सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाण भारतात लक्षणीयरीत्या वाढत आहे, पण प्रभावी एसआयपी (SIP) गुंतवणूकदार बनण्यासाठी काही नियम बाजारात प्रचलीत आहेत. त्यापैकी एक म्हणजे 7-5-3-1 हा नियम. हा नियम जाणून घेऊ.
7-5-3-1 या नियमातील पहिल्या सातचा अर्थ आपण करत असलेल्या गुंतवणुकीची मुदत सात वर्षांहून अधिक ठेवा. याचे कारण शेअर बाजार साधारणतः सात वर्षांपेक्षा जास्त कालावधीत चांगली कामगिरी करतो, असे दिसून आले आहे. गेल्या दोन दशकांमध्ये एक वर्षाच्या कालावधीसाठी गुंतवणूक केल्यास 58 टक्के वेळा या गुंतवणुकीने 10 टक्के पेक्षा जास्त वार्षिक परतावा दिला आहे. पण, सात वर्षांच्या कालावधीसह केली गेली असेल, तर ही टक्केवारी वाढून 80 टक्क्यांपर्यंत पोहोचते. सर्वात वाईट परिस्थितीतही गुंतवणूकदारांनी किमान 5 टक्के वार्षिक परतावा मिळवला आहे. म्हणून, तुमच्या इक्विटी एसआयपी गुंतवणुकीचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी 7 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी गुंतवणूक करू शकता.
पाचचा अर्थ आहे, पाच बोटांप्रमाणे इक्विटी पोर्टफोलिओमध्ये वैविध्य ठेवा. बरेचदा गुंतवणूकदार केवळ मागील परताव्याच्या आधारावर गुंतवणूक करतात. अशा वेळी पोर्टफोलिओ विशिष्ट थीमवर अवलंबून राहतो. परिणामी, जेव्हा अशा थीम्सचा काळ जेव्हा संपतो, तेव्हा पोर्टफोलिओ बराच काळ अंडर परफॉर्म करू लागतो. म्हणूनच, मोठ्या मुदतीसाठी चांगला पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी विविध गुंतवणूक मार्ग आणि मार्केट कॅपद्वारे तुमचा पोर्टफोलिओ अधिक आकर्षित बनवा. यामुळे तुम्हाला चांगला परतावा मिळेल.
1. निराशेचा टप्पा - जेथे परतावा 7-10 टक्के असतो.
2. चिडचिडेपणा - जिथे परतावा आपल्या अपेक्षेपेक्षा खूपच कमी म्हणजे 0-7 टक्के असतो.
3. पॅनिक फेज - जेथे परतावा नकारात्मक स्तरावर पोहोचतो.
भारतीय शेअर बाजाराचा इतिहास असे सांगतो की, जवळपास दरवर्षी बाजारात 10-20 टक्क्यांची तात्पुरती घसरण होते आणि दर 7-10 वर्षातून एकदा बाजारात 30-60 टक्क्यांची घसरण होते.
तुमच्या एसआयपी गुंतवणुकीची सुरुवातीची काही वर्षे फार कठीण असू शकतात. कारण अधूनमधून बाजारातील घसरणीमुळे इक्विटी रिटर्न्समध्ये मोठ्या प्रमाणात घट होऊ शकते. यामुळे निराशा, चिडचिड आणि भीती निर्माण होते. पण, ही घसरण तात्पुरती आहे हेही लक्षात घ्या. आता राहिलेल्या एकच अर्थ असा की, दरवर्षी तुमची एसआयपी रक्कम वाढवा. यामुळे दीर्घ कालावधीत तुमच्या पोर्टफोलिओच्या रकमेत मोठा फरक पडू शकतो. 20 वर्षांच्या पोर्टफोलिओ मूल्यामध्ये 10 टक्के वार्षिक वाढ सामान्य एसआयपीद्वारे दरवर्षी गुंतवलेल्या रकमेच्या दुप्पट परतावा देते.