IDFC Share Crash Pudhari photo
अर्थभान

IDFC Share Crash: तब्बल ५९० कोटींचा फ्रॉड... शेअर मार्केट उघडताच या बँकेचे शेअर झाले क्रॅश; गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले

Anirudha Sankpal

IDFC Share Crash: अमेरिकेतील टॅरिफ प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजाराती चांगला दिसत होता. त्यामुळं शेअर बाजार आठवड्याच्या पहिल्याच दिवशी तेजीत ट्रेंड करत आहे. बाजार उघडला त्यावेळी तो ६०० अंकांनी वाढून ८३,००० वर पोहचला होता. तर निफ्टी देखील चांगली वाढली होती.

बाजारात तेजी मात्र...

मात्र बाजारात इतकी सकारात्मकता असतानाही आयडीएफसी फर्स्ट बँकचे शेअर मात्र धडाधड कोसळत होते. बँकेत ५९० कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याचं समोर आल्यानंतर सोमवारी बाजार उघडताच आयडीएफसी फर्स्ट बँक शेअर क्रॅश होऊ लागले. (IDFC First Bank Share Crash) या बँकेचे शेअर जवळपास २० टक्क्यांनी कमी झाले. त्यामुळे गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले आहेत.

बाजार उघडला अन्...

IDFC First Bank Share च्या किंमतीत मोठी घट झाली आहे. ज्यावेळी बाजार बंद झाला होता. तेव्हा या शेअर्सची किंमत जी होती ती कमी होऊन ७५.१६ रूपयांवर येऊन पोहचली. त्यानंतर शेअरच्या किंमतीत अचानक घट झाली. घट होण्याचा वेग वाढला. आता बँक स्टॉक्स ६६.८० रूपयांपर्यंत खाली आला आहे.

ही घट जवळपास २० टक्के इतकी आहे. शेअरची किंमत झपाट्यानं कमी होत असल्यामुळं चलते IDFC First Bank Market Cap देखील वेगानं कमी होत ते ५० हजार ३३० कोटी रूपयांपर्यंत खाली आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT