* गतसप्ताहात सेन्सेक्स व निफ्टीमध्ये (Sensex and Nifty) अनुक्रमे 1836.95 व 515.20 अंकांची घसरण होऊन दोन्ही निर्देशांक अनुक्रमे 57200.23 आणि 17101.95 बँकांच्या पातळीवर बंद झाले. सेन्सेक्समध्ये 3.11 टक्के व निफ्टीमध्ये 2.92 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली. सप्ताहाअखेरच्या दिवशी निफ्टीवर सेन्सेक्स (Sensex and Nifty) सुमारे एक टक्का मजबूत होते; परंतु बाजार दिवसाखेर आंतरराष्ट्रीय बाजारांच्या दबावाखाली खाली आले. गतसप्ताहात भांडवल बाजाराच्या कोसळण्यास प्रामुख्याने तीन कारणे होती.
सर्वात पहिले म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव नव्वद डॉलर प्रती बॅरल किमतीच्या पुढे गेले, तसेच रशियाविरुद्ध युरोपियन देशांची संघटना नाटो आणि अमेरिका यांच्यामध्ये युक्रेनवरील भूभागवरून तणाव निर्माण झाला. तसेच अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने मार्चपासून व्याजदर वाढवण्याचे संकेत दिले. या सर्वांचा एकत्रित परिणाम भारतीय भांडवल बाजार खाली येण्यात झाला.
* एअर इंडिया अखेर टाटांकडे 69 वर्षांनंतर पुन्हा सुपूर्द. टाटांनी एअर इंडिया खरेदीसाठी अठरा हजार कोटी मोजले. सध्या टाटा समूह एअर एशियामध्ये 84 टक्के मालकीसह आणि विस्तारामध्ये 51 टक्के मालकीसह हवाई वाहतूक क्षेत्रात कार्यरत आहे. या व्यवहारानंतर एअर इंडियाची 141 आणखी विमाने जोडली जातील. एअर इंडिया कंपनीला पुन्हा फायद्यात आणण्यासाठी एसबीआय, एलआयसीसह काही कर्जदाते टाटांना कर्जपुरवठा करतील. (Sensex and Nifty)
* देशातील महत्त्वाची दूरसंचार क्षेत्रातील कंपनी भारती एअरटेलमध्ये आंतरराष्ट्रीय कंपनी गुगल 1 अब्ज डॉलर्स (सुमारे 7500 कोटी) गुंतवणार. यामध्ये सुमारे 700 दशलक्ष डॉलर्स इक्विटी स्वरूपात गुंतवून भारतीय एअरटेलचा 1.28 टक्के हिस्सा गुगल खरेदी करणार. 734 रुपये प्रति समभाग दरावर ही हिस्साखरेदी केली जाणार. यापूर्वी गुगलने रिलायन्स जिओमध्ये 4.5 अब्ज डॉलर गुंतवून 7.73 टक्के हिस्सा खरेदी केला होता.
* देशातील महत्त्वाची सरकारी बँक पंजाब नॅशनल बँकेचे तिसर्या तिमाहीचा नफा मागील वर्षाच्या तुलनेत दुप्पट होऊन 1126.78 कोटींवर पोहोचला. निव्वळ अनुत्पादित कर्जाचे प्रमाण 4.03 टक्क्यांवरून 4.90 टक्क्यांवर पोहोचले. निव्वळ व्याज उत्पन्नदेखील मागील वर्षीच्या तुलनेत 6.89 टक्क्यांनी कमी होऊन 7880.39 कोटींपर्यंत खाली आले.
* विमा क्षेत्रातून फ्युचर ग्रुप बाहेर पडणार. सध्या फ्युचर जनरली कंपनीमध्ये फ्युचर ग्रुपचा हिस्सा आहे. फ्युचर ग्रुप आपला 25 टक्के हिस्सा जनरली उद्योग समूहाला 1252.96 कोटींना विकून या व्यवसायातून बाहेर पडणार.
* कॅनरा बँकचा तिसर्या तिमाहीतचा नफा मागील वर्षाच्या तुलनेत दुपटीपेक्षा अधिक वाढून 1502 कोटींवर पोहोचला. निवाडा अनुत्पादित कर्जाचे प्रमाण 2.64 टक्क्यांवरून 2.86 टक्के झाले. निव्वळ व्याज उत्पन्न सुमारे 14 टक्के वधारून 6946 कोटींपर्यंत पोहोचले.
* एलआयसी आयपीओच्या माध्यमातून लवकरच भांडवल बाजारात उतरण्यासाठी तयार. 31 पूर्वी सरकार आयपीओ आणण्यासाठी प्रयत्नशील. दहा टक्के हिस्सा विक्रीद्वारे 1 लाख कोटींचा निधी उभारणार.
* कोटक महिंद्रा बँकेचा नफा मागील वर्षाच्या तुलनेत 15 टक्क्यांनी वधारून 2131 कोटींवर पोहोचला. निव्वळ व्याज उत्पन्नात 12 टक्क्यांची वाढ होऊन उत्पन्न 4334 कोटींवर पोहोचले. निव्वळ अनुत्पादित कर्जाचे प्रमाण 1.24 टक्क्यांवरून 0.79 टक्के झाले. तसेच अॅक्सिस बँकेचा नफा सुमारे तीन पटींनी वाढून 3614 कोटींवर पोहोचला. निव्वळ व्याज उत्पन्न 17 टक्क्यांनी वधारून 8653 कोटींवर पोहोचले. निवड अनुत्पादित कर्जाचे प्रमाण 0.74 टक्क्यांवरून 0.91 टक्क्यांपर्यंत वाढले.
* देशातील महत्त्वाची औषध उत्पादन करणारी कंपनी डॉक्टर रेड्डीचा नफा तिसर्या तिमाहीत 706 कोटींवर पोहोचला. मागील तिमाहीच्या तुलनेत नफा 29 टक्क्यांनी घटला. मागील वर्षीच्या तुलनेत कंपनीचा महसूल आठ टक्के वधारून 5320 कोटींवर पोहोचला.
* विविध बँकांची अनुत्पादित कर्जे एके ठिकाणी हस्तांतर करण्यासाठी एनआरसीएल आणि आयडीआरसीएल या वित्तसंस्थांची स्थापना करण्यात आली होती. या संस्थेकडे बँकांकडून एकूण 82845 कोटींची बुडीत कर्जे वर्ग करण्यात येणार आहेत. एकूण 38 कर्जखात्याचा यामध्ये समावेश आहे.
* देशातील महत्त्वाची वाहन उत्पादक कंपनी मारुतीचा तिसर्या तिमाहीचा नफा 48 टक्क्यांनी घटून 1011 कोटीपर्यंत खाली आला. कंपनीचा महसूल सुमारे एक टक्क्याने घटून 23246 कोटी झाला.
* बुडीत पीएमसी बँकेचे युनिटी स्मॉल फायनान्स बँकमध्ये विलीनीकरण करण्याचा निर्णय. पीएमसी बँकेच्या सध्या 136 शाखा, सेंट्रम उद्योग समूह आणि भारत पे यांनी एकत्र येत पीएमसी बँक घेतली.
* देशातील प्रमुख कंपनी एल अँड टी चा तिसर्या तिमाहीचा नफा 17 टक्क्यांनी घटून 2055 कोटीपर्यंत खाली आला. कंपनीचा महसूल 11 टक्के वाढून 39563 कोटींवर पोहोचला.
* 21 जानेवारी रोजी संपलेल्या सप्ताहात भारताची परकीय गंगाजळी 678 दशलक्ष डॉलर्सनी घटून 634.287 अब्ज डॉलर्सवर खाली आली.