Gold Silver Price Today Pudhari
अर्थभान

Gold Price Today: सोन्याच्या दरात पुन्हा घसरण; मुंबईत २२ कॅरेटचा भाव १.४२ लाखांवर

आज (दि. ६) देशभरात सोन्याच्या दरातील घसरण कायम राहिली. राजधानी दिल्लीत २४-कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,५५,८७० रूपयांपर्यंत खाली आला आहे.

मोहन कारंडे

Gold Price Today:

नवी दिल्ली: आज (दि. ६) देशभरात सोन्याच्या दरातील घसरण कायम राहिली. राजधानी दिल्लीत २४-कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,५५,८७० रूपयांपर्यंत खाली आला आहे. मुंबईत हा भाव प्रति १० ग्रॅम १,५५,७२० रूपये इतकी आहे. शुक्रवारी दिल्लीच्या सराफा बाजारात ९९.९ टक्के शुद्ध सोन्याचा भाव ४०० रूपयांनी कमी होऊन प्रति १० ग्रॅम १,५९,९०० रूपयांवर स्थिरावला होता.

परदेशातही सोन्याच्या दरात घसरण दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात 'स्पॉट गोल्ड'चा व्यवहार प्रति औंस ४,४७०.७९ डॉलरवर होत आहे. अमेरिका-इराण युद्धविराम कराराबाबत अनिश्चितता कायम आहे. पश्चिम आशियातील तणावामुळे प्रमुख व्याजदर दीर्घकाळापर्यंत उच्च पातळीवर राहण्याची भीती निर्माण झाली आहे; ही बाब सोने आणि चांदीसारख्या मौल्यवान धातूंसाठी नकारात्मक ठरत आहे.

प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर

दिल्लीतील सोन्याचा भाव: दिल्लीत २४-कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,५५,८७० रूपये आहे. २२-कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,४२,८९० रूपये आहे.

मुंबई आणि कोलकाता: मुंबई आणि कोलकातामध्ये २२-कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,४२,७४० रूपये आहे, तर २४-कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,५५,७२० रूपये आहे.

चेन्नईमधील सोन्याचा भाव: २४-कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,५७,९५० रूपये आहे. २२-कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,४४,२९० रूपये आहे.

पुणे आणि बेंगळुरू दर: ​​या दोन्ही शहरांमध्ये २४-कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,५५,७२० रुपये आहे, तर २२-कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,४२,७४० रुपये आहे. चांदीचा दर

चांदीच्या दरातही घट

आणखी एक मौल्यवान धातू असलेल्या चांदीच्या दरातही सतत घट होत आहे. आज सकाळी चांदीचा दर प्रति किलो २,७४,९०० रुपये इतका आहे. त्याआधीच्या दिवशी, दिल्लीच्या सराफा बाजारात चांदीच्या दरात ५,००० रुपयांची घसरण होऊन तो प्रति किलो २,६०,७०० रुपयांवर स्थिरावला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा स्पॉट दर प्रति औंस ७२.८९ डॉलर्स इतका आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT