शेअर बाजारातील घसरणीचा टॉप ८ कंपन्यांना फटका बसला आहे.  (file photo)
अर्थभान

M-cap | बाजारातील घसरणीचा टॉप ८ कंपन्यांना फटका, १.६५ लाख कोटी गमावले

केवळ २ कंपन्यांच्या बाजार भांडवलात वाढ

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : शेअर बाजारातील कमकुवत ट्रेंडचा मोठा फटका टॉप कंपन्यांना बसला आहे. गेल्या आठवड्यातील बाजारातील घसरणीमुळे सर्वात मूल्यवान टॉप-१० कंपन्यांपैकी (M-cap of top 10 firms) ८ कंपन्यांनी १.६५ लाख कोटी रुपये बाजार भांडवल गमावले आहे. ज्या कंपन्यांचे बाजार भांडवल कमी झाले; त्यात एचडीएफसी बँक (HDFC Bank) आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चा समावेश आहे.

एचडीएफसी बँकेला मोठा फटका

देशातील सर्वात मोठी खासगी बँक एचडीएफसी बँकेचे एकूण बाजार भांडवल ४६,७२९.५१ कोटी रुपयांनी कमी होऊन १२,९४,०२५.२३ कोटी रुपयांवर आले आहे. तर देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँक SBI चे बाजार भांडवल ३४,९८४.५१ कोटी रुपयांनी कमी होऊन ते ७,१७,५८४.०७ कोटी रुपयांवर आले. हिंदुस्तान युनिलिव्हर (Hal) चे बाजार भांडवल २७,८३०.९१ कोटींनी कमी झाले. रिलायन्स इंडस्ट्रीजला (REL) २२,०५७ कोटींचा फटका बसला. यामुळे त्यांचे बाजार भांडवल १७,१५,४९८.९१ कोटींवर आले.

इन्फोसिसच्या बाजार भांडवलात वाढ

दरम्यान, इन्फोसिसचे (Infosys) बाजार भांडवलात १३,६८१.३७ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. तर टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेस (TCS) च्या बाजार भांडवल ४१६ कोटींनी वाढले आहे.

बाजार 'करेक्शन' मोडवर

बिझनेस टुडेच्या वृत्तानसार, गेल्या आठवड्यात बीएसई बेंचमार्क सेन्सेक्सने (BSE benchmark Sensex) १,९०६.०१ अंक गमावले, म्हणजेच तो २.३९ टक्क्यांनी घसरला. या वर्षी सप्टेंबरपर्यंत सेन्सेक्स आणि निफ्टी (Nifty) १८-२० टक्के रिटर्न देऊन तेजीत राहिले होते. पण कमकुवत संकेतांदरम्यान त्यांच्यात तीव्र यू-टर्न दिसून आला. त्यांच्यात उच्चांकावरून सुमारे १० टक्के घसरण झाली. यामुळे बाजाराने करेक्शन मोडमध्ये आला आहे. गुरुनानक जयंतीनिमित्त १५ नोव्हेंबरला बाजार बंद होता. नव्या उच्चांकावरून १० टक्के ते २० टक्क्यांपर्यंत घसरण होणे हा त्या निर्देशाकाचा अथ‍वा शेअर्सचा 'करेक्शन' टप्प्या मानला जातो.

FPI ची होल्डिंग्स १२ वर्षांच्या निचांकी पातळीवर

२०२४ मध्ये आत्तापर्यंत देशांतर्गत प्राथमिक आणि दुय्यम बाजारातून परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPI) एकत्रितपणे २,४१३ दशलक्ष डॉलर गुंतवणूक काढून घेतली आहे. FPI ची भारतीय शेअर्समधील गुंतवणूक अर्थात होल्डिंग्स गेल्या महिन्यात १२ वर्षांच्या निचांकी पातळीवर पोहोचली होती. परदेशी गुंतवणूकदारांनी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात २२,४२० कोटी रुपयांच्या देशांतर्गत शेअर्स विक्री केली. ऑक्टोबरमधील विक्रीचा आकडा ९४,०१७ कोटी रुपये एवढा होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT