाजारात आशावाद

जागतिक सकारात्मक संकेत आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने पतविषयक सुलभ धोरण अवलंबिल्यामुळे आशियाई बाजारात तेजी पसरली आहे. फेडरल रिझर्व्हने व्याजदरात ५० बेसिस पॉइंट्सची कपात केली असून व्याजदरात आणखी कपातीचे संकेत दिले आहेत. यामुळे अमेरिकेच्या शेअर बाजारातील निर्देशांक गुरुवारी उच्च पातळीवर बंद झाले होते. S&P 500 आणि Dow Jones ने विक्रमी उच्चांक गाठला. आशियाई बाजारातही तेजी राहिली. जपानचा निक्केई १ टक्के वाढला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT