शेअर बाजार कोसळण्याची भिती. Pudhari File Photo
अर्थभान

stock market: कही तेजी की गाडी छूट न जाये!

निफ्टी थेट 20000 पर्यंत खाली जाण्याची भीती

पुढारी वृत्तसेवा
भरत साळोखे, संचालक, अक्षय प्रॉफिट अँड वेल्थ प्रा. लि.

बरोबर 15 दिवसांपूर्वीचा सोमवार आठवा. 5 ऑगस्ट 2024 याच दिवशी जपानच्या कॅरी टे्रडने जगभरच्या शेअर बाजारांमध्ये कोलाहल माजवला होता. जपान आणि अमेरिकेतील बाजार दहा टक्क्यांहून अधिक कोसळले होते. भारतातील निफ्टी अडीच टक्के घरंगळला होता. त्या दिवशी निफ्टीच्या नीचांक होता 23893.70 म्हणजे 24000 च्याही खाली 107 पॉईंटस्! तेव्हा तथाकथित बाजारतज्ज्ञ 20 डेमा, 50 डेमा, 100 डेमा, 200 डेमा या आकड्यांचा घोळ घालत निफ्टी थेट 20000 पर्यंत खाली जाण्याची भीती गुंतवणूकदारांना दाखवत होते.

मंदीवाले अशा बाह्या सरसावत असतानाच बाजाराने दुसर्‍याच दिवशी आपली कूस पालटली, हे आपण मागील लेखातच पाहिले. ‘मेरा नाम जोकर’मधील राजकपूर ‘दुनिया एक सर्कस आहे’ असे म्हणतो. त्याचप्रमाणे शेअर बाजार हीसुद्धा एक सर्कस आहे आणि या सर्कशीत

बडे को भी, छोटे को भी

खरे को भी, खोटे को भी

मोटे को भी, पतले को भी

नीचे से उपर को, ऊपर से नीचे को

बराबर आना, जाना पडता है।

इथे ‘बराबर’ हा शब्द महत्त्वाचा. परिस्थिती खरोखर सकारात्मक असेल म्हणजे महागाई नियंत्रणात येत असेल, बेरोजगारांची संख्या कमी होत असेल, इंडस्ट्रीयल मॅनेजर्स अधिक ‘परचे सिंग’ करत असतील, तर फेडरल रिझर्व्हकडून व्याज दर कमी होण्याच्या सुखद वार्ता बाजारात येणार आणि त्यामुळे तेजीचे वारे बाजारात वाहू लागणार.

मॉर्गन स्टॅन्लेच्या Emerging Markets World Index मध्ये एचडीएफसी बँकेचे वेटेज वाढणार असल्याच्या वार्तेने घसरणीला लागलेला हा शेअर मागील सहा महिन्यांपासून मंदगतीने का होईना वाढते आहे. परंतु, मागील आठवड्यात हे वेटेज एकाच टप्प्यात न वाढवता दोन टप्प्यांमध्ये वाढवण्यात येणार असल्याची खबर बाजाराला लागली आणि ‘जाये तो जाये कहाँ’ अशा मनःस्थितीत असणार्‍या बाजाराने खाली जाणे पसंत केले. एचडीफसी बँकेचा शेअर स्वतः तर तीन टक्के खाली गेलाच; शिवाय निफ्टीलाही खाली घेऊन गेला.

मागील सप्ताहात भारताच्या द़ृष्टीने एक महत्त्वाचा सर्व्हे रिपोर्ट प्रसिद्ध झाला. बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटीजने हा सर्व्हे केला. 59000 कोटी डॉलर्सचा एकत्रित AUM व्यवस्थापित करणार्‍या 220 प्रमुख फंड मॅनेजर्सची मते नोंदवली गेली. त्यानुसार गुंतवणुकीसाठी भारत हा जगातील क्रमांक दोनचा आकर्षक देश आहे. पहिल्या क्रमांकावर आहे. जपान, तैवान आणि कोरिया हे दोन देश, जे गेली काही वर्षे Investment Heavens होते, ते आता खाली गेले आहेत. शिवाय या सर्व्हेमधून आणखी एक बाब उघड झाली आहे आणि ती म्हणजे Consumption हा फॅक्टर भारताच्या शेअर बाजारातील तेजीचा प्रमुख भागीदार असणार आहे. आपल्याही लक्षात आले असेलच. गेले काही दिवस Consumotion Based The matic म्युच्युअल फंडस् उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. Nifity Consumption या इंडेक्सने मागील तीन महिन्यांत सव्वा तेरा टक्के रिटर्नस् दिले असून, सध्या हा इंडेक्स All time high च्या जवळपास टे्रड करतो आहे(11816.45).

सप्टेंबर महिन्यामध्ये अमेरिकेत Rate Cuts होतील, हे आता उघड होऊ लागले आहे. जगभरच्या बाजांरांसाठी तो एक बूस्टर ठरेल. भारतात तरी SIP गुंतवणूक द्वारा गुंतवणूक आणि नवीन डी-मॅट खाती उघडणार्‍यांची संख्या महिन्यागणिक नवनवीन विक्रम करते आहे. अशा वातावरणात निफ्टी 25000 चा आकडा पुन्हा लीलया पार करेल आणि मग FOMO ची तेजी सुरू होईल. Fear of Missing out. कही तेजी की गाडी छूट न जाये!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT