अर्थभान

कॅनरा रोबेको म्युच्युअल हायब्रीड फंड

Pudhari News

भरत साळोखे

कॅनरा बँक ही भारतातील सातव्या क्रमांकाची राष्ट्रीय बँक आहे. 113 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असणार्‍या या बँकेच्या दहा हजारांहून अधिक शाखा आहेत आणि जवळपास नऊ कोटी ग्राहक आहेत. अशा या बँकेने 1987 साली 'कॅनबँक म्युच्युअल फंड'ची स्थापना केली.

1929 पासून काम करणारी रोबेको ग्रुप ही नेदरलँड मधील जागतिक दर्जाची अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी आहे. 15 देशांमध्ये तिचा विस्तार आहे. कॅनबँक म्युच्युअल फंड आणि रोबेको 2007 साली एकत्र आले आणि त्यांनी 'कॅनरा रोबेको म्युच्युअल फंड'ची स्थापना केली. भारतामध्ये आज काम करणार्‍या अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपन्यांपैकी 'कॅनरा रोबेको म्युच्युअल फंड' ही एक दर्जेदार कंपनी आहे.

कॅनरा रोबेको इक्विटी हायब्रीड फंड कंपनीने 1 फेब्रुवारी 1993 रोजी स्थापन केली. 31 डिसेंबर 2020 रोजी फंडाचा AUM (Assets Under Management)  4170 कोटी रु. होता. स्थापनेपासून सरासरी 12.64 टक्के परतावा देणार्‍या या फंडाची गेल्या दहा वर्षांतील आर्थिक कामगिरी खालीलप्रमाणे आहे.

   1 वर्ष रिटर्नस् – 21.72 टक्के

   3 वर्षे रिटर्नस् – 12.91 टक्के

   5 वर्षे रिटर्नस् – 14.94 टक्के

   7 वर्षे रिटर्नस् – 16.79 टक्के

   10 वर्षे रिटर्नस् – 13.76 टक्के

Value Research या संस्थेचा 5 Star रेटिंगचा दर्जा सातत्याने मिळवणारा हा फंड आहे. 31 डिसेंबर 2020 रोजी फंडाचे Asset Allocation खालीलप्रमाणे होते.

   Equity – 73.71%

   Debt – 15.26%

   Other  – 11.03%

इक्विटीपैकी बहुतेक सर्व गुंतवणूक ही Giant कंपन्यांमध्ये आहे. फंडाचे खालील Top 10 Holding पाहिले तर ही गोष्ट लक्षात येईल.

1) HDFC Bank, 2) Infosys, 3) ICICI Bank, 4) Reliance Industries, 5) Axis Bank, 6) TCS, 7) HDFC, 8) Bajaj Finance, 9) Hindustan Unilerer, 10) HCL Tech.

फंडाची गुंतवणूक Giant कंपन्यांमध्ये असल्यामुळे Domside Risk खूपच कमी आहे. त्यामुळे कमी जोखीम हवी असणार्‍या ज्येष्ठ नागरिकांसाठी हा अगदी योग्य फंड आहे. आपण गेल्या काही लेखांमधून नियमित मासिक डिव्हीडंड देणार्‍या फंडाची माहिती घेत आहोत. हा फंडही नियमितपणे मासिक डिव्हीडंड देतो. 2020सालातील या फंडाची ऊर्ळींळवशपव कळीीेीूं खालीलप्रमाणे आहे.

मागील आठवड्याच्या लेखात डिव्हीडंडचे Calculation कसे होते आणि गुंतवणूकदारांना वार्षिक किती टक्के दराने परतावा मिळतो, ते आपण पाहिले होते. या फंडाच्या निमित्ताने आपण परत एकदा ते Calculation करून पाहू!

फंडाने 29-01-2021 रोजी Per Unit 73 पैसे डिव्हीडंड जाहीर केला. त्यावेळी फंडाची NAV Rs. 82.31 होती. म्हणजे एका युनिटची किंमत रु. 82.31 आणि एका युनिटला 73 पैसे डिव्हीडंड टक्केवारीमध्ये डिव्हीडंडचे प्रमाण पाहिले, तर रु. 82.31 गुंतवणुकीमागे 73 पैसे म्हणजे 0.89 टक्के Dividend Yield होते आणि महिन्याला 0.89 टक्के म्हणजे वर्षाला 10.68 टक्के रिटर्नस् होतात. या नियमित बँकेपेक्षा अधिक मासिक प्राप्‍तीबरोबर तुमची भांडवल वृद्धीही होते.

बँकेपेक्षा अधिक मासिक परतावा शिवाय भांडवल वृद्धी! म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा हा मोठा लाभ आहे. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT