सेक्शन ‘87 अ’च्या सवलतीचा लाभ कसा घ्यायचा? Pudhari File Photo
अर्थभान

सेक्शन ‘87 अ’ : मध्यम उत्पन्न असलेल्या व्यक्तींना कर दिलासा देणारी तरतूद, जाणून घ्या सविस्तर

सेक्शन ‘87 अ’च्या सवलतीचा लाभ कसा घ्यायचा?

पुढारी वृत्तसेवा
सुभाष वैद्य

सेक्शन 87 अ ही मध्यम उत्पन्न असलेल्या व्यक्तींना महत्त्वाचा कर दिलासा प्रदान करणारी तरतूद आहे. ही तरतूद करदात्यांना आर्थिक स्थिरता निश्चित करते. नवीन कर प्रणाली ही अधिकाधिक रिबेट थ्रेशोल्ड ऑफर करत असताना अधिकाधिक कपातीसाठी जुनी प्रणालीही फायदेशीर ठरते.

कराचे नियोजन हा पर्सनल फायनान्सचा आवश्यक पैलू आहे. प्राप्तिकराच्या कलम 87 अ हे पात्र करदात्यांना त्यांचा कराचा बोजा कमी करण्यात मदत करते. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास टॅक्स रिबेट म्हणजे तुम्हाला देय असलेल्या कराच्या रकमेत कपात मिळणे होय. तुमच्या इन्कम स्लॅबचे आकलन करत एकूण कर भरण्याऐवजी रिबेट म्हणून तुम्हाला या करातून विशिष्ट रक्कम वजा करण्याची मुभा मिळते आणि यामुळे तुम्हाला भरावयाची असलेली शेवटची रक्कम ही कमी होते.

87 अ नुसार प्राप्तिकर सवलत

प्राप्तिकर कायदा हा सर्व नोकरदार वर्गासाठी आणि कंपन्यांसाठी प्राप्तिकर भरण्यासाठी बंधनकारक असतो. एखाद्या आर्थिक वर्षातील उत्पन्न हे प्राप्तिकराच्या स्लॅबपेक्षा अधिक होत असेल, तर प्राप्तिकर कायदा कलम 87 अ नुसार सवलत मिळू शकते. त्यामुळे तुमच्या निव्वळ प्राप्तिकराची रक्कम कमी करण्यास हातभार लागतो. कलम 87 अ नुसार प्राप्तिकरात मिळणारी सवलत ही व्यक्तिश: मिळते. ती एचयूएफ, कंपनी, बीओआय/एओपी किंवा फर्मच्या लोकांना मिळत नाही आणि ते दावा करू शकत नाहीत.

मध्यम उत्पन्न गटातील कराचे ओझे कमी करण्यासाठी 2013 मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पात ही कर सवलत सुरू करण्यात आली. गेल्या काही वर्षांत बदलत्या आर्थिक परिस्थिती आणि महागाईशी ताळमेळ बसविण्यासाठी ही सवलत महत्त्वाची ठरली. प्राप्तिकर सेक्शन 87 अ म्हणजे ज्या व्यक्तीचे निव्वळ करपात्र उत्पन्न हे पाच लाखांपेक्षा अधिक नसेल त्यांना 12,500 रुपयांपर्यंतचा टॅक्स रिबेट मिळतो. कायद्यानुसार तुम्ही निकष पूर्ण केले, तर तुमचा कर शून्य राहील. ही सवलत एकूण करातून वजा होत असल्यामुळे त्याचा थेट लाभ करदात्याला मिळतो.

वार्षिक उत्पन्नांचे आकलन

वेतन : तुम्ही नोकरदार असाल तर तुमच्या उत्पन्नात कपातीपूर्वीचा पगार, बोनस याचा समावेश होतो. एका वर्षात तुमच्या कामातून मिळणारे उत्पन्न हे तुमचे वार्षिक उत्पन्न असते.

व्यवसाय उत्पन्न : तुमचा व्यवसाय असल्यास तुम्ही व्यवसायातून निर्माण केलेले उत्पन्न हे तुमच्या वार्षिक व्यवसायाचे उत्पन्न आहे. तुम्ही स्वयंरोजगार करत असाल, तर तुमचे उत्पन्न कंत्राटी काम, विक्री कमिशन अणि अन्य व्यवसायांच्या सहभागातून येऊ शकते.

सामाजिक सुरक्षा : तुमच्या वार्षिक उत्पन्नात आणखी एक स्रोत म्हणजे सामाजिक सुरक्षा किंवा पेन्शन. सामाजिक सुरक्षेत अपंग कर्मचारी, निवृत्त, अपंग, मृत किंवा दिव्यांग कर्मचार्‍याचे कुटुंब यांच्या निवृत्तीवेतनाचा समावेश होतो.

गुंतवणुकीतील व्याज आणि उत्पन्यन : तुम्हाला शेअर बाजार, मालमत्ता अणि अन्य गुंतवणुकीच्या विक्रीतून उत्पन्न मिळाले, तर ते तुमच्या वार्षिक उत्पन्नाचा एक भाग समजला जाईल.

भांडवली नफा : जेव्हा तुम्ही मालमत्ता विकता तेव्हा आर्थिक लाभात नफ्याचा समावेश होतो. हा तुमचा भांडवली नफा. हा नफा वार्षिक उत्पन्नाला जोडला जातो.

भाड्याने मिळणारे उत्पन्न : तुमच्या वार्षिक उत्पन्नात तुम्हाला एखाद्या मालमत्तेतून सहा महिने किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी मिळणार्‍या भाड्याचा उत्पन्नात समावेश होतो.

सेक्शन 87 ए - नंतर आणि आता

2020-21 आणि 2019-20 साठी दावा कसा करावा?

तुम्ही भारतीय असणे आवश्यक आहे. (कंपनी, फर्म, एनआरआयसाठी लागू नाही.)

तुमचे निव्वळ करपात्र उत्पन्न पाच लाखांपेक्षा जास्त नसावे. सवलत केवळ कॅलक्युलेट केलेल्या कर रकमेवर लागू होतो. सेस किंवा अधिभार याच्यावर नाही.

साठ वर्षांखालील व्यक्तीसाठी सेक्शन 87 अ अतंर्गत रिबेट दिला जातो.

या सवलतीचे उदाहरण

नरेंद्र हा निवासी व्यक्ती असून त्याचे वार्षिक उत्पन 6,50,000 आहे. 80 सीनुसार त्याला दीड लाखाची सवलत मिळते. ती कपात केल्यानंतर त्याचे उत्पन्न पाच लाख राहो. पाच लाखांवर 12,500 रुपये कर. सेक्शन 87 अ अंतर्गत रिबेट 12,500 रुपये. अंतीम कर भरणा शून्य रुपये.

दावा करण्याची प्रक्रिया

एकूण उत्पन्नाचे आकलन करा. यात सर्व उत्पन्न स्रोतांचा समावेश करा. पात्र कर सवलत गुंतवणुकीची कपात करा. म्हणजे 80 सी, 80 डी.

करपात्र उत्पन्न निश्चित करा. कर कपातीनंतर तुमचे उत्पन्न हे सेक्शन 87 अ साठी पात्र मर्यादेच्या आत असेल तर तुम्ही सवलतीसाठी पात्र आहात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT