सेन्सेक्स आज १०२ अंकांनी वाढून ८०,९०५ वर बंद झाला. file photo
अर्थभान

शेअर बाजारात मजबूती कायम, सेन्सेक्स १०२ अंकांनी वाढून बंद

Stock Market Updates | जाणून घ्या कोणते शेअर्स राहिले तेजीत?

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

भारतीय शेअर बाजाराने (Stock Market Updates) आज बुधवारी (दि. २१) मजबूती कायम ठेवली. सेन्सेक्स (Sensex) १०२ अंकांनी वाढून ८०,९०५ वर बंद झाला. तर निफ्टी (Nifty) ७१ अंकांच्या वाढीसह २४,७७० वर स्थिरावला. बाजारात आज काही प्रमाणात अस्थिरता दिसून आली. पण सेन्सेक्स आणि निफ्टी हिरव्या रंगात बंद झाले. आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये आज कमजोरी राहिली.

क्षेत्रीय आघाडीवर रियल्टी निर्देशांक १.३ टक्क्यांनी घसरला. बँक निर्देशांकही ०.२ टक्क्यांनी खाली आला. तर एफएमसीजी, हेल्थकेअर, मेटल, टेलिकॉम आणि मीडिया ०.५ ते १ टक्के वाढले. बीएसई मिडकॅप ०.४ टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप ०.८ टक्के वाढीसह बंद झाला.

Sensex Today : कोणते शेअर्स वधारले?

सेन्सेक्सवर टायटन (Titan Company Share Price), एशियन पेंट्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, बजाज फिनसर्व्ह, आयटीसी, नेस्ले इंडिया, भारती एअरटेल हे शेअर्स सर्वाधिक वाढले. तर अल्ट्राटेक सिमेंट, टेक महिंद्रा, टाटा स्टील, पॉवर ग्रिड, एचडीएफसी बँक हे शेअर्स घसरले.

आज सेन्सेक्सवर टायटनचा शेअर्स टॉप गेनर ठरला.

एनएसई निफ्टीवर डिव्हिस लॅब, टायटन, एसबीआय लाईफ, सिप्ला, ग्रासीम हे शेअर्स २ ते ४ टक्क्यांपर्यंत वाढून टॉप गेनर्स राहिले. तर टेक महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा स्टील, पॉवर ग्रिड हे शेअर्स प्रत्येकी १ टक्के घसरले.

निफ्टी ५० चा आजचा ट्रेडिंग आलेख.

Ola Electric चा शेअर्स तेजीत

ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीचा शेअर्स (Ola Electric Mobility shares) आज बीएसईवर ४ टक्क्यांनी वाढून १४३.८० रुपयांवर पोहोचला. त्यानंतर हा शेअर्स १३७ रुपयांवर स्थिरावला. ओला इलेक्ट्रिकला त्याच्या आणखी दोन वाहनांसाठी प्रोडक्शन-लिंक्ड इन्सेंटिव्ह (पीएलआय) लाभ घेण्याचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर ओलाचा शेअर्स आज तेजीत राहिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT