LIC Share Crash: देशातील सर्वात मोठी वीमा कंपनी एलआयसीचे शेअर मंगळवारी बाजार उघडताच धडाधड कोसळले. या शेअरमध्ये विक्रीचा जबरदस्त ट्रेंड पहायला मिळाला. यामुळे एलआयसीच्या शेअर्समध्ये पाहता पाहता ९ टक्क्यांची घसरण झाली. हा क्रॅश फक्त एका वाईट बातमीमुळं आला आहे.
सरकारकडून सध्याच्या मार्केट रेटच्या फार कमी रेटने एलआयसीची हिस्सेदारी विकरण्यात येणार आहे अशी बातमी आली. त्यानंतर गुंतवणूकदारांचा मूड चांगलाच खराब झाला.
सरकार आपली हिस्सेदारी विकण्याच्या योजनेवर काम करत असून एलआयसीमधील ६.५ टक्के हिस्सेदारी विकण्याची तयारी आहे. सुरूवातीला OFS च्या माध्यमातून एलआयसीमधील सरकारची २ टक्के हिस्सेकारी विकत आहे. जर योग्य मागणीअसेल तर ४.५ टक्के हिस्सेदारी विकण्याचा पर्याय देखील खुला असणार आहे.
सरकारकडून एलआईसीच्या ऑफर फॉर सेलासाठी किमान मुल्य ३८२ रूपये प्रती शेअर निश्चित केले आहे. या दृष्टीकोणातून पाहिलं तर सरकारचा प्लॅन हिस्सेदीर विकण्याऐवजी यातून ३१ हजार ४०० कोटी रूपये गोळा करण्याचा आहे.
एलआयसीचे शेअर पडण्यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे OFS द्वारे विक्री करण्यात येणाऱ्या शेअर्सची किंमत ही सोमवारी मार्केट क्लोजिंगवेळी एलआयसी शेअर प्राईसच्या तुलनेत जवळपास ११ टक्क्यांनी कमी होते. २०२२ मध्ये एलआयसीने आपला आयपीओ बाजारात आणाल होता. त्यानंतरही सरकारने वीमा कंपनीत आपली मोठी हिस्सेदारी कायम ठेवली होती.
सरकारकडे सध्याच्या घडीला एलआयसीमध्ये ९६.५ टक्के स्टेकहोल्डिंग आहे. सार्वजनिक शेअरधारकांकडे फक्त ३.५ टक्के हिस्सेदारी आहे. एलआयसीला मे २०२७ मध्ये आपले किमान पब्लिक शेअर होल्डिंग हे वाढवून १० टक्के करण्यासाठी वेळ देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने OFS मध्ये पूर्ण ६.५ टक्के पर्यायाचा वापर केला तर एलआयसीची ही गरज देखील पूर्ण होते.
सोमवारी बाजार बंद झाला त्यावेळी LIC Share ४२४.४० रूपयांवर क्लोज झाला होता. मंगळवारी बाजार उघडताच तो घसरून ३९२ रूपयांवर आला. त्यानंतर तो ३९० रूपयांपर्यंत घसला. एलआयसीचे शेअर घसरल्यावर त्याचा परिणाम हा त्याच्या मार्केट व्हॅल्यूवर देखील झाला. ती घसरून ५.०३ लाख कोटी पर्यंत घसरली.