पुढारी ऑनलाईन डेस्क : सोने- चांदी दरात आज मंगळवारी (दि.१२) घसरण दिसून आली. आज शुद्ध सोन्याचा (Gold Rate Today) म्हणजे २४ कॅरेटचा दर १,५१९ रुपयांनी घसरून प्रति १० ग्रॅम ७५,३२१ रुपयांवर खुला झाला. तर चांदी २,५५४ रुपयांनी स्वस्त झाली आहे. चांदीचा दर आज प्रति किलो ८८,३०५ रुपयांवर खुला झाला. (Gold and silver prices today)
इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसियशनने दिलेल्या माहितीनुसार, २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा दर सोमवारच्या प्रति १० ग्रॅम ७६,८४० रुपयांच्या रुपयांच्या तुलनेत आज मंगळवारी ७५,३२१ रुपयांवर खुला. तर चांदीचा दर प्रति किलो ९०,८५९ रुपयांवरुन ८८,३०५ रुपयांपर्यंत खाली आला आहे. आज मंगळवारी २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ६८,९९४ रुपये, १८ कॅरेट ५६,४९१ रुपये आणि १४ कॅरेटचा दर ४४,०६३ रुपयांवर खुला झाला.
२३ ऑक्टोबर रोजी सोन्याने प्रति १० ग्रॅम ७९,६८१ रुपयांचा उच्चांक गाठला होता. तर चांदी प्रति किलो ९९,१५१ रुपयांवर पोहोचली होती. आता सोने- चांदी दरात घसरण होताना दिसत आहे.
नेहमी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डचे हॉलमार्क असलेले सर्टिफाइड सोने खरेदी करावे. सोन्यावर ६ अंकी हॉलमार्क कोड असतो. त्याला हॉलमार्क युनिक आयडेटिंफिकेशन (HUID) म्हटले जाते. हॉलमार्किंगच्या माध्यमातून आपल्याला सोने किती कॅरेटचे आहे? हे कळणे शक्य आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात मंगळवारी (१२ नोव्हेंबर) सोन्याच्या किमती एक महिन्याच्या निचांकी पातळीवर आली. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डचा दर ०.१ टक्के घसरून प्रति औंस २,६१७.१५ डॉलरवर आला.