बीएसई सेन्सेक्सवरील टॉप १० पैकी ६ कंपन्यांच्या बाजार भांडवलात घट झाली आहे. (file photo)
अर्थभान

'या' टॉप ६ कंपन्यांनी गमावले १.५५ लाख कोटी; RIL ला सर्वाधिक फटका

Mcap of Top Companies | TCS च्या बाजार भांडवलात वाढ

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : शेअर बाजारातील घसरणीमुळ‍े बीएसई सेन्सेक्सवरील (BSE Sensex) टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे (Mcap of Top Companies) एकत्रित बाजार भांडवल (Mcap) गेल्या आठवड्यात १,५५,७२१.१२ कोटींनी कमी झाले. यात सर्वाधिक नुकसान रिलायन्स इंडस्ट्रीजचे झाले. गेल्या आठवड्यात बीएसई सेन्सेक्स २३७.८ अंक म्हणजेच ०.२९ टक्क्यांनी घसरला. यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries), भारती एअरटेल, ICICI Bank, आयटीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि भारतीय जीवन विमा निगम (LIC) यांच्या बाजारात भांडवलात घट झाली. तर दुसरीकडे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, HDFC Bank, इन्फोसिस आणि भारतीय स्टेट बँक यांचा फायदा झाला.

रिलायन्स इंडस्ट्रीजचा फटका

बिझनेस स्टॅँडर्डने 'पीटीआय'च्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल ७४,५६३.३७ कोटी रुपयांनी घसरून १७,३७,५५६.६८ कोटी रुपयांवर आले. भारती एअरटेलचे बाजार भांडवल २६,२७४.७५ कोटी रुपयांनी कमी होऊन ते ८,९४,०२४.६० कोटी रुपयांवर आले. ICICI बँकेचे बाजार भांडवल २२,२५४.७९ कोटींनी घसरून ८,८८,४३२.०६ कोटींवर आले. ITC ते बाजारमूल्य १५,४४९.४७ कोटी रुपयांनी कमी होऊन ते ५,९८,२१३.४९ कोटी रुपयांपर्यंत खाली आले. LIC चे बाजार भांडवल (mcap) ९,९३०.२५ कोटींनी घसरून ५,७८,५७९.१६ कोटींवर आणि हिंदुस्तान युनिलिव्हरचे बाजार भांडवल ७,२४८.४९ कोटींनी घसरून ५,८९,१६०.०१ कोटी झाले.

TCS च्या बाजार भांडवलात वाढ

दरम्यान, TCS कंपनीचे बाजार भांडवल ५७,७४४.६८ कोटी रुपयांनी वाढून १४,९९,६९७.२८ कोटी रुपयांवर पोहोचले. इन्फोसिसचे बाजार भांडवल २८,८३८.९५ कोटींनी वाढून ७,६०,२८१.१३ कोटींवर गेले. एसबीआयचे बाजार भांडवलात १९,८१२ कोटींची वाढ झाली आहे. तर एचडीएफसीचे बाजार भांडवल १४,६७८.०९ कोटींनी वाढून ते १३,४०,७५४.७४ कोटींवर पोहोचले आहे.

तरीही रिलायन्स देशातील सर्वाधिक मौल्यवान कंपनी

रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील सर्वाधिक मौल्यवान कंपनी आहे. त्यापाठोपाठ टीसीएस, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, स्टेट बँक ऑफ इंडिया, आयटीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि एलआयसी यांचा क्रमांक लागतो.

बाजारात दबाव, कारणे काय?

कार्पोरेट कंपन्यांची कमकुवक कमाई, परदेशी गुंतवणूकदारांकडून होत असलेला विक्रीचा मारा आदी कारणांमुळे शेअर बाजारात घसरण दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT