अर्थभान

आयकर रिटर्न भरताना… | पुढारी

Pudhari News

सतीश डकरे : आर्थिक वर्ष 2020-2021 चे आयकर रिटर्न भरण्या संदर्भात सरकारकडून नवीन रिटर्न फॉर्म जाहीर करण्यात आले असून नोकरदार (पगारदार), पेन्शनर, लहान व्यापारी, यांना रिटर्न भरण्याची मुदत (पेनल्टी) दंडाशिवाय 31.07.2021 पर्यंत आहे.

आयकर इन्कमटॅक्स रिटर्न भरताना मुख्यत्वे आपला 26AS / 16 / 16A फॉर्म व्यवस्थित तपासून तसेच आपले मागील आर्थिक वर्षातील आपल्या उत्पन्‍नाचा ताळमेळ घालून आपले आयकर रिटर्न भरावे. 

सध्याच्या कोरोना संकटामुळे टी.डी.एस. रिटर्न भरण्याची तारीख 31 मे 2021 पर्यंत वाढवल्यामुळे सर्वांनी आपले रिटर्न 15 जून 2021 नंतर भरल्यास त्यांना रिटर्न भरण्यास लागणारी सर्व माहिती 26AS व्यवस्थित मिळू शकेल व त्यांना त्यांचे आयकर रिटर्न बिनचूक भरता येतील.

प्रे-फिल्ड आयकर रिटर्न – अंशत: भरलेले आयकर रिटर्न (परतावा)

चालू आर्थिक वर्षापासून इन्कमटॅक्स ऑफिसने आपल्याकरिता अंशत: भरलेले नवीन रिटर्न फॉर्म देण्याचे योजिले असून यामध्ये आपल्याला ITR1 (सहज) व ITR4 (सुगम) भरण्याची सुविधा देण्यात येणार आहे.

ITR1 (सहज) हा फॉर्म मुख्यत्वे व्यक्‍तिश: (Individual) ज्यांच्या उत्पनाचा स्रोत हा फक्‍त पगार (सॅलरी), पेन्शन, एका घरापासून मिळणारे उत्पन्‍न, व्याजाचे उत्पन्‍न इतकाच आहे व ज्याचे मागील वर्षातील एकूण उत्पन्‍न रु.50 लाखांच्या आत असणार्‍यांनी या फॉर्ममध्ये त्यांचे आयकर  रिटर्न भरणेचे आहे.

ITR4 (सुगम) हा फॉर्म मुख्यत्वे व्यक्‍तिश:, हिंदू अविभक्‍त कुटुंब (HUF), भागीदारी संस्था (Partnership Firm other than LLP) ज्याचे मागील वर्षातील एकूण उत्पन्‍न रु.50 लाखांच्या आत असणार्‍यांनी व ज्यांचे व्यवसायातून मिळणारे उत्पन्‍न हे Presumptive Taxation अंतर्गत हिशोब केले असल्यास या फॉर्ममध्ये त्यांचे आयकर रिटर्न भरणेचे आहे.

आयकर कायद्यानुसार आपल्या उत्पनाचे खालील पाच (5) प्रकारात वर्गीकरण केले जाते

1. नोकरीपासून मिळणारे उत्पन्‍न. 

2. घर व आचल मालमत्ता यामधून मिळणारे उत्पन्‍न. 

3. व्यवसायापासून मिळणारे उत्पन्‍न. 

4. भांडवली नफा. 

5. इतर सर्व प्रकारातून मिळणारे उत्पन्‍न. 

इन्कमटॅक्स रिटर्न हे (सेल्फ असेसमेंट) स्वत: किंवा सल्लागाराच्या मदतीने भरणेचे आहे.

ज्या व्यक्‍तीचे मागील आर्थिक वर्षातील एकूण उत्पन्‍न हे रु.2,50,000/- च्या पेक्षा कमी असलेस पॅन नंबर असून देखील त्यांनी आयकर रिटर्न भरण्याची आवश्यकता नाही.

पण अशा व्यक्‍ती, ज्यांचे मागील आर्थिक वर्षातील एकूण उत्पन्‍न हे रु.2,50,000/- च्या पेक्षा जास्त असलेस त्यांनी त्यांचे आयकर रिटर्न वेळेत भरण्याची आवश्यकता आहे. यामध्येे आपले एकूण उत्पन्‍न हे रु.2,50,000/- पेक्षा जास्त आहे. पण आयकर कायद्यातील तरतुदी नुसार आयकर भरावा लागत नाही, त्यांनी देखील त्यांचे आयकर रिटर्न वेळेत भरण्याची आवश्यकता आहे.

ज्येष्ठ नागरिक, ज्यांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे त्यांना वरील मर्यादा ही रु.3,00,000/- ही आहे. अति-ज्येष्ठ नागरिक ज्यांचे वय 80 वर्षांपेक्षा जास्त आहे त्यांना वरील मर्यादा ही रु.5,00,000/- ही आहे.

आर्थिक वर्ष 2020-2021 चे आयकर रिटर्न भरताना दोन पर्याय देण्यात आले आहेत. या दोन वेगवेगळ्या पद्धतींकरिता वेगवेगळे करांचे (टॅक्स स्लॅब रेट) दर देण्यात आले आहेत.

• जुन्या पद्धतीनुसार एकूण उत्पन्‍नातून आयकर कायद्यानुसार मिळणार्‍या वजावटींचा (Deduction) फायदा घेऊन आयकर भरावयाचा असल्यास.

 • नवीन पद्धतीनुसार एकूण उत्पन्‍नातून आयकर कायद्यानुसार मिळणार्‍या वजावटींचा फायदा न घेता आयकर भरावयाचा असल्यास.

व्यक्‍तिश:, हिंदू अविभक्‍त कुटुंब (HUF) करिता आयकरचे दर खालीलप्रमाणे –

जुन्या पद्धतीनुसार (Old System)निव्वळ करपात्र उत्पन्‍न करांचे दर

रु.2,50,000 पर्यंत काही नाही.

रु.2,50,009 ते रु.5,00,000  –    5 %  

रु.5,00,009 ते रु.10,00,000 –    20 %

रु.10,00,000 पेक्षा जास्त – 30 %

नवीन पद्धतीनुसार (New System) निव्वळ करपात्र उत्पन्‍न करांचे दर

रु. 2,50,000 पर्यंत काही नाही

रु. 2,50,009 ते रु.5,00,000- 5%  

रु. 5,00,009 ते रु.7,50,000 – 10%

रु. 7,50,009 ते रु.10,00,000 – 15%

रु. 10,00,009 ते रु.12,50,000 – 20%

रु. 12,50,009 ते रु.15,00,000 – 25%

रु. 15,00,000 पेक्षा जास्त – 30%

आयकर कायद्यानुसार भारतीय व्यक्‍ती, ज्याचे निव्वळ करपात्र उत्पन्‍न रु.5,00,000/- पर्यंत असल्यास कलम 87 अ (U/S 87A) अंतर्गत भराव्या लागणार्‍या करातून जास्तीत जास्त  रु.12,500/- इतकी वजावट मिळेल.

वरीलप्रमाणे आलेल्या आयकरवर स्वास्थ्य व शिक्षणासाठी 4% जादा उपकर लावण्यात येईल. निव्वळ करपात्र उत्पन्‍न रु. 50,00,000 पर्यंत असल्यास जादाचा कर लागणार नाही.

 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT