पुराने किंवा ढगफुटीमुळे घराचे नुकसान झालेय? (Pudhari File Photo)
अर्थभान

Home Insurance Claim | पुराने किंवा ढगफुटीमुळे घराचे नुकसान झालेय?

होम इन्शुरन्समधून दावा कसा करावा?

पुढारी वृत्तसेवा

मारुती वि. पाटील

सध्या भारतभर अनेक राज्यांत मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. यात पूर आणि ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानीबरोबरच घरांचेही नुकसान झाले आहे. दरवर्षी अशा घटना घडत असतात. अशा वेळी योग्य विमा घेतला असल्यास आपला झालेला आर्थिक तोटा कमी करता येतो.

नैसर्गिक आपत्ती, पूर, ढगफुटी यासारख्या घटनांमध्ये जीवितहानीबरोबरच मालमत्तेचेही नुकसान होते. ते न भरून येण्याजोगे असते. आपला जर आयुर्विम्याबरोबरच मालमत्तेचा इन्शुरन्स अर्थात विमा असेल तर आपला झालेला तोटा भरून काढता येऊ शकतो.

1. होम इन्शुरन्समध्ये काय कव्हर मिळते?

पूर व नैसर्गिक आपत्ती कव्हर : बहुतेक कॉम्प्रिहेन्सिव्ह होम पॉलिसीत पूर, ढगफुटी, भूस्खलन यांचा समावेश केलेला असतो.

अ‍ॅड-ऑन आवश्यकता : काही पॉलिसीत पूरकव्हर स्वतंत्ररीत्या जोडावे लागते; यासाठी आपला प्रीमियम वाढतो.

घर व घरातील मालमत्ता : घराच्या भिंती, फर्निचर, घरातील इलेक्ट्रॉनिक्स, मौल्यवान वस्तू या सर्वांचे संरक्षण मिळते.

2. दावा (क्लेम) करण्याची प्रक्रिया

- त्वरित कळवा : पुरामुळे किंवा ढगफुटीमुळे नुकसान होताच 24-48 तासांत संबंधित विमा कंपनीला दिलेल्या पत्त्यावरती कळवावे.

- पुरावे जतन करा : झालेल्या नुकसानीचे फोटो, व्हिडीओ, बिलं व अंदाजपत्रके तयार करून सगळी माहिती जमा ठेवा.

सर्व तपशील द्या : झालेल्या घटनेची तारीख, वेळ, अंदाजे नुकसान याची स्पष्ट माहिती द्यावी.

3. इतर संबंधित विमे

- मोटर इन्शुरन्स : कॉम्प्रिहेन्सिव्ह मोटर पॉलिसीत पुरामुळे गाडीचे इंजिन, आतील भाग खराब झाल्यास नुकसानभरपाई मिळते.

- आवश्यक अ‍ॅड-ऑन : इंजिन प्रोटेक्शन, झीरो डेप्रिसिएशन, रिटर्न-टू-इनव्हॉइस, कंझ्युमेबल्स कव्हर समाविष्ट हवा.

- हेल्थ इन्शुरन्स : पुरानंतर होणार्‍या आजारांवर (डेंग्यू, टायफॉईड इ.) रुग्णालय खर्चासाठी प्री व पोस्ट

हॉस्पिटलायझेशन कव्हर तपासावे.

- पॅरामीट्रिक इन्शुरन्स : ठरावीक पर्जन्यमान ओलांडले की स्वयंचलित दावा मिळतो. मात्र, ही सुविधा काही भागांतच उपलब्ध असते. त्याची माहिती करून घ्या.

4. महत्त्वाच्या टिप्स

* पॉलिसीची अटी व वेटिंग पीरियड नीट वाचावा.

* पावसाळ्यापूर्वीच विमा नूतनीकरण करावे किंवा नवा विमा घ्यावा.

* पूरधोक्याच्या क्षेत्रात राहणार्‍यांनी होम इन्शुरन्स अनिवार्यपणे घ्यावा.

पूर किंवा ढगफुटी ही नैसर्गिक

आपत्ती टाळता येत नाही; पण योग्य होम इन्शुरन्स, मोटर व हेल्थ इन्शुरन्स घेतल्यास घर, गाडी आणि आरोग्य यांवरील आर्थिक भार मोठ्या प्रमाणात कमी करता येतो, हे लक्षात घ्यावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT