तेजीच्या पवित्र्यात बाजार; पण कराराची आशंका. (Pudhari File Photo)
अर्थभान

Stock Market | तेजीच्या पवित्र्यात बाजार; पण भारत-अमेरिका कराराची आशंका

पूर्ण आठवडा भारत-अमेरिका संभाव्य कराराच्या सावटामध्ये गेला

पुढारी वृत्तसेवा

भरत साळोखे, संचालक, अक्षय प्रॉफिट अँड वेल्थ प्रा. लि.

पूर्ण आठवडा भारत-अमेरिका संभाव्य कराराच्या सावटामध्ये गेला. 9 जुलैपूर्वी हा करार अस्तित्वात आला पाहिजे, अन्यथा ट्रम्प यांनी जाहीर केल्याप्रमाणे अमेरिका भारतीय निर्यातीवर 36 टक्के टॅरिफ आकारेल.

FIIS नी सावधगिरी बाळगून थोडीफार विक्री करणे पसंत केले, तर DIIS नी पाचही दिवस खरेदी केली; पण तीही हातचे राखून, विशेष काहीही घडामोडी न घडलेला असा हा सुस्त सप्ताह होता. ऑक्टोबर 2024 पासून फेब्रुवारी 2025 पर्यंत पाच महिन्यांमध्ये परदेशी वित्त संस्थांनी सुमारे साडेतीन लाख कोटींची निव्वळ विक्री केली. परंतु, फेबु्रवारी महिन्यात केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये मध्यमवर्गीयांना जी प्रचंड कर सवलत मिळाली, ती पाहून तसेच रिझर्व्ह बँकेने व्याजदर कमी करण्याला सुरुवात करून विकासाभिमुख भूमिका घेतलेली पाहून परदेशी वित्त संस्थांनी मार्च 2025 पासून पुन्हा भारतीय बाजारात खरेदी सुरू केली. आता भारत-अमेरिका करार समाधानकारक झाला, तर परदेशी गुंतवणुकीचा ओघ जोरदारपणे सुरू होईल.

NSE चा IPO या वर्षीच्या चौथ्या तिमाहीमध्ये येईल. BSE आणि MCX या दोन एक्स्चेंजीसच्या शेअर्सनी त्यांच्या नोंदणीपासून गुंतवणूकदारांना दिलेला भरघोस परतावा पाहून सर्वजण आतुरतेने NES च्या IPO ची वाट पाहात आहेत. अनलिस्टेड शेअर्स मार्केटमध्ये NSE च्या शेअरची किंमत शुक्रवारी रु. 2275 होती. मागील एका वर्षात तो 83 टक्के वाढला आहे. यानिमित्ताने एक बातमी सर्व बिझनेस पोर्टलस्वर मागील सप्ताहात प्रसिद्ध झाली, ती अशी - 30 जून 2025 अखेर LIC ची भारतीय बाजारात 98 स्टॉकस्मध्ये गुंतवणूक आहे आणि ती आहे 2,38,962 कोटी रु. इतकी प्रचंड ! 98 स्टॉकस्पैकी टॉप टेन स्टॉकस्मध्ये NSE चा स्टॉकदेखील आहे. इतकेच नव्हे, तर गेल्या वर्षभरातील NSE च्या भावातील तेजीमुळे तो LIC च्या टॉप टेनमध्ये पाचव्या क्रमांकावर आला आहे. NSE चे LIC कडे 10.7 टक्के (26.53 कोटी) शेअर्स आहेत आणि त्यांची एकूण व्हॅल्यू आहे 66,319 कोटी रु.!

वरील यादीतील IDBI बँकेमधील एका शॉर्ट टर्म गुंतवणुकीविषयी थोडे बोलू या. सध्या या बँकेमध्ये President of India ची म्हणजेच सरकारची मालकी आहे. 45.48 टक्के आणि 49.24 टक्के हिस्सेदारी LIC कडे आहे. म्हणजे एकूण 94.72 टक्के मालकी सरकारी आहे. आता सरकार त्यामधील साठ टक्के गुंतवणूक कमी करणार आहे. ही सर्व प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून सप्टेंबर 2025 पासून प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात होईल आणि मार्च 2026 पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल. सरकार राष्ट्रपतींकडे असलेल्या 45.48 टक्के शेअर्सपैकी 30.48 टक्के आणि LIC कडे असलेल्या 49.24 टक्के शेअर्सपैकी 30.4 टक्के शेअर्सची विक्री करेल.

या निर्गुंतवणुकीतून सरकारला 47000 कोटी रुपयांची अपेक्षा आहे, हे उद्दिष्टे साध्य करण्यासाठी IDBI च्या शेअर्सच्या विक्रीचे डील किमान रु.150 भावाने होईल. म्हणजे आज शेअरचा भाव आहे रु. 101 आणि त्यावर जास्तीत जास्त नऊ महिन्यांमध्ये पन्नास टक्के फायदा आणि शिवाय हे डील ज्या कंपनीसोबत होईल तिच्या ब्रँडचा लाभही Value Addition मध्ये होईल. सध्या तरी हे चित्र असे आहे. आजच्या हिशोबाप्रमाणे सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडली, तर किमान 70 ते 75 टक्के फायदा येत्या नऊ महिन्यांतच व्हायला हरकत नाही. परंतु, आपल्याला हेही माहीत आहे. शेअर बाजारात कुणालाही कशाचीही खात्री देता येत नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांनी या प्रक्रियेचा स्वतः खोल अभ्यास करावा आणि निर्णय घ्यावा.

Asahi India Glass Company हे ऑटोमोटिव्ह आणि आर्किटेक्चरल सेक्टर्सना लागणारी सर्व प्रकारची काच उत्पादन करणारी दर्जेदार, अग्रगण्य कंपनी आहे. शुक्रवारी तिच्या शेअरचा भाव रु. 843 होता. शेअर सध्या अश्रश्र ींळाश हळसह ला आहे. चार्टचे स्ट्रक्चर पाहता हा शेअर रु. 1000 पर्यंत जाण्यास आतूर आहे. या शेअरप्रमाणेच खालील तीन शेअर्सदेखील त्यांच्या उच्च पातळीवर आहेत आणि तरीसुद्धा आजही ते गुंतवणूक करण्यासाठी आकर्षक वाटतात.

JM Financials - Rs. 165.70

Apollo Hospitals - Rs. 7550

Ultratech Cement - Rs. 12505

बहुचर्चित HDB Financial Services चा IPO सोहळा 2 जुलैला पार पडला. HDFC बँकेची उपकंपनी असलेल्या HDB चा शेअर 14 टक्के प्रीमिअमने रु. 835 च्या भावाने नोंदणीकृत झाला.

अलीकडे HDB च्या IPO च्या निमित्ताने Unlisted शेअर्सबद्दल गुंतवणूकदारांच्या मनात बरेच कुतूहल निर्माण झाले आहे. Unlisted Shares चे मार्केट कसे आहे. त्याची कार्यपद्धती कशी असते आणि सर्वसामान्य लोकांनी त्यामध्ये गुंतवणूक कशी करावी, याबद्दल सविस्तर माहिती पुढे कधीतरी देता येईल.

हा सप्ताह Trade Deal चा असेल. भारताला अनुकूल असा करार झाला, तर बाजारात चांगली तेजी येईल आणि त्याचीच जास्त शक्यता आहे. अशावेळी खालील शेअर्स तुमच्या नजरेखाली असू द्यात.

1) Parag Milk Foods - Rs. 231.70

2) KRBL - Rs. 393.20

3) MRPL - Rs. 150.79

4) Gravita - Rs. 1855

5) HBL Engineering - Rs.1041.40

6) Sudarshan Chemicals - Rs. 1254.60

7) KSB - Rs. 829.75

8) Techno Electric - Rs.1575.50

9) L & T Finance - Rs. 205.63

10) Zensar Tech - Rs. 852.65

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT