दिवाळी निमित्त NSEच्या मुख्यालयाला करण्यात आलेली आकर्षक रोषणाई X
अर्थभान

संवत्सर २०८१चे धमाक्यात स्वागत; मुहूर्त ट्रेडिंगवर लक्ष्मी प्रसन्न

निफ्टी ऑटो, निफ्टी पीएसयु बँकने दिला सर्वाधिक लाभ

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय कालगणनेनुसार संवत्सर २०८१ची सुरुवात शुक्रवारी झाली. संवत्सरच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात एक तासाचा मुहूर्त ट्रेडिंग आयोजित करण्याची प्रथा आहे. यामध्ये सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी गुंतवणुकदारांना धनलाभ मिळवून दिला. सेन्सेक्स ७९७२४.१२ अंकांवर म्हणजेच ३३५.९६ ने वधारला. तर निफ्टी २४,२९९.५५ अंकांवर म्हणजेच ९४.२० अंकांनी वधारत बंद झाला.

मुर्हूत ट्रेडिंगमध्ये केलेली गुंतवणूक वर्षभर लाभ मिळवून देते असे मानले जाते. त्यामुळे गुंतवणुकदार आणि ट्रेडर्स या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये भाग घेतात. या सेशनमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स आणि मारुती सुझुकी या कंपन्यांचे शेअर्स वधारले. तर ग्रासिम आणि डॉ. रेड्डी या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली.

मुहूर्त ट्रेडिंगमध्ये सेक्टरनुसार निर्देशांक पाहिले तर निफ्टी ऑटो आणि निफ्टी पीएसयु बँक हे दोन निर्देशांक सर्वाधिक वधारले. निफ्टी आयटी, निफ्टी फर्मा, निफ्टी मीडिया या सर्वच निर्देशांकांनी मुहूर्त ट्रेडिंगमध्ये चांगली कामगिरी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT