बाजारात बुल्स-बेअर्स संघर्ष आहे, असे मागील सोमवारच्या लेखाचे शीर्षक होते आणि गत सप्ताहात हा संघर्ष बेअर्सनी म्हणजे मंदीवाल्यांनी जिंकला, असा समज शुक्रवारची धूळधाण पाहून सर्वांचा होईल. निफ्टी 50, बँकनिफ्टी आणि सेन्सेक्स हे प्रमुख निर्देशांक सव्वादोन ते पावणेतीन टक्क्यांनी सप्ताहात घसरले; परंतु खरी दुर्दशा झाली ती मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सची. निफ्टी मिडकॅप 100 इंडेक्स सहा टक्क्यांनी, तर निफ्टी स्मॉल कॅप 100 इंडेक्स साडेसहा टक्क्यांनी कोसळला.
जे स्वयंभू तारे असतात, ते अशा वावटळीमध्येही चमकून उठतात. स्मॉलकॅप आणि मिडकॅप सेक्टर्समधील खालील काही शेअर्स पाहा :
J & K Bank - MRP Rs. 97.63
PNB Housing Finance - MRP Rs. 947.75
Aster DM - MRP Rs. 448.75
Indian Hotels - MRP Rs. 691.25
Coforge - MRP Rs. 7739.85
वरील शेअर्सपैकी J & K Bank हा शेअरचा All Time High आहे. 195.48 म्हणजे तिथून निम्म्यापेक्षाही कमी भावात हा शेअर आज मिळतो आहे. Aster DM सप्टेंबर 2023 ला रु. 30.79 कोटी तोटा दाखवत होती, ती सप्टेंबर 2024 ला रु. 96.84 कोटी नफा दाखवू लागली आहे. FIIS आणि Mutual Funds यांचे जवळपास 44 टक्के अॅलोकेशन या शेअर्समध्ये आहे. मॉर्गन स्टॅन्लेने इंडियन हॉटेल्सचे रेटिंग आणि टारगेट प्राईस दोन्ही वाढवले आहे. कंपनीची मार्जिन ग्रोथ आगामी काळात चांगली होईल, असे मॉर्गन स्टेन्लेचे मत आहे. जवळजवळ सार्या मार्केट अॅनालिस्टस्नी कोफोर्जची TOP MIDCAP IT Pick म्हणून निवड केली आहे. हा शेअर आज विक्रमी पातळीवर ट्रेड करतो आहे. सप्टेंबर अखेरच्या तिमाहीचे मजबूत निकाल पाहता, हा शेअर IT सेक्टरमध्ये खरोखरच Outperformer ठरणार यात शंका नाही. शेअर्समध्ये FII Holding 42.09 टक्के आणि MF Holding 35.52 टक्के अशी स्थितीत करणारी आहे.
Nifty Financial वगळता झाडून सारे सेक्टरल इंडायसेस गत सप्ताहात धाराशायी झाले. परंतु Nifty PSE, Nifty Realty आणि Nifty MNC हे तीन निर्देशांक अगदी गलितगात्र झाले; परंतु अशा समर प्रसंगीसुद्धा Oberoi Realty आणि Hindustan Zinc हे ग्रीन झोनमध्ये राहिलेले लढवय्ये शेअर्स ठरले. दोन्हीही कंपन्यांनी सप्टेंबरअखेर अतिशय दमदार आर्थिक आकडे सादर केले आहेत. शॉर्टटर्म गुंतवणूकदारांनी पुढील दिवाळीपर्यंत हे दोन्ही शेअर्स घेऊन ठेवावेत. अर्थात, त्यापूर्वी स्वतः सखोल अभ्यास करावा.
वरील दोन निर्देशांकाप्रमाणे Nifty MNC मधील खालील शेअर्सनी आणीबाणीच्या प्रसंगातही चमकदार कामगिरी केली.
3 M India - MRP Rs. 33748.65
Abbot India - MRP Rs. 28509.10
Crisil - MRP Rs. 5080
UBL - MRP Rs. 1983.60
JB Chem & Pharma - MRP Rs. 1891.90
सेक्टरल निर्देशांकांपैकी Nifty Financial हा एकमेव निर्देशांक मागील आठड्यात तेजीत राहील, हे आपण वर पाहिले. ज्या शेअर्समुळे हा इंडेक्स तेजीत राहिला, ते शेअर्स खालीलप्रमाणे आहेत.
1) Bajaj Finance Rs. 6910.15
2) HDFC Bank Rs. 1743.40
3) ICICI Bank Rs. 1255.45
4) Axis Bank Rs. 1189.35
5) ICICI Pru Life Rs. 742.85
6) MCX Rs. 6487.55
एचडीएफसी बँक ही गेली दोन वर्षे टीकेच्या धुराने काळवंडली होती. रु. 1363.55 या वर्षातील नीचांकापासून दमदारपणे वर येत ती आता रु. 1794 या उच्चांकाच्या जवळ ट्रेड करत आहे. बाजाराच्या द़ृष्टीने ही अतिशय चांगली गोष्ट आहे. याच्या उलट इंडसइंड बँकेची परिस्थिती! शुक्रवारी बाजार सुरू होताच हा शेअर जो धारार्तीथी पडला, तो आता इथून पुढे किती काळ तसाच राहील, याची शाश्वती नाही.
तेजस नेटवर्क या टाटा ग्रुपच्या शेअरने मागील आठवड्यात बहार आणली. त्याला अंबेर (Amber) आणि सिटीयुनियन बँक (CUB) यांनी चांगली साथ दिली; मात्र इंडसइंड बँक, चेन्नई पेट्रो, एलकॉन (Elecon) कंपीआयटी यांनी माहोल खराब केला.
येणार्या सप्ताहात Aster DM, Lupin, GMDC, Vishnu Chemicals, Yatharth Hospitals या शेअर्सकडे लक्ष द्यावे.
ऑक्टोबर महिन्यात Bulls Vs Bears हा जसा संघर्ष राहिला तसा आणखी एक जोरदार संघर्ष पाहायला मिळाला, तो म्हणजे FII Selling विरुद्ध DII Buying!! दोघांचेही आकडे 1 लाख कोटी पार करतील. सर्व गुंतवणूकदारांनी ऊखखड चे शतशः आभार मानले पाहिजेत; अन्यथा निफ्टीची आणि सेन्सेक्सची किती घसरगुंडी झाली असती, त्याची कल्पना केलेली बरी!
निफ्टी 24500 ची पातळी तोडणार नाही, असे वाटत होते; पण ती आशा फोल ठरली. शुक्रवारी 24000 ची भरभक्कम आधार पातळीही कोसळते काय, असे वाटत असतानाच 24073 पासून निफ्टीने 100 हून अधिक पॉईंटस्वरती येत क्लोजिंग दिले आहे. सोमवार आणि मंगळवारच्या दोन सत्रांत 24000 ची पातळी राखणे अत्यंत निकडीचे आहे कारण बुधवारी आणि गुरुवारी Monthly Expiry आहे. शॉर्ट कव्हरींग येणे क्रमप्राप्त आहे. तसे झाले तर 24073 लाच निफ्टीने बॉटम् आऊट केल्याची निश्चिती होईल. एक मात्र खरे, आता बाजारात खरेदी करणार्यांची पुढील दिवाळी किती दणक्यात साजरी होईल? सर्व ट्रेडर्स आणि गुंतवणूकदारांना आणि अर्थभानच्या वाचकांना ही दीपावली सुखा-समाधानाची आणि मनःशांतीची जावो!