Union Budget 2024 Mudra loans
मुद्रा कर्ज मर्यादेत दुपटीने वाढ करण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसकंल्पातून केली आहे.  Pudhari File Photo
अर्थभान

Union Budget 2024 Mudra loans | मुद्रा कर्ज मर्यादेत दुपटीने वाढ, अर्थमंत्र्यांची घोषणा

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसकंल्पातून मुद्रा कर्जाची मर्यादा सध्याच्या १० लाख रुपयांवरून २० लाख रुपये करण्याची घोषणा केली आहे. ज्यांनी तरुण श्रेणी अंतर्गत कर्ज घेतले आणि यशस्वीपणे कर्जाची परतफेड केली त्यांच्यासाठी मुद्रा कर्जाची मर्यादा सध्याच्या १० लाख रुपयांवरून २० लाख रुपये केली जाईल, असे सीतारामन यांनी म्हटले आहे. (Union Budget 2024 Mudra loans)

तसेच रोजगार आणि कौशल्य निर्मितीसाठी ५ योजनांचे पीएम पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. मोदी 3.0 सरकारने अर्थसंकल्पातून शिक्षण, रोजगार आणि कौशल्यासाठी दोन लाख कोटींची तरतूद केली आहे.

मुद्रा किंवा मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सीद्वारे सूक्ष्म उद्योगांना वित्त पुरवठा केला जातो. या अंतर्गत आतापर्यंत तीन श्रेणी आहेत. त्यात शिशू ( ५० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज), किशोर (५० हजार ते ५ लाख रुपयांचे कर्ज) आणि तरुण (५-१० लाख रुपये) या श्रेणींचा समावेश आहे.

SCROLL FOR NEXT