सतीश डकरे, सीए
जीएसटी 2.0 विषयी प्रेस रीलिज आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न प्रकाशित झाले आहेत; परंतु सूचना किंवा परिपत्रके अद्याप प्रकाशित झालेली नाहीत. परंतु, यात काही गोष्टींचा उलगडा झालेला दिसत आहे.
यापूर्वी जीएसटी अंतर्गत 3%, 5%, 12%, 18%, 28% आणि 40% असे सहा करस्लॅब अस्तित्वात होते. आता ही रचना साधी करून खालीलप्रमाणे करण्यात आली आहे -
3% : रत्ने आणि दागिने प्रकार वस्तूंवर कर.
5% : आवश्यक व दैनंदिन वस्तूंवर कर.
18% : बहुतेक वस्तू व सेवांसाठी मानक दर कर.
40% : विलासी व हानिकारक (‘डिमेरिट’) वस्तूंवर कर.
दैनंदिन वापराच्या वस्तू : साबण, शॅम्पू, टूथपेस्ट, शेव्हिंग क्रीम, केसांचे तेल, टूथब्रश यांसारख्या वस्तूंवरील करदर 18% वरून 5% झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबाचा मासिक खर्च थेट कमी होणार आहे.
अन्नधान्य व दुग्धजन्य उत्पादने : लोणी, चीज, खजूर, पास्ता, नमकीन या पॅकेज्ड खाद्यपदार्थांवर आता फक्त 5% जीएसटी आकारला जाणार आहे. तसेच, णकढ दूध, पनीर, भारतीय पोळ्या/पराठे यांना जीएसटीमधून पूर्ण सूट देण्यात आली आहे.
आरोग्य व विमा क्षेत्र: जीवन विमा व आरोग्य विमा पॉलिसींना करातून पूर्ण सूट देण्यात आली आहे. थर्मामीटर, ग्लुकोमीटर, डायग्नॉस्टिक किटस्, ऑक्सिजन, चष्मे यांवरील जीएसटी फक्त 5% आहे. यामुळे मध्यमवर्गीय व ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.
शिक्षण क्षेत्र : शालेय साहित्य जसे की नोटबुक, पेन्सिल, खोडरबर, स्केल इत्यादींवरील जीएसटी रद्द (0%) झाला आहे.
कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था - ट्रॅक्टर, टायर, सिंचन यंत्रणा, बायो-पेस्टिसाईडस् यांवर केवळ 5% कर लागेल. शेतकर्यांना आधुनिक साधने स्वस्तात उपलब्ध होऊन उत्पादनक्षमता वाढेल.
बांधकाम वस्तू - सिमेंटवरील कर 28% वरून 18% झाला आहे. बांधकाम खर्च कमी होऊन घरखरेदी व पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती मिळेल.
इलेक्ट्रॉनिक्स व घरगुती उपकरणे - टीव्ही, एसी, डिशवॉशर यांवरील कर 28% वरून 18% करण्यात आला आहे.
मोटारगाडी उद्योग - लहान पेट्रोल (1200 सीसीपर्यंत), डिझेल (1500 सीसीपर्यंत) गाड्या, मोटारसायकली (350 सीसीपर्यंत), तीनचाकी वाहने यांवरील कर 28% वरून 18% झाला आहे. इलेक्ट्रिक वाहनांवरील कर 5% वर कायम आहे. यामुळे गाड्यांच्या किमती 5% ते 10% पर्यंत स्वस्त होऊन विक्रीत वाढ अपेक्षित आहे. यामुळे वाहन उद्योगातील विक्रीला चालना मिळेल.
घरगुती व टिकाऊ वस्तू - भांडी, सायकल, शिवणयंत्र, किचनवेअर यांवरील कर फक्त 5% करण्यात आला आहे.
सेवा क्षेत्र - सलून, जिम, योग केंद्र यांसारख्या सेवांवरील करदर 18% वरून 5% केला आहे.
विलासी व हानिकारक वस्तूंवर सरकारने नवीन 40% करस्लॅब लागू केला आहे. यात तंबाखू, गुटखा, पानमसाला, महागडी गाडी, स्पोर्टस् कार, शीतपेय व एरेटेड ड्रिंक्स, जुगार संबंधित सेवा यांचा समावेश आहे. सरकारने आरोग्यास हानिकारक व समाजावर विपरीत परिणाम करणार्या वस्तूंवरच हा उच्च कर लावला आहे.
ग्राहकांना दिलासा - रोजच्या वस्तू स्वस्त झाल्यामुळे कुटुंबाच्या खर्चावर सकारात्मक परिणाम.
व्यवसायांना सुलभता - करस्लॅब कमी झाल्यामुळे गोंधळ व वाद कमी होतील.
राजस्व परिणाम - सरकारनुसार यामुळे साधारण 48,000 कोटींचा तात्पुरता महसूल परिणाम होऊ शकतो; परंतु वाढलेल्या खपामुळे तो भरून निघेल अशी अपेक्षा आहे.
कृषी व एमएसएमई यांना फायदा - शेतकरी व लघु उद्योगांसाठी उपकरणे व इनपुटस् स्वस्त झाल्यामुळे उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होईल.
सामाजिक परिणाम
सामान्य नागरिकांच्या जीवनमानात थेट सुधारणा.
आरोग्य, शिक्षण व विमा क्षेत्रांतील करसवलतींमुळे सामाजिक सुरक्षेला चालना.