सेन्सेक्स ११५ अंकांनी वाढून ७६,५२० वर बंद झाला. (file photo)
अर्थभान

सेन्सेक्स- निफ्टीमध्ये किरकोळ वाढ, मिड-स्मॉलकॅप शेअर्समध्ये जोरदार खरेदी

Stock Market Closing | IT आणि फार्मा शेअर्स तेजीत

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय शेअर बाजारातील ( Stock Market) सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty) आज गुरुवारी (दि. २३) तेजीत बंद झाले. सेन्सेक्स ११५ अंकांनी वाढून ७६,५२० वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक ५० अंकांच्या किरकोळ वाढीसह २३,२०५ वर स्थिरावला. आजच्या सत्रात आयटी आणि फार्मा शेअर्समधील तेजीमुळे बाजारातील वाढीला चालना मिळाली. तर बँक, ऑईल अँड गॅस शेअर्समध्ये कमकुवत स्थिती राहिली.

जागतिक बाजारातील संमिश्र संकेतानंतर आज शेअर बाजाराने किरको‍ळ घसरणीसह सुरुवात केली होती. पण त्यानंतर त्यात वाढ दिसून आली. निफ्टी आयटी, फार्मा आणि निफ्टी ऑटो निर्देशांक १ ते २ टक्केपर्यंत वाढले. निफ्टी आयटी १.८ टक्के, फार्मा १.४ टक्के आणि ऑटो १.१ टक्के वाढला. बीएसई मिडकॅप १.७ टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांकाने ०.६ टक्के वाढ नोंदवली.

तर बँकिंग आणि एनर्जी क्षेत्रांची चांगली कामगिरी राहिली नाही. निफ्टी बँक आणि पीएसयू बँक निर्देशांकांत घसरण दिसून आली.

Sensex Today : कोणते शेअर्स वाढले?

सेन्सेक्सवर अल्ट्राटेक सिमेंटचा शेअर्स ६.५ टक्के वाढून टॉप गेनर राहिला. झोमॅटो, सन फार्मा, एम अँड एम, टेक महिंद्रा, टाटा स्टील, टाटा मोटर्स, टायटन हे शेअर्स १ ते २ टक्के वाढले. तर कोटक बँक, पॉवर ग्रिड, एचसीएल टेक, रिलायन्स, एसबीआय हे शेअर्स घसरले.

Nifty IT वर Coforge चा शेअर्स तब्बल ११.५ टक्के वाढला

निफ्टी आयटी निर्देशांक १.८ टक्के वाढून बंद झाला. निफ्टी आयटीवर Coforge चा शेअर्स तब्बल ११.५ टक्के वाढला. Persistent शेअर्सने १०.३३ टक्के वाढ नोंदवली. Mphasis, विप्रो हे शेअर्सही वाढले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT