Gold Silver Price Today Pudhari
अर्थभान

Gold Silver Price: युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोन्या चांदीची चमक झाली कमी; सोनं 3,200 रुपयांनी तर चांदी 11,900 रुपयांनी स्वस्त

Gold Silver Price Today: जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोनं ₹ 3,200 ने तर चांदी ₹11,900 ने घसरली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Gold Silver Price Today: जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (2 एप्रिल) सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. काही दिवसांपूर्वी विक्रमी पातळीवर असलेले दर आता अचानक खाली आले असून गुंतवणूकदारांसाठी हा मोठा बदल मानला जात आहे.

सोन्याच्या दरात ₹3,200 ची घसरण

Multi Commodity Exchange (MCX) वर 5 जून 2026 एक्सपायरी असलेल्या गोल्ड फ्युचर्समध्ये सुमारे ₹3,200 ची घसरण झाली.

सकाळी बाजार उघडताना सोनं ₹1,52,490 प्रति 10 ग्रॅमवर होतं. मात्र सकाळी 9:55 वाजेपर्यंत ते 2% पेक्षा जास्त घसरून ₹1,50,495 वर ट्रेड करत होतं.

चांदीतही मोठी घसरण झाली

सोन्यासोबतच चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली. MCX वर चांदीचा दर सुमारे ₹11,900 ने घसरून ₹2,43,501 प्रति किलोपर्यंत खाली आला. ही जवळपास 5% घसरण मानली जात आहे.

शहरनिहाय दर काय सांगतात?

दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर ₹1,53,110 प्रति 10 ग्रॅम आहे, तर 22 कॅरेट ₹1,40,360 आणि 18 कॅरेट ₹1,14,870 वर आहे.

मुंबई आणि पुण्यात 24 कॅरेट सोनं ₹1,52,960, 22 कॅरेट ₹1,40,210 आणि 18 कॅरेट ₹1,14,720 दराने विकलं जात आहे.

चांदीबाबत बोलायचं झालं तर, दिल्लीमध्ये 10 ग्रॅम चांदी ₹2,551, तर मुंबई आणि कोलकात्यात सुमारे ₹2,500 दराने मिळत आहे.

घसरणीमागचं कारण काय?

जागतिक बाजारातील अस्थिरता, युद्धसदृश परिस्थिती आणि गुंतवणूकदारांची बदलती रणनीती यामुळे या घसरणीचा परिणाम दिसत आहे. काही दिवसांपासून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळलेले गुंतवणूकदार आता नफा बुक करत असल्यानेही दरांवर दबाव आला आहे.

सोनं-चांदीच्या दरात झालेली ही घसरण गुंतवणूकदारांसाठी संधी आणि धोका दोन्ही ठरू शकते. आता पुढील काही दिवसांत जागतिक परिस्थिती आणि बाजारातील ट्रेंड यावर या दरांची पुढील दिशा अवलंबून राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT