सेन्सेक्स आणि निफ्टी आज शुक्रवारी किरकोळ घसरणीसह बंद झाले. file photo
अर्थभान

सेन्सेक्स सपाट, Nifty Midcap 100 पहिल्यांदाच 60 हजार पार

Stock Market Closing Bell | शेअर बाजारात प्रॉफिट बुकिंग

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क

भारतीय शेअर बाजारात (Stock Market) शुक्रवारी प्रॉफिट बुकिंग दिसून आले. यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी किरकोळ घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स (Sensex) ७१ अंकांच्या घसरणीसह ८२,८९० वर बंद झाला. तर निफ्टी (Nifty) ३२ अंकांच्या किरकोळ घसरणीसह २५,३५६ वर स्थिरावला. दरम्यान, मिडकॅप शेअर्समध्ये झालेल्या खरेदीमुळे निफ्टी मिडकॅप १०० निर्देशांकाने (Nifty Midcap 100 index) पहिल्यांदाच ६० हजारांचा टप्पा ओलांडला. फार्मा आणि एफएमसीजी शेअर्समध्ये आज कमजोरी दिसून आली. तर आयटी शेअर्समधील तेजीमुळे बाजाराला सपोर्ट मिळाला.

गुरुवारी सेन्सेक्स- निफ्टीने नवा विक्रमी उच्चांक नोंदवला होता. पण आज शुक्रवारी दोन्ही निर्देशांक सपाट झाले. क्षेत्रीय निर्देशांकातील एफएमसीजी, पॉवर, ऑईल आणि गॅस वगळता इतर सर्व निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले. आयटी, मीडिया, मेटल, रियल्टी आणि पीएसयू बँक वाढून बंद झाले. बीएसई मिडकॅप ०.४ टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप ०.९ टक्के वाढला.

विप्रोचा शेअर्स टॉप गेनर

एनएसई निफ्टीवर एसबीआय लाईफ, अदानी पोर्ट्स, एचडीएफसी लाईफ, आयटीसी, कोल इंडिया हे शेअर्स प्रत्येकी १ टक्के घसरले. तर विप्रो, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, इंडसइंड बँक, ॲक्सिस बँक हे शेअर्स १ ते ३ टक्क्यांपर्यंत वाढले.

निफ्टी ३२ अंकांच्या किरकोळ घसरणीसह २५,३५६ वर स्थिरावला.

सेन्सेक्सवर अदानी पोर्ट्स, आयटीसी, एनटीपीसी, एशियन पेंट्स, हिंदुस्तान युनिलिव्हर हे शेअर्स घसरले. तर बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, इंडसइंड बँक, ॲक्सिस बँक, टाटा स्टील, टेक महिंद्रा हे शेअर्स तेजीत राहिले.

सेन्सेक्सवर अदानी पोर्ट्सचा शेअर्स टॉप लूजर ठरला.

अदानींच्या 'या' शेअर्समध्ये घसरण

हिंडनबर्ग रिसर्चच्या नव्या आरोपांमुळे शुक्रवारी अदानी समुहाच्या काही शेअर्समध्ये घसरण दिसून आली. स्विस अधिकाऱ्यांनी अदानी समूहाशी संबंधित मनी लाँडरिंग आणि सिक्युरिटीज फसवणूक आरोपांच्या चौकशीचा एक भाग म्हणून स्विस बँक खात्यांमधील ३१ कोटी डॉलरहून अधिक रक्कम गोठवली असल्याचा दावा हिंडनबर्गने केला आहे. या पार्श्वभूमीवर अदानी पोर्ट्सचा शेअर्स १ टक्क्यांनी घसरला. अदानी एंटरप्रायजेसच्या शेअर्समध्येही (Adani Enterprises Share Price) किरकोळ घसरण दिसून आली. तर एसीसी आणि अंबुजा सिमेंट शेअर्समध्ये वाढ झाली.

Nifty IT चा नवा उच्चांक

विप्रोचा शेअर्स आज ३ टक्क्यांहून अधिक वाढला. यामुळे निफ्टी आयटीने आज ४३,५७१ चा नवा उच्चांक नोंदवला. त्यानंतर निफ्टी आयटी ४३,३९४ वर बंद झाला. निफ्टी आयटीवर विप्रोचा शेअर्स ३.७ टक्क्यांनी वाढून टॉप गेनर ठरला. त्याचबरोबर Coforge, Mphasis हे शेअर्सही वाढले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT