नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोन्याची चमक वाढली आहे. (File Photo)
अर्थभान

Gold Prices | नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने दरात तेजी, जाणून घ्या प्रति तो‍ळ्याचा दर

चांदीच्या दरात किरकोळ घसरण

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोन्याची (Gold Prices) चमक वाढली आहे. आज बुधवारी (दि. १ जानेवारी २०२५) शुद्ध सोने म्हणजेच २४ कॅरेटच्या दरात ३७२ रुपयांची वाढ होऊन ते प्रति १० ग्रॅम ७६,५३४ रुपयांवर पोहोचले आहे. मंगळवारी (३१ डिसेंबर २०२४) शुद्ध सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ७६,१६२ रुपये होता. त्यात आज वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात ११७ रुपयांची किरकोळ घसरण झाली आहे.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (India Bullion & Jewellers Association) माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ७६,५३४ रुपये, २२ कॅरेट ७०,१०५ रुपये, १८ कॅरेट ५७,४०१ रुपये आणि १४ कॅरेटचा दर ४४,७७२ रुपयांवर खुला झाला. तर चांदीचा दर प्रति किलो ८५,९०० रुपयांवर खुला झाला आहे.

याआधी ३० ऑक्टोबर रोजी सोने दराने प्रति १० ग्रॅम ७९,६८१ रुपयांचा उच्चांक गाठला होता. तर चांदीचा दर २३ ऑक्टोबर रोजी प्रति किलो ९९,१५१ रुपयांवर गेला होता.

सोने खरेदी करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

नेहमी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डचे हॉलमार्क असलेले सर्टिफाइड सोने खरेदी करावे. सोन्यावर ६ अंकी हॉलमार्क कोड असतो. त्याला हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजेच (Hallmark Unique Identification) HUID म्हटले जाते. हॉलमार्कच्या माध्यमातून सोने किती कॅरेटचे आहे, हे कळणे शक्य आहे.

सराफा बाजारात २४ कॅरेट (९९९) हे शुद्ध सोने मानण्यात येते. पण, दागिने घडणावळीसाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर करण्यात येतो. २२ कॅरेटमध्ये ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९ लिहिलेले असते. जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६ आणि १८ कॅरेट (18 Carat Gold Rate) सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. १४ कॅरेट दागिन्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT