Gold Silver Rate Today pudhari
अर्थभान

Gold Silver Rate Today: सोने चांदीच्या दरात मोठी घसरण... चांदी ७००० ने तर सोनं इतक्या किंमतीनं झालं स्वस्त

Anirudha Sankpal

Gold Silver Rate Today: सोने आणि चांदीच्या दरात आज (दि, २३ मे २०२६) मोठी घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी मार्केट सकाळी ओपन होताच चांदीचे दर ७००० रूपयांनी पडले तर सोन्याच्या दरात देखील मोठी घसरण झाल्याचं दिसलं. विशेष म्हणजे जागतिक बाजारात सोन्या चांदीचे दर घसरत असताना आणि जागतिक अनिश्चितता असताना हे दर कोसळले आहेत.

मंगळवारी एमसीएक्सवर १० ग्रॅम सोन्याची किंमत १ टक्क्यांपेक्षा जास्त म्हणजे १६०० रूपयांनी घसरली आहे. आता सोन्याचे १० ग्रॅमचे दर हे १ लाख ४६ हजार ५२८ रूपये झाला आहे. काही वेळानंतर यात थोडी रिकव्हरी दिसली. सध्या सोन्याचे दर १२५० रूपयांच्या घसरणीवर ट्रेंड करत आहेत.

दुसरीकडं चांदीच्या दरात मात्र मोठी घट झाल्याचं दिसून आलं आहे. चांदीचे आजच्या दरात प्रतीकिलो ७ हजार रूपयांची घट झाली आहे. एमसीएक्सवर फ्युचर सिल्वर प्राईस ३ टक्क्यांनी खाली येऊन ती प्रती किलो २ लाख २७ हजार १२५ रूपयांपर्यंत खाली आली आहे. यानंतर यामध्ये थोडी रिकव्हरी दिसून आली. मात्र तरी देखील चांदेचे दर आज ६००० रूपयांच्या घसरणीवरच ट्रेंड करत आहेत.

सोन्या चांदीच्या दरात का झाली घसरण?

सोने आणि चांदीच्या दरात घसरण होण्याचं प्रमुख कारण समोर आलं आहे. यात अमेरिकन डॉलर जागतिक बाजारात मजबूत होत आहे. तसेच अमेरिकी बाँडचे यील्ड आणि प्रॉफिट बुकिंग ही कराणे देखील सामील आहेत. त्याचबरोबर अमेरिकी फेड रिजर्वच्या व्याज दरात घट करण्यात येण्याची शक्यता नाही असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळं बुलियन मार्केटमध्ये दबाव वाढला आहे.

आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सोन्या-चांदीचे भाव

आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सोने - चांदीचे दर वेगाने खाली येत आहेत. सोन्याचे दर १.११ टक्क्यांनी किंवा ४६.४५ डॉलरनी कमी झाले आहेत. तर चांदीचे दर ४.०३ टक्क्यांनी किंवा २.६४५ डॉलर घटले आहेत. सोने प्रती औंस ४,१५६.२५ डॉलर तर चांदी ६२.९३८ डॉलर प्रती औंस वर आहेत.

दिल्लीतही सोने चांदीचे दर पडले

कमोडिटी मार्केटसोबतच सराफा बाजारात देखील दरात घसरण पहावयास मिळत आहे. दिल्लीत सोन्याचे दर १ लाख ४९ हजार ०७० तर चांदीचे दर २ लाख ५० हजार प्रती किलो आहे. आज शेअर बाजारात देखील दबाव दिसत आहे. निफ्टी २० अंकांनी तर सेन्सेक्स १०० अंकानी पडले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT