सेन्सेक्सने आज ८१,७०८ च्या नव्या उच्चांकाला स्पर्श केला. file photo
अर्थभान

Stock Market Updates | सेन्सेक्स, निफ्टीचा नवा उच्चांक! 'हे' बँकिंग शेअर्स तेजीत

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

आशियाई बाजारातील तेजी आणि काही हेवीवेट शेअर्समधील वाढीच्या जोरावर भारतीय शेअर बाजारातील निर्देशांक निफ्टी ५० (Nifty) आणि सेन्सेक्सने (Sensex) आज सोमवारी (दि. २९ जुलै) नवा उच्चांक गाठला. सुरुवातीच्या व्यवहारात बीएसई सेन्सेक्सने ३७५ अंकांनी वाढून ८१,७०८ च्या नव्या उच्चांकाला स्पर्श केला. तर निफ्टी ५० निर्देशांकाने १०० अंकांनी वाढून २४,९८० चा सर्वकालीन उच्चांक नोंदवला. (Stock Market Updates)

सेन्सेक्सवर एलटी, एसबीआय, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, टाटा मोटर्स, अल्ट्राटेक सिमेंट हे शेअर्स तेजीत आहे. तर टायटन, भारती एअरटेल, टेक महिंद्रा, पॉवर ग्रिड, आयटीसी हे शेअर्स घसरले आहेत.

निफ्टीवर एलटी, एसबीआय, आयसीआयसीआय बँक, बीपीसीएल, इंडसइंड बँक हे शेअर्स १ ते २ टक्क्यांनी वाढले आहेत. तर सिप्ला, टायटन, टाटा कन्झ्यूमर, भारती एअरटेल, टेक महिंद्रा हे शेअर्स १ ते २ टक्क्यांनी घसरले आहेत.

ICICI Bank चा शेअर्स तेजीत

आयसीआयसीआय बँकेचा शेअर्स सुरुवातीच्या व्यवहारात सुमारे २ टक्क्यांनी वाढून १,२३१ रुपयांवर पोहोचला आहे. ICICI बँकेने पहिल्या तिमाहीत अपेक्षेपेक्षा जास्त नफा नोंदवला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचा शेअर्स तेजीत व्यवहार करत आहे.

बंधन बँकेचा शेअर्स १० टक्क्यांनी वाढला

निफ्टी बँकवर बंधन बँकेचा शेअर्स (Bandhan Bank) टॉप गेनर ठरला आहे. हा शेअर्स १० टक्क्यांनी वाढून २१३ रुपयांवर व्यवहार करत आहे. त्याचबरोबर पीएनबी, बँक ऑफ बडोदा, एसबीआय हे शेअर्सही तेजीत आहेत.

परदेशी गुंतवणूकदार बनले खरेदीदार

परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारात खरेदीदार म्हणून पुढे आले आहेत. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) शुक्रवारी २,५४६ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली. तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी याच दिवशी २,७७४ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT