भरत साळोखे, संचालक, अक्षय प्रॉफिट अँड वेल्थ प्रा. लि.
मागील सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी म्हणजे 8 ऑगस्ट रोजी निफ्टीने जो नीचांक दाखवला (24337.50) तोच निफ्टीच्या अलीकडच्या घसरणीतील आधार ठरावा, अशी प्रार्थना सर्व गुंतवणूकदार करत असतील आणि तसेच होईल. असे मागील चार दिवसांचा आठवडा दर्शवत आहे. कारण 24337.50 पासून जवळपास 300 पॉईंटस् वाढून गुरुवारी 24631.30 वर बंद झाला. निफ्टी बँक फ्लॅट राहिला. मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकही किंचित घसरणीसह बंद झाले.
प्लास्टिक कंपन्यांचे शेअर्स सप्ताहात चांगले वधारले. हे एक असे सेक्टर आहे, ज्याकडे सामान्य गुंतवणूकदारांचे लक्ष जास्त जात नाही. परंतु आजच्या घडीला हे अतिशय आश्वासक सेक्टर आहे. ई- कॉमर्सचा विस्तार आणि वाढते शहरीकरण यामुळे पॅकेजिंगला खूपच मागणी आली आहे. या क्षेत्रात Eco friendly आणि Recyclable उत्पादनांचे महत्त्व ओळखून कंपन्यांनी Innovation वर भर दिला आहे. शासनानेही या क्षेत्राला जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्याचे ठरविले आहे. अखंड मागणी आणि उज्ज्वल भविष्य यामुळे गुंतवणूकदारांनी या क्षेत्रातील कंपन्यांकडे नेहमी लक्ष द्यावे. काही प्रमुख कंपन्या खालीलप्रमाणे आहेत.
1) Supreme Industries Rs. 4307
2) Shailey Engineering Rs. 1833
3) Mold Tek Technolgies Rs. 154.50
4) Kingfa Science & Technologies Rs. 3818
5) Ddev Plastics Rs. 318.70
Rishabh Instruments ही Electric Equipment सेक्टरमधील एक कंपनी आहे. जी Test आणि Measuring Instruments, Industrial Control Products आणि CAM Switches बनवते. या वर्षीच्या पहिल्या तिमाहीमध्ये तिचा निव्वळ नफा 441 टक्क्यांनी वाढला. त्यामुळे हा शेअरही आठवड्यात पंचवीस टक्क्यांनी वाढला. (रु. 357.80) Electric Equipment सेक्टरची बाजारपेठ प्रचंड मोठी आहे. या सेक्टरअंतर्गत उत्पादित होणार्या वस्तूंमध्ये खूपच विविधता आहे आणि त्यांचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर होत असल्याने त्यांना मागणीही सतत आणि प्रचंड असते. परंतु हे क्षेत्रही सामान्य गुंतवणूकदारांकडून काहीसे दुर्लक्षित होत असते. खाली या सेक्टरमधील काही प्रसिद्ध कंपन्यांची यादी देत आहोत. त्या पहा.
ही यादी पाहिली आणि त्यांचे मागील पाच वर्षांतील रिटर्नस पाहिले तर हे क्षेत्र किती महत्त्वाचे आहे हे आपल्या लक्षात येईल. वरील यादीप्रमाणेच या सेक्टरमधील सर्व कंपन्यांची यादी आपण Screener, Ticker Tape, Finology वगैरे पोर्टल्सवरून घेऊ शकता आणि त्यामधील दर्जेदार कंपन्या निवडून त्यामध्ये गुंतवणूक करू शकता. आता दर्जेदार कंपन्या कशा निवडायच्या? ही प्रक्रिया थोडी दीर्घ आणि निरंतर अभ्यासाची असली तरी प्राथमिक पातळीवर प्रमुख निकष खालीलप्रमाणे.
P.E. Ratio - 20 पेक्षा कमी
ROE - 15 पेक्षा जास्त
ROCE - 15 पेक्षा जास्त
5 Yrs. Profit growth - 15 पेक्षा जास्त
5 Yrs. Sales growth - 15 पेक्षा जास्त
कंपनी Debt free असावी किंवा Debt असल्यास तिचे प्रमाण जितके कमी तितके चांगले. कंपनीत FIIS आणि DIIS यांनी गुंतवणूक केली असल्यास उत्तम.
टॅरिफ वाढीचे जोखड मानेवरून दूर करून बाजार उसळी घेण्याच्या विचारात आहे. कारण डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांचा फजितवाडा होताना दिसत आहे. चीनने ट्रम्प यांच्या धमकीचा सामना डोळ्यात डोळे घालून केला.
आता तर अमेरिकेचीच एक ग्लोबल रेटिंग एजन्सी s & p ने त्यांचा मुखभंग केला आहे. भारत आणि रशिया यांच्या अर्थ व्यवस्था खड्ड्यात जात आहेत असे म्हणत भारतावर 50 टक्के टॅरिफ वाढ आणि 1 टक्का पेनल्टी लादणार्या ट्रम्प यांच्यावर
s & p चा भारतावरचा रिपोर्ट वाचण्याची पाळी काही तासातच आली. एजन्सीने भारताचे क्रेडिट रेटिंग 2007 नंतर/म्हणजेच जवळजवळ 18 वर्षांनंतर प्रथमच BBB असे Upgrade केले आणि तसे करताना निरीक्षण नोंदवले. “अमेरिकन टॅरिफ वाढीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर अगदी नगण्य परिणाम होईल आणि ती येत्या तीन वर्षांत 6.8 दराने वाढेल. भारत निर्यातीवर कमी अवलंबून आहे आणि भारताची प्रचंड अंतर्गत बाजारपेठ भारताची प्रगती करण्यास समर्थ आहे”.
सोमवारी भारतीय बाजार Sky Rocket होईल काय?. वरील बातमी बाजाराला उंचीवर नेऊ शकते. परंतु वरील बातमीच्या जोडीने गुंतवणूकदारांच्या मुखात घी शक्कर पडावे तशी एक सुखद घटना घटली आणि ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना बाजाराची दिशा पूर्णपणे बदलू शकणार्या नऊ घोषणा केल्या. जागेच्या मर्यादेमुळे त्या घोषणा आणि त्या घोषणांच्यामुळे लाभ प्राप्त होणार्या कंपन्या खालीलप्रमाणे :
1) संरक्षण क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर लाभार्थी कंपन्या Bel, Hal, Bdl, Mazdock, GRSE, Cochin Shipyar.
2) सेमी कंडक्टर चीप्समध्ये आत्मनिर्भर लाभार्थी कंपन्या Kaynes Technology, Tata Elxi, HCL Tech. CG Power, Dixon Tech.
3) ग्रीन हाइड्रोजन, हाइड्रोपॉवर आणि न्युक्लीअर एनर्जीचा विकास
लाभार्थी कंपन्या NTPC Green, Adani Green, NHPC, SJVN, JSW Energy.
4) Critical , Minerals Missian लाभार्थी कंपन्या GMDC, Hind Copper, NMDC, OMDC, Hind Zinc.
5) अंतराळात बलवान होणे Space Super power लाभार्थी कंपन्या MTAR Teck, Data Patterns, Paras Defence, Azad Engineering
6) IT, AI आणि Digital India ला प्रोत्साहन लाभार्थी कंपन्या Paytm, One Mobikwik, Unico - mmerce, esolutions.
7) खतांमध्ये आत्मनिर्भरता लाभार्थी कंपन्या Chambal, Fact, RCF, Deepak, Fertilisers, Coromandel, Kaveri Seeds, Godrej Agrovet
8) GST Rate Cut लाभार्थी कंपन्या Ultratech, Asian Paints, LIC, HDFC Life, Maruti, HUL.
9) रु. 9 लाख कोटींची रोजगार निर्मिती योजना.