Specialized Investment Fund (File Photo)
अर्थभान

Specialized Investment Fund | स्पेशलाईज्ड इन्व्हेस्टमेंट फंड, गुंतवणुकीचे नवे माध्यम, जाणून घ्या याविषयी...

Special Investment Fund | भविष्यात मोठी गुंतवणूक करण्याची संधी, स्पेशल इन्व्हेस्टमेंट फंड हे एक गुंतवणुकीचे नवे माध्यम

पुढारी वृत्तसेवा
विवेक कुलकर्णी

Specialized Investment Fund

शेअर बाजारावर नियंत्रण ठेवणाऱ्या सेबीकडे फंड हाऊसेसकडून स्पेशलाईज्ड इन्व्हेस्टमेंट फंडचे (एसआयएफ) दोन अर्ज दाखल झाले असून, या १० दिवसांच्या कालावधीत त्यांना संमती मिळण्याची शक्यता आहे. हे दोन्ही अर्ज मंजूर झाले तर गुंतवणूकदारांना या नव्या स्कीम्समध्ये गुंतवणूक करता येणार आहे.

स्पेशल इन्व्हेस्टमेंट फंड हे एक गुंतवणुकीचे नवे माध्यम आहे. अलीकडील काही वर्षात म्युच्युअल फंड आणि पोर्टफोलिओ मॅनेजमेंट स्कीम (पीएमएस) यांच्यातील तफावत प्रकर्षाने जाणवत आली आहे. पीएमएसमधील गुंतवणूक ५० लाख रुपये इतकी असते. त्यामुळे सर्वांनाच ती शक्य असत नाही. मात्र, म्युच्युअल फंडत्या तुलनेत बरीच लवचिक असते. म्युच्युअल फंडमध्ये अगदी १०० रुपये सुद्धा गुंतवता येतात आणि कमाल मर्यादेचे कोणतेही बंधन असत नाही.

या दोन्ही गुंतवणूक योजनांमध्ये जमीन-अस्मानचे अंतर आहे. हे अंतर, ही तफावत दूर करण्यासाठी सेबीने 'एसआयएफ' ही नवी गुंतवणूक योजना अंमलात आणण्याचा निर्णय घेतला. या गुंतवणूक योजनेसाठीची अंतिम मार्गदर्शक तत्त्वे लवकरच जाहीर केली जातील.

'एसआयएफ' मधील गुंतवणूक

'एसआयएफ'मध्ये प्रत्येक गुंतवणूकदाराकरिता किमान गुंतवणूक रक्कम १० लाख रुपये इतकी असणार आहे. फंड हाऊस यासाठी एसआयपी व एसडब्ल्यूपीचे पर्याय उपलब्ध करून देऊ शकते. एसआयएफ ओपन एंडेड, क्लोज एंडेड किंवा इंटर्व्हल बेस्ड असू शकतात. त्या तुलनेत अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंडमधील (एयूएम) किमान गुंतवणूक मर्यादा १ कोटी रुपये इतकी असते आणि भविष्यात यातून निर्गुतवणूक करायची असेल तर त्यासाठी १५ दिवसांचा नोटीस पिरियड असतो. त्या तुलनेत म्युच्युअल फंडमधील पैसे काढण्यासाठी अगदी ३ दिवसांचा कालावधीही पुरेसा असतो.

पात्रतेचे निकष

एसआयएफ सुरू करण्यासाठी सेबीने दोन नियमांनुसार पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. पहिल्या नियमानुसार, एसआयएफसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या फंड हाऊसचे मागील तीन वर्षातील असेटस् अंडर मॅनेजमेंट (एयूएम) १० हजार कोटींपेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. यातील दुसरा पर्याय म्हणजे फंड हाऊसकडे सरासरी एयूएम ५ हजार कोटींपेक्षा अधिक एयूएमचा कार्यभार सांभाळण्याचा किमान १० वर्षांचा अनुभव असणारा चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर नेमणे आवश्यक असेल. सदर फंड हाऊसकडे अतिरिक्त फंड मॅनेजर आणि ५०० कोटींचे एयूएम हाताळण्याचा तीन वर्षांचा अनुभव असणे अनिवार्य आहे.

गुंतवणूक धोरणांची ऑफर

सेबीने फंड हाऊसेसना तीन धोरणात्मक ऑफरची परवानगी दिली आहे. इक्विटी लाँग-शॉर्ट, इक्विटी एक्स टॉप-१०० लाँग शॉर्ट फंडस् व सेक्टर रोटेशन फंडस्चे इक्विटी ओरिएंटेड स्ट्रॅटेजी, डेब्ट लाँग-शॉर्ट फंडस्, सेक्टरल डेब्ट फंडस्चे डेब्ट ओरिएंटेड स्ट्रॅटेजी, हायब्रिड लाँग शॉर्ट फंडस्चे हायब्रिड स्ट्रॅटेजीचा यात समावेश आहे. सध्याच्या रचनेप्रमाणे प्रत्येक एसआयएफमधील प्रत्येक कॅटेगरीसाठी एकच स्ट्रॅटेजीला संमती आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT