Pay Income Tax Online  Online Pudhari
अर्थभान

Pay Income Tax Online | करदात्यांसाठी आनंदवार्ता! आता घरबसल्या तुम्हीच भरू शकता आयकर भरणा, जाणून घ्या कसे?

ई-पे टॅक्स पोर्टलमध्ये करदात्यांच्या माहितीची गोपनीयता आणि सुरक्षितता यावर विशेष भर दिला आहे.

shreya kulkarni

करदात्यांसाठी एक आनंददायक बातमी आहे. प्राप्तिकर विभागाने ‘ई-पे टॅक्स’ नावाची नवीन सुविधा सुरू केली असून, यामुळे आता कोणालाही सीए किंवा वकिलाची मदत न घेता स्वतःच सहज कर भरता येणार आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (CBDT) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही सुविधा नागरिकांना डिजिटल पद्धतीने सुलभतेने कर भरण्याची संधी देणारी आहे. CBDT च्या निवेदनात म्हटलं आहे की, "कर भरण्याच्या प्रक्रियेतून बँकांमधील रांगा, कंटाळवाणे फॉर्म भरण्याचा ताण दूर होईल

(Pay Income Tax Online)

ई-पे टॅक्स पोर्टलवर कोणते कर भरता येतील?

या पोर्टलवर इन्कम टॅक्स, अॅडव्हान्स टॅक्स, सेल्फ असेसमेंट टॅक्स, टीडीएस/टीसीएस, वस्तू आणि सेवा कर (GST), बँकिंग कॅश ट्रान्झॅक्शन टॅक्स (BCTT) यासारखे विविध कर भरता येतात.

ई-पे टॅक्स वापरण्याची प्रक्रिया:

incometax.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

incometax.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

‘e-pay tax’ या पर्यायावर क्लिक करा.

‘e-pay tax’ या पर्यायावर क्लिक करा.

तुमचा पॅन नंबर आणि आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर टाका.

तुमचा पॅन नंबर आणि आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर टाका.

OTP प्राप्त करून सुरक्षितपणे लॉगिन करा आणि तुमचा कर भरा.

OTP प्राप्त करून सुरक्षितपणे लॉगिन करा आणि तुमचा कर भरा.

प्राप्तिकर विभागाने सांगितले की, “या सुविधेमुळे वेळेवर कर भरण्याची सवय निर्माण होईल आणि व्यक्ती तसेच लघु उद्योजकांसाठी सहज डिजिटल पर्याय उपलब्ध होईल.”

   डिजिटल इंडिया दिशेने एक पाऊल पुढे

सरकारने सुरू केलेली ही ई-पे टॅक्स सुविधा ‘डिजिटल इंडिया’ या उपक्रमाचा महत्त्वाचा भाग मानली जात आहे. करदात्यांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम करून, कर प्रणालीत पारदर्शकता आणि कार्यक्षमता आणण्याचा सरकारचा उद्देश यातून स्पष्ट दिसून येतो. यामुळे विशेषतः लघु उद्योजक, नवउद्यमी आणि मध्यमवर्गीय व्यक्तींना कर भरण्याच्या प्रक्रियेमध्ये स्वयंपूर्णता मिळेल.

सुरक्षितता आणि पारदर्शक व्यवहारांची खात्री

ई-पे टॅक्स पोर्टलमध्ये करदात्यांच्या माहितीची गोपनीयता आणि सुरक्षितता यावर विशेष भर दिला आहे. या प्रक्रियेतून कोणत्याही मध्यस्थाची आवश्यकता नाही, त्यामुळे अनावश्यक खर्च टाळता येतो. प्रत्येक व्यवहाराची डिजिटल पावती मिळते, जी भविष्यातील पुराव्यासाठी उपयोगी ठरते. करदात्यांचा वेळ, पैसा आणि मनस्ताप वाचवण्यासाठी हे एक प्रभावी पाऊल आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT