गुंतवणुकीचा ‘सुवर्ण’पर्याय Pudhari File Photo
अर्थभान

गुंतवणूक : गुंतवणुकीचा ‘सुवर्ण’पर्याय!

सोन्याचा पर्याय गुंतवणुकीचा सर्वोत्तम

पुढारी वृत्तसेवा
प्रा. डॉ. विजय ककडे

मागणीच्या तुलनेत सातत्याने पुरवठा कमी असल्याने विविध कारणाने सोने मागणी वाढत असते. सोने हे गुंतवणुकीचे साधन म्हणून निवडत असताना ते दागिने स्वरूपात न घेता पेपर गोल्ड किंवा डिजिटल स्वरूपात घेणे अधिक योग्य ठरते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात(2024) सोन्यावरील आयात कर 6% ने कमी करण्याचा निर्णय घेतला. याचा परिणाम म्हणून सोन्याचा दर प्रती दहा ग्रॅम 3500 ने कमी झाला. साधारणत: प्रतिवर्ष 800 ते 1200 टन सोने आयात करणारा देश म्हणून आपली ओळख आहे. चीन, अमेरिका, तुर्कस्थान हेही आयातदार आहे. उत्पादक सुवर्णदेश म्हणून चीन, अमेरिका, दक्षिण आफ्रिका, रशिया, पेरू व थायलंड हे देश आहेत. सोन्याचे दर मात्र डॉलरमध्येच प्रामुख्याने निश्चित केले जातात व त्यातील चढउतार डॉलरच्या दरातील चढउताराशी निगडित असतात. भारतातील सुवर्णठेवा प्राचीन काळापासून मंदिरांतून किंवा देवस्थानांकडे व घरगुती दागिने या स्वरूपात मोठ्या प्रमाणात आहे.

सोन्याच्या गुंतवणुकीवरील परतावा

सोन्याच्या गुंतवणुकीतून मिळणारा परतावा हा दीर्घकाळाची तुलना केल्यास तो फारच आकर्षक वाटतो; परंतु केवळ सर्वसाधारण परतावा न पाहता, परताव्यातून भाववाढ वजा करून निव्वळ परतावा पाहणेही महत्त्वाचे असेल. सोन्याच्या गुंतवणुकीवरील परतावा 1950 ते 2023 या काळात संचयी परतावा (CAGR) 9-18% इतका असून, तो जवळपास महागाई दराएवढाच आहे. जर आपण 60-23 असा कालखंड घेतला, तर परतावा वार्षिक दर 10.5% व 1970 ते 2023 या काळात तो 11.55% असा दिसतो. एकूण सोन्याच्या परताव्यात वाढीचा कल असून, तो यापुढील कालखंडात वर्धिष्णू राहण्याचीच शक्यता आहे.

सुवर्ण परतावा - कालनिहाय

सोन्याचा परतावा वार्षिक, पंचवार्षिक, दशक व 15 वर्षे अशा कालखंडानुसार गेल्या 5 वर्षांतील परतावा दर वरील कोष्टकात दिले आहेत. वार्षिक परतावा न्यूनतम 2.52% हा 2021 मध्ये होता, तर सर्वोच्च परतावा त्या आदी 2020 मध्ये 46.64% इतका होता. चढउतार नंंतर घटले असून, गतवर्षी व चालूवर्षी 18 ते 19% असा उत्तम परतावा असून, दीर्घकालीन परताव्याचे दर 10% पेक्षा अधिक असून, दीर्घकालीन गुंतवणूक साधन म्हणून सोने उत्तम ठरते.

सोने दरवाढ?

सोने हे गुंतवणुकीचे जागतिक साधन असून, अधूनमधून त्यामुळे दरघट होणे हे घडत असले तरी त्यात भविष्यकाळात वाढ होण्याची शक्यता अधिक असते. सोने नेमके का व कधी वाढते, हे पाहणे महत्त्वाचे ठरते.

उत्पादन खर्चवाढ

सोने उत्पादनाचा खर्च वाढत असून, त्याची उपलब्धता मर्यादित आहे. सोन्याच्या खाणी अधिक खोलवर जात असून, त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होत आहे व परिणामी सोन्याच्या किमतीतही वाढ होते.

जागतिक तणाव

सातत्याने युक्रेन, रशिया तसेच इराण, इराक यातील तणाव यामुळे इतर गुंतवणुकीपेक्षा सुरक्षित मानल्या जाणार्‍या सोन्यात गुंतवली जाते. रशियाने आपल्या तेलाची किंमत सोन्यातच घ्यायची ठरवल्यामुळे सोन्याची मागणी व किंमत वाढली. जागतिक तणाव, युद्धजन्य परिस्थिती अनिश्चिता निर्माण करते व अशा वेळी शेवटचा त्राता म्हणून सोने उपयोगी ठरते.

चीनचा प्रभाव

सोने मागणीत चीन महत्त्वाचा असून, आता वैयक्तिक गुंतवणुकीस चीनमध्ये सोने पसंत केले जाते. चीन सरकारने धोरणात्मक निर्णय बदलून वैयक्तिक सुवर्ण गुंतवणुकीस परवानगी दिली आहे. त्यामुळे सोन्याचे दर वाढले.

डॉलर दराचा परिणाम

आपली सुवर्ण आयात डॉलरमध्येच करावी लागत असल्याने जेव्हा डॉलर वाढतो किंवा रुपया घसरतो तेव्हा तेवढ्या प्रमाणात सोने महाग होते. डॉलर चलनाची मागणी वाढल्यास डॉलर इंडेक्स वाढतो व त्याचाही परिणाम सोने किंमत वाढण्यावर होतो. मागणीच्या तुलनेत सातत्याने पुरवठा कमी असल्याने विविध कारणाने सोने मागणी वाढत असते. सोने हे गुंतवणुकीचे साधन म्हणून निवडत असताना, ते दागिने स्वरूपात न घेता, पेपर गोल्ड किंवा डिजिटल स्वरूपात घेणे अधिक योग्य ठरते.

सुवर्ण गुंतवणूकपद्धती

सुवर्ण गुंतवणूक परताव्याच्या निकषावर दीर्घकालीन गुंतवणूक चांगली ठरते, हे आपण पाहिले; परंतु या गुंतवणुकीबाबत सुरक्षितता व शुद्धता हे दोन निकष अडचणीचे ठरतात. सुवर्णचोरी ही नियमित बाब असून, दागिने सुरक्षित ठेवण्यासाठी बँकेचे लॉकर व त्यावरील भाडे हे खर्च वाढविणारे असते. आपण घेतलेले 22 किंवा 24 कॅरेटचे सोने विश्वासाने घेतलेले असते; परंतु ही विश्वासार्हता पुन:विक्रीच्यावेळी अडचणीत आणणारी ठरू शकते. यासाठी सोने दागिने स्वरूपात घेत असू, तर त्यास गुंतवणूक न मानता हौस म्हणूनच पाहावे व हौसेचे मोल नसते, ही खूणगाठ मनाशी बांधावी. मात्र, सोने हे गुंतवणूक म्हणून घेणार असाल, तर दागिने स्वरूपात न घेता वेगवेगळ्या नव्या पद्धतीने घेणे शक्य आहे. त्यामध्ये - गोल्ड ईटीएफ (Gold ETF) सोन्यातील सुरक्षित व रोखता असणारी व परतावा देणारी गुंतवणूक ही गोल्ड ईटीएफ (Exchange Traded Fund) स्वरूपात करता येते. कोटक, निप्पॉन इंडिया अशा विविध कंपन्यांचे असून, 1 ग्रॅम सोने गुंतवणूक करता येते. त्यावर गुंतवणूक काढून घेताना कमिशन किंवा एक्झिट लोड द्यावा लागत नाही यासाठी डीमॅट लागते.

गोल्ड म्युच्युअल फंड

गोल्ड म्युच्युअल फंडात रु. 1000/- पासून गुंतवणूक करता येते. यातील गुंतवणूक करण्यासाठी दरमहा एसआयपी करता येते. हे डीमॅट तसेच डीमॅटविना घेता येते.

गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond)

सोन्यातील गुंतवणुकीस महत्त्वाचा अधिक परताव्याचा सुरक्षित पर्याय हा सुवर्णरोखे किंवा सरकारी बंधपत्रे हा आहे. सरकारमार्फत दिली जाणारी 8 वर्षांच्या मुदतीची सुवणर्र् बंदपत्रे ही गुंतवणुकीतील 2.5% व्याजही देते. हे गोल्ड बॉड आपणास विकताही येतात

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT