Foreign investment | परकीय गुंतवणूकदारांची विक्री विक्रमी पातळीवर; बाजारात वाढली अस्थिरता 
अर्थभान

Foreign investment | परकीय गुंतवणूकदारांची विक्री विक्रमी पातळीवर; बाजारात वाढली अस्थिरता

पुढारी वृत्तसेवा

शेअर बाजारात परकीय गुंतवणूकदारांकडून (ऋझख) सुरू असलेली मोठ्या प्रमाणातील विक्री यंदा महिन्याचा विक्रम मोडण्याच्या मार्गावर आहे. रुपयाची सातत्याने घसरण, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि पश्चिम आशियातील सुरू असलेला संघर्ष यामुळे भारताच्या आर्थिक स्थितीवर दबाव वाढत आहे.

या महिन्यात आतापर्यंत परकीय गुंतवणूकदारांनी सुमारे 93,698 कोटी रुपयांची विक्री केली आहे. हा आकडा ऑक्टोबर 2024 मधील 94,017 कोटी रुपयांच्या विक्रमी विक्रीच्या जवळ पोहोचला आहे. सरासरी दररोज सुमारे 7,000 कोटी रुपयांची निव्वळ विक्री होत असून, अजून काही व्यवहार दिवस शिल्लक आहेत. शुक्रवारीदेखील ऋझख ने 5,518 कोटी रुपयांची विक्री केली, तरीही सेन्सेक्स 326 अंकांनी वाढून 74,533 वर बंद झाला. मात्र, महिनाभरात सेन्सेक्सने 6,750 अंकांची (8.3 टक्के) घसरण नोंदवली आहे. दिवसभर बाजारात मोठे चढ-उतार दिसून येत होते. सुरुवातीला 1,000 अंकांची वाढ झाल्यानंतर नफा वसुलीमुळे निर्देशांक खाली आला. निफ्टीही 112 अंकांनी वाढून 23,115 वर बंद झाला.

तज्ज्ञांच्या मते, अल्पकालीन ट्रेंड अजूनही कमकुवत आहे. 22,900 खाली गेल्यास निफ्टी 22,500 पर्यंत घसरू शकतो, तर 23,380 हा प्रतिकार स्तर मानला जात आहे. इराण युद्धामुळे तेलाच्या किमतींवर वाढता दबाव पुढे असाच कायम राहील आणि महागाई पुन्हा वाढेल या चिंतेने जागतिक समभाग सलग तिसर्‍या सत्रात घसरले. वॉल स्ट्रीटवर, डाऊ 0.5 टक्के, एस अँड पी 500 0.7 टक्के आणि नासडॅक 1 टक्केने घसरले, तर ब्रिटिश आणि युरोपियन इक्विटीज सलग तिसर्‍या आठवड्यात घसरले आणि लॅटिन अमेरिकन समभाग दोन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर घसरले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT