India US Trade Deal | ट्रेड डीलला विलंब; बाजारात संभ्रम Pudhari File Photo
अर्थभान

India US Trade Deal | ट्रेड डीलला विलंब; बाजारात संभ्रम

पुढारी वृत्तसेवा

भरत साळोखे, संचालक, अक्षय प्रॉफिट अँड वेल्थ प्रा. लि.

अपेक्षित घटनाक्रम लांबणीवर पडू लागला की तगमग वाढू लागते. ही गोष्ट जशी मानवाच्या बाबतीत खरी आहे, तशी ती शेअर बाजाराच्या बाबतीत अधिकच खरी आहे. कारण शेअर बाजार चालवणारा मानवच असतो आणि अलीकडे तर शेअर बाजार आकड्यांपेक्षा अधिक भावनांवरच हिंदोळू लागला आहे.

भारत-यूएस ट्रेड डील होणार असल्याच्या वार्तेने सोमवारी आणि बुधवारी हर्षोत्फुल झालेला बाजार ट्रेड डीलमधील विलंब सहन करू शकला नाही. फेडरल रिझर्व्हने 25 पॉईंटस्नी व्याजदर कमी केले खरे; पण नंतरच्या पॉवेल यांच्या Commentary ने त्यातील सकारात्मकता पार नाहीशी करून टाकली आणि भारतीय बाजार धाराशायी झाला. अशावेळी मंदीवाली लॉबी टपून बसलेली असते.

सप्ताहाची अखेर घसरणीत झालेली असली, तरी ऑक्टोबर महिन्यात बाजाराने तेजी दर्शवली आहे. सप्ताहाच्या अखेरीस अर्धा ते पाऊण टक्का घसरण दाखविणारे निफ्टी, निफ्टी बँक आणि सेन्सेक्स हे मुख्य निर्देशांक मासिक पातळीवर साडेचार ते पावणेसहा टक्के तेजी दाखवत आहेत. मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्स बाजारात हळूहळू रंग भरू लागले आहेत. गेल्या आठवड्यातही बाजारात मंदी असली, तरी मिड कॅप इंडेक्स पाऊण टक्के तर स्मॉल कॅप इंडेक्स अर्धा टक्का तेजी दाखवत होते. वास्तविक, काही प्रमुख मिड कॅप कंपन्यांनी इतके शानदार Q2 रिझल्टस् सादर केले आहेत आणि त्या शेअर्समध्ये जबरदस्त उसळीही दिसून आली आहे. परंतु, एकूणच निराशेचे वातावरण पाहता समग्र बाजार काही त्यामुळे वर गेला नाही. उदाहरणार्थ, खालील काही शेअर्स पाहा.

Chennai Petro - Rs. 979.35 मासिक वाढ 26.80%

Five Star - Rs. 652.75

मासिक वाढ 21.55%

Blue Dart - Rs. 6572

मासिक वाढ 18.08%

Welspun Corp - Rs. 965.75 मासिक वाढ 15.80%

Bhel - Rs. 265.49

मासिक वाढ 15%

Navin Fluorine ने अखेरच्या दिवशी 15 टक्के वाढून धमाल उडवून दिली. कंपनीच्या इतिहासातील आजपर्यंतची सर्वाधिक विक्री आणि उत्कृष्ट तिमाही निकालानंतरचे कंपनीने भविष्यातील वाटचालीविषयी दाखवलेला आत्मविश्वास त्याला कारणीभूत ठरला.

Navin Fluorine बरोबर खालील काही कंपन्यांनी बाजाराच्या अंदाजापेक्षा सरस कामगिरी सादर केली.

Shriram finance नेट प्रॉफीट 8.1%ने वाढ

Kalpataru Projects नेट प्रॉफीट 21% ने वाढ

Bharat Electronics (Bel.) नेट प्रॉफीट 14.7% ने वाढ

TD Power System नेट प्रॉफीट 46% ने वाढ

Unlted spirits नेट प्रॉफीट 34.5% ने वाढ

Lodha Developers नेट प्रॉफीट 41.4% ने वाढ

असेच बाजारावर प्रभाव टाकणारे रिझल्टस् देणार्‍या महत्त्वाच्या कंपन्यांमध्ये ITC, Swiggy, Grindwell Nortan, Hyundai Motor, Cipla, Canara Bank, HPCL, VST Industris, PB Fintech, Sagility, BHEL, Apar Industries, Varun Beverages वगैरे कंपन्यांचा समावेश आहे. ही यादी खूपच मोठी आहे. पण, काही महत्त्वाचे उल्लेख करायचे तर TTK Prestige चा नेट प्रॉफीट 112.5 टक्क्यांनी वाढला.

Chennai Petro, Wellspun Corp, Bhel, Heg, MRPL, R R Kabel, Graphite, HBL Engineering JSW Steel हे शेअर्स पुन्हा एकदा तेजीच्या मार्गावर धावू लागले आहेत. United Spirits, Tilak nagar Industries, Kirloskar Oil Engines, Federal Bank, Canara Bank आस्ते कदम आगेकूच करत आहेत.

आता खालील काही शेअर्स पाहा. या शेअर्सना विविध ब्रोकर्सनी 100 टक्क्यांहून अधिक Gain Potential बहाल केले आहेत.

Virinchi - Rs. 28.22 Target 67.00 (137.42%)

Hindustan Constrn - Rs. 28.54 Target 64.00 (124.25%)

HG Infra - Rs. 922.30 Target 1900 (106.01%)

Ganesha Ecosphere - Rs. 1220.20 Target 2459 (101.52%)

Restayrant Brands - Rs. 67.23 Target 135 (100.80%)

येत्या आठवड्यात सहा प्रमुख IPO बाजारात येतील. त्यापैकी Studds Accessories आणि Lenskarat Solutions चे इश्यू 30 आणि 31 ऑक्टोबरला ओपन झाले आहेत. लेन्सकोर्टच्या आयपीओकडे गुंतवणूकदारांचे अधिक लक्ष आहे. भारतातील सर्वात मोठी Eyewear Retailer कंपनी असलेल्या लेन्सकार्टचे व्हॅल्युएशन्स महाग असल्याचेही तज्ज्ञांनी सांगितले आहे.

हा IPO लाभ सर्वच गुंतवणूकदारांच्या वाट्याला आलेला नाही. खालील IPOS नी गुंतवणूकदारांची चांगलीच निराशा केली.

Mittal Sections आजअखेर तोटा 63%

Shloka Dyes आजअखेर तोटा 27.6%

NSB BPO Solutions आजअखेर तोटा 24.7%

Om Freight Forwarders आजअखेर तोटा 32.8%

Chirahori आजअखेर तोटा 38.2%

मागील काही महिन्यांमध्ये भक्कम आधार पातळी बनलेल्या 25700 च्या वरती निफ्टीने शुक्रवारी क्लोजिंग दिले आहे. हा एक दिलासा आहे. ट्रेड डील होणे बाजाराच्या द़ृष्टीने अत्यावश्यक आहे, अन्यथा मंदीवाल्यांच्या हाती कोलीत तयारच आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT