Income Tax Return, ITR
आयटीआर भरण्याची अंतिम तारीख File Photo
अर्थभान

Income Tax Return : ३१ जुलैपूर्वीच करा आयटीआर दाखल

पुढारी वृत्तसेवा

आयटीआर दाखल केल्यास पुढील फायदे मिळतात.

आर्थिक वर्ष 2024 साठी इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) दाखल करण्याची अंतिम मुदत 31 जुलै ही आहे; परंतु करदात्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत थांबू नये. कारण वेळेवर आयकर परतावा अर्ज दाखल केल्याने जे फायदे मिळतात ते दीर्घकाळासाठी उपयुक्त ठरतात. Income Tax Return

अंतिम मुदतीपूर्वी आयकर परतावा अर्ज अर्थात आयटीआर दाखल केल्यास पुढील फायदे मिळतात.

आयटीआर का दाखल करावा?

कायदेशीर अनुपालन, दंड टाळणे, कर्ज आणि व्हिसा अर्ज सुलभ करण्यासाठी आयटीआर भरणे महत्त्वाचे आहे. हे करदात्याला परताव्याचा दावा करण्यात मदत करते, तसेच उत्पन्नाचा पुरावा देते आणि पारदर्शकता दर्शवते.

आयटीआर दाखल करणे ही कायदेशीर आवश्यकता आहे. करदात्याची एकूण मिळकत आयकर विभागाने ठरवून दिलेली मूळ सूट मर्यादा ओलांडत असल्यास, करदात्याला रिटर्न भरणे आवश्यक असते. Income Tax Return

रिटर्न 31 जुलैपूर्वीच का भरावे?

दंड किंवा विलंब शुल्क नाही.
अंतिम मुदतीपूर्वीच तुमचा आयटीआर अर्ज दाखल केल्यास तुम्हाला दंड आणि व्याज आकार टाळण्यास मदत होते. तुम्ही 31 जुलैची अंतिम मुदत चुकवल्यास, तुम्हाला विलंब शुल्क लागू शकते.

बिनचूक व पुरेसा वेळ

लवकर दाखल केल्याने तुमचा टॅक्स रिटर्न अचूक असल्याची खात्री करून तुम्हाला सर्व आवश्यक कागदपत्रे आणि माहिती गोळा करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो.

परताव्यासाठी पात्र

परताव्याचा दावा करण्यासाठी वेळेवर दाखल करणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या वास्तविक दायित्वापेक्षा जास्त कर भरला असल्यास, तुम्ही प्राप्तिकर विभागाकडून परतावा मिळण्यास पात्र ठरता.

पडताळणी

कर भरल्यानंतर तुम्हाला त्याची पडताळणीही करावी लागेल. कर कायद्यांतर्गत, तुम्ही फाईल केल्याच्या 30 दिवसांच्या आत तुमचा आयटीआर सत्यता तपासणे आवश्यक आहे. लवकर दाखल केल्याने तुम्हाला तुमचा रिटर्न तपासण्यासाठी आणि आवश्यक असणार्‍या कोणत्याही त्रुटी सुधारण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. Income Tax Return

क्रेडिट स्कोर सुधारणा

क्रेडिट स्कोअर चांगला राखण्यासाठी तुमचे आयकर रिटर्न 31 जुलैपूर्वी फाईल करावे. तुम्ही कर्ज किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज करता तेव्हा बँका आणि वित्तीय संस्था अनेकदा तुमच्या आर्थिक स्थिरतेचा पुरावा म्हणून आयटीआर ग्राह्य मानतात. वेळेवर दाखल केलेला आयटीआर हा तुमची आर्थिक शिस्त दर्शवितो तसेच अनुकूल अटींवर क्रेडिट मिळवण्याचा मार्ग सुखकर बनवतो.

वेळेची बचत

अंतिम मुदतीपूर्वी आयटीआर भरून तुम्ही शेवटच्या क्षणी होणारी गर्दी आणि संभाव्य त्रुटी टाळू शकता. यातून तुम्ही फक्त कर कायद्यांचेच पालन करत नाही, तर आगामी वर्षासाठीची तुमची आर्थिक शिस्त चांगल्या प्रकारे बनवू शकता.

आवश्यक कागदपत्रे

  1. पॅन कार्ड श्रआधार कार्ड

  2. तुमच्या नियोक्त्याकडून फॉर्म-16

  3. बँकांकडून फॉर्म-16 आणि इतर टीडीएस प्रमाणपत्रे

  4. वार्षिक माहिती विधान (एआयएस)

  5. फॉर्म 26-ड

  6. कर बचत गुंतवणूक आणि खर्चाचे पुरावे

  7. बँक खाते तपशील श्रविविध स्रोतांकडून इतर उत्पन्नाचा पुरावा.

SCROLL FOR NEXT