यावेळचा चकाकता हिरा म्हणून केपीआर मिलचा विचार करता येईल. वस्त्रोद्योग कंपन्यातील ही एक मोठी कंपनी आहे. मार्च 2019 च्या पूर्ण वर्षाची विक्री 3384 कोटी रुपये होती. मार्च 2020 साठी ती 3857 कोटी रुपये होती. मार्च 2021 साठी ती 4282 कोटी रुपये व्हावी. या तीन वर्षांचा ढोबळ नफा अनुक्रमे प्रत्यक्ष/भविष्यकालीन 6442 कोटी, 7373 कोटी व 8165 कोटी रुपये व्हावा. शेअरगणिक उपार्जन या तीन वर्षांसाठी 46.15 रुपये, 52.85 रुपये, 60.36 रुपये व्हावा. सध्याच्या भावाला किं/गु. गुणोत्तर 12.39 पट दिसते. पुढील दोन वर्षासाठी ते 10.82 पट व 9.47 पट इतके आकर्षक होईल. जून 2019 तिमाहीचा नफा नेहमीप्रमाणे वाढल्या प्रमाणावर असेल. प्रवर्तकांकडे भाग भांडवलापैकी 74.99 टक्के शेअर्स आहेत. त्यामुळे बाजारात अन्य निदेशकांसाठी फक्त 25.01 टक्के इतकेच उपलब्ध असतील. कंपनीला अरविंद लिमिटेड, इंडो काऊंट इंडस्ट्रीज यांची स्पर्धा असेल.
सध्या अरविंद मिल्सची किंमत 489 रुपये आहे. या भावाला शेअरगणिक उपार्जन 9.24 पट पडते. अरविंद मिल्सचे किं/ऊ. गुणोत्तर 52.93 पट आहे. सध्याची शेअरची किंमत पुस्तकी मूल्यापेक्षा 2.35 पट आहे. जून 2019 च्या तिमाहीसाठी विक्री 901 कोटी रुपये होती. या तिमाहीत तशी त्यात फारशी वाढ नाही. नफाही 13 टक्के कमी झाला आहे. म्हणूनच यापुढे नफा जास्त होण्याची शक्यता आहे. रोजचा व्यवहार सध्या 5 ते 10 हजार शेअर्सचा होता. बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, अपोलो टायर्स, बाळकृष्ण इंडस्ट्रीज या शेअर्सप्रमाणे हाही शेअर भविष्यात बर्याच प्रमाणात वाढेल.