Tata Motors Share After JLR Cyber Attack :
द फायनाशिअल टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार टाटा उद्योग समुहाची कंपनी जग्वार लँड रोव्हरवर सायबर अटॅक झाला आहे. त्यामुळं त्या कंपनीला जवळपास २ बिलियन युरोचा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. याचा फटका टाटा मोटर्सच्या शेअर्सना देखील बदला. त्याच्या शेअर्सची किंमत ही ३ टक्क्यांनी घसरली.
जग्वार अँड लँड रोव्हर कंपनी लॉकटॉन सोबतचा सायबर वीमा कराराला अंतिम रूप देण्यात यशस्वी झाली नाही. जर जग्वार अँड लँड रोव्हर कंपनीचं प्रोडक्शन सध्या बंद आहे. त्यामुळं कंपनीला जवळपास २ बिलियन युरोचा फटका बसू शकतो. जर हा फटका बसला तर हा आर्थिक फटका हा त्यांच्या २५ च्या आर्थिक वर्षात झालेल्या नफ्यापेक्षा हा मोठा असेल.
जग्वार अँड लँड रोव्हर कंपनीवर ऑगस्ट महिन्याच्या शेवटी सायबर हल्ला झाला होता. त्यामुळं त्यांना त्यांचं सर्व आयटी नेटवर्क बंद करावं लागलं होतं. याचा परिणाम त्यांच्या उत्पादन क्षमतेवर देखील झाला. ही समस्या पुढच्या महिन्यात म्हणजे सप्टेंबर मध्ये देखील संपली नाही. त्यामुळं त्यांचे कार उत्पादन बाधित झालं आहे.
जग्वार अँड लँड रोव्हरने त्यांची युकेमधील सोलीहुल, हालेवूड आणि वॉल्वरहाम्प्टन येथील उत्पादन पूर्वपदावर आलेलं नाही असं सांगितलं. इथलं कामकाज हे १ ऑक्टोबरपर्यंत सुरळीत होऊ शकत नाही असं बीसीसीनं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.
याबाबत कंपनीनं सांगितलं की, 'आमच्या ग्राहक, सप्लायर, सहकारी आणि आमचे रिटेलर्स यांना सपोर्ट करण्यावर आमचं लक्ष केंद्रीत केलं आहे.
जग्वार अँड लँड रोव्हर यांच्या ब्रिटनमध्ये तीन फॅक्टरी आहेत. यातून जवळपास १००० कार्सचं उत्पादन प्रत्येक दिवशी केलं जातं. कंपनीला गेल्या आठवड्यात ६८ मिलियन डॉलर्सचा फटका बसला आहे. कंपनीनं त्यांच्या ३३ हजार कर्मचाऱ्यांना घर थांबण्यास सांगितलं आहे. याचा फटका टाटा मोटर्सच्या शेअर्सवर देखील पडला. बुधवारी याची किंमत जवळपास ३ टक्क्यांनी घसरून ६८३ वर आली.