म्युच्युअल फंड Pudhari File Photo
अर्थभान

म्युच्युअल फंडधारक आहात?

पुढारी वृत्तसेवा
स्वाती देसाई

म्युच्युअल फंड हा आपल्या गुंतवणुकीवर दमदार परतावा मिळवू पाहणार्‍यांमध्ये लोकप्रिय पर्याय बनला आहे; पण कोणता म्युच्युअल फंड योग्य आहे आणि त्यावर किती कर आकारला जातो, हेदेखील समजून घेणे आवश्यक असते. यासोबतच करदायित्वेही जाणून घेणे आवश्यक आहे.

* सिंगल होल्डिंग : नावाप्रमाणेच यामध्ये म्युच्युअल फंड युनिटची मालकी वैयक्तिक असते. ज्या गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीवर पूर्ण नियंत्रण हवे आहे त्यांच्यासाठी हे योग्य आहे.

* जॉईंट होल्डिंग : यामध्ये दोन किंवा अधिक लोक संयुक्तपणे म्युच्युअल फंड युनिटस्चे मालक असतात. संयुक्त होल्डिंग दोन प्रकारांमध्ये विभागली आहे.

यापैकी सर्व्हायव्हरमध्ये व्यवहारासाठी कोणत्याही होल्डरची स्वाक्षरी ग्राह्य मानली जाते. एका सदस्याच्या मृत्यूनंतर हयात असलेला सदस्य मालक बनतो, तर दुसर्‍या प्रकारात सर्व सदस्यांच्या स्वाक्षरीशिवाय या फंडातील व्यवहार पूर्ण होत नाही.

होल्डिंगसंदर्भातील निर्णय आपण ज्या बँक खात्यातून फंडात गुंतवणूक करणार आहोत त्या खात्यानुसार असावा. याखेरीज युनिटधारकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास सुरळीत हस्तांतरण आणि पेआउट सुलभ करण्यासाठी नॉमिनी करणेदेखील महत्त्वाचे आहे.

* जॉईंट होल्डिंगमध्ये आयकर रिटर्नमध्ये दुसर्‍या आणि तिसर्‍या सदस्यांची नावे आणि पॅन तपशीलदेखील द्यावे लागतात.

* म्युच्युअल फंड युनिटस् खरेदी आणि विक्री दरम्यानच्या कालावधीला होल्डिंग कालावधी म्हणतात.

* इक्विटी म्युच्युअल फंड, डेट म्युच्युअल फंड आणि हायब्रीड म्युच्युअल फंड यासारख्या प्रकारानुसार कर आकारणीचे नियम वेगळे असतात.

* म्युच्युअल फंडांवर लावला जाणारा कर अनेक घटकांवर अवलंबून असतो.

* एखादा गुंतवणूकदार त्याच्या म्युच्युअल फंड युनिट्सची सुरुवातीच्या गुंतवणुकीच्या रकमेपेक्षा जास्त किमतीला विक्री करतो तेव्हा भांडवली नफा होतो.

* भारतीय आयकर नियमांनुसार, दीर्घ गुंतवणुकीच्या कालावधीचा परिणाम सामान्यतः भांडवली नफ्यावर कर दर कमी होतो. गुंतवणूक दीर्घकाळ ठेवल्यास कर कमी भरावा लागतो.

सर्व प्रकारच्या मालमत्तेच्या दीर्घकालीन भांडवली नफ्यावर 12.5 टक्के समान कर आकारला जाईल. अर्थसंकल्प 2024 मधून गुंतवणूकदारांना मिळणारा इंडेक्सेशन फायदा काढून टाकण्यात आला असून यापूर्वी काही मालमत्तांवर इंडेक्सेशनसह 20 टक्के आणि इंडेक्सेशनशिवाय 10 टक्के एलटीसीजी कर लागू होता. अशाप्रकारे आता इंडेक्सेशनशिवाय वाढीव एलटीसीजी कर दि. 23 जुलै 2024 पासून लागू झाला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT