Gold Silver Price Today: मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाचा परिणाम आता केवळ आंतरराष्ट्रीय राजकारणापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर त्याचा थेट परिणाम भारतातील बाजारावरही दिसू लागला आहे. पेट्रोल, डिझेल, सीएनजी, दूध आणि साखरेसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत असताना सोने आणि चांदीच्या दरातही मोठे चढ-उतार होत आहेत. विशेषतः सोन्याच्या किमती सातत्याने वाढत असून गुंतवणूकदार आणि ग्राहक दोघांच्याही नजरा आता सराफा बाजाराकडे लागल्या आहेत.
आज, 26 मे रोजी सोन्याच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे. तर चांदीच्या किमतींमध्ये किंचित घसरण दिसून आली आहे. लग्नसराईचा हंगाम आणि सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढलेला कल यामुळे सोन्याची मागणी वाढत असल्याचे बाजारतज्ज्ञ सांगतात.
24 कॅरेट सोने: ₹1,59,530
22 कॅरेट सोने: ₹1,46,250
18 कॅरेट सोने: ₹1,19,640
24 कॅरेट सोने: ₹1,59,380
22 कॅरेट सोने: ₹1,46,100
18 कॅरेट सोने: ₹1,19,540
10 ग्रॅम चांदी: ₹28,500
100 ग्रॅम चांदी: ₹2,85,000
1 किलो चांदी: ₹28,50,000
सोन्या-चांदीच्या दरातील वाढीमागे अनेक कारणे आहेत. सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची कमकुवत होत चाललेली स्थिती. रुपया घसरल्यामुळे भारतात आयात होणाऱ्या सोन्याची किंमत वाढते आणि त्याचा थेट परिणाम ग्राहकांवर होतो.
याशिवाय, मध्य पूर्वेतील वाढता तणाव, जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वाढलेला ओढा हे देखील किमती वाढण्यामागचे प्रमुख घटक आहेत. सरकारी धोरणे, आयात शुल्क आणि बाजारातील मागणी-पुरवठा यामुळेही सोन्या-चांदीच्या दरांमध्ये सातत्याने बदल होत असतात. तज्ज्ञांच्या मते, जागतिक परिस्थिती अशीच राहिली तर येत्या काही दिवसांत सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.