बाजारात बूल्स-बेअर्सचा संघर्ष Pudhari File Photo
अर्थभान

बाजारात बूल्स-बेअर्सचा संघर्ष

डिसेंबरअखेर बाजार वरती येण्याची शक्यता अत्यंत कमी

पुढारी वृत्तसेवा
भरत साळोखे, संचालक, अक्षय प्रॉफिट अँड वेल्थ प्रा. लि.

सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी 24800 चा भक्कम आधार तोडून निफ्टी 24567 पर्यंत घरंगळला तेव्हा वाटले आता निफ्टी 24000 पर्यंत खाली जाणार; परंतु 24500 चा सायकॉलॉजीकल आधार तुटणे सहजासहजी शक्य नाही. 24800 च्या वरती क्लोजिंग देऊन निफ्टीने गुंतवणूकदारांच्या जीवात जीव आणला खरा; परंतु डिसेंबरअखेर बाजार वरती येण्याची शक्यता अत्यंत कमी आहे, असेच तज्ज्ञांचे मत आहे. याला एक नाही अनेक कारणे आहेत. ती खालीलप्रमाणे...

पाच नोव्हेंबर 2024 रोजी यूएस प्रेसिडेंट निवडणूक आहे. ही तारीख जसजशी जवळ येत आहे तसतशी भारतीय आणि अमेरिकन बाजारातील अनिश्चितता वाढत आहे. मध्यपूर्वेतील संघर्ष थांबण्याचे अद्याप नाव नाही. त्यामुळे कू्रड ऑईलच्या दराबाबत साशंकता आहे. महाराष्ट्र राज्याची विधानसभा निवडणूकही नोव्हेंबर महिन्यात आहे. त्यामुळे DIIS आणि Retail Investors नी हात आखडता घेतला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयामागील अकरा आठवड्यांतील नीचांक दाखवत आहे (रु. 84.0725). तो आता All Time Low (84.0750) अगदी जवळ आहे. FIIS नी भारतातून शेअर्स विक्रीचा मारा सुरू ठेवल्यामुळे डॉलरची मागणी वाढली आहे आणि सर्वात महत्त्वाचे कारण जे गेल्या दोन दिवसांत प्रकर्षाने समोर आले आहे ते म्हणजे दुसर्‍या तिमाहीतील कसोटीला न उतरणारे कॉर्पोरेट रिझल्टस्!

गेले वर्षभर 100 टक्के रिटर्न देऊन गुंतवणूकदारांची चांदी करून देणारा बजाज ऑटोचा शेअर गुरुवारी 11 टक्के कोसळला. कारण होते खराब तिमाही निकाल शिवाय भविष्यातील कंपनीबद्दलचे व्यवस्थापनाचे मार्गदर्शनही बाजाराला आवडले नाही. इन्फोसिस, विप्रो, एचसीएल टेक यांनी उत्कृष्ट निकाल दिले तिथे टीसीएसने निराशा केली. एचडीएफसी लाईफ बँक ऑफ महाराष्ट्र, टाटा कंझ्यूमर यांनी उत्तम निकाल दिले अर्निंगज् आणि नेट प्रॉफीटमध्ये वाढ होऊनसुद्धा हॅवेल्सचे निकाल अ‍ॅनालिस्टस्च्या अंदाजापेक्षा खालीच राहिले. BEML या सरकारी कंपनीला बुलेट टे्रनचे 867 कोटींचे कान्ट्रॅक्ट मिळाले. त्यामुळे हा शेअर आठवड्यात पावणे आठ टक्के वाढला (रु. 4033). आनंदा राठी या ब्रोकरेज फर्मने हा शेअर त्यांचा Diwali Pick म्हणून जाहीर केला आहे. यादीतील झिंक, ज्युपिटर वॅगन्स, आयआरबी इन्फ्रा, टाटा टेक्नॉलॉजीज Diffusion Engineers Ltd. चा शेअर सप्ताहात 35 टक्के वाढला. (सध्याचा भाव रु. 338.20) 26 सप्टेंबर रोजी तो मार्केटमध्ये लिस्ट झाला तेव्हा त्याची इश्यू प्राईस होती 168 रुपये. केवळ 15 दिवसांत तो 66 टक्के वाढला आहे. याच सेक्टरमधील एक आघाडीची कंपनी Heg हिचा शेअर 18 ऑक्टोबर रोजी 1:5 या प्रमाणात Split झाला. (सध्याचा भाव रु. 500) वेल्डिंग प्रॉडक्टस् बनवणार्‍या या कंपन्या आहेत. Esab India Ltd. ही दर्जेदार कंपनी याच क्षेत्रातील तिचा सध्याचा भाव आहे रु.6534 आणि 52 Week High आहे. रु. 6999 ROCE 76 टक्के ROE 57 टक्के, पाच वर्षांची सरासरी प्रॉफीट ग्रोथ 23 टक्के अशी कमालीची असून ही कर्जमुक्त कंपनी आहे. सातत्याने नफा मिळविणार्‍या आणि डिव्हिडंड देणार्‍या या कंपनीच्या शेअर्समध्ये FIIS प्रत्येक तिमाहीमध्ये खरेदी वाढवत आहेत.

निफ्टी आणि सेन्सेक्स हे दोन प्रमुख निर्देशांक गेल्या आठवड्यात रेड झोनमध्ये राहिले, तरी निफ्टी बँक माल निफ्टी बँक, निफ्टी बँक, निफ्टी PSU बँक आणि निफ्टी फायनान्शिअल हे निर्देशांक तेजीत राहिले. आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, अ‍ॅक्सिस बँक या तिन्ही महत्त्वाच्या बँकांचे शेअर्स तेजीत राहिले. कर्ज वितरणात वाढ, नेट NPA अर्धा टक्क्याच्याही खाली, नेट इंटरेस्ट मार्जिनमध्ये सातत्याने वाढ या बाबींच्या जोरावर हा शेअर रु. 2000 कडे आणि कंपनी रु. 90 लाख कोटींच्या मार्केटकडे अगदी दमदारपणे वाटचाल करत आहे. आपल्या पोर्टफोलीओमध्ये अवश्य असावा, असा हा आवश्यक शेअर बनला आहे. निफ्टी फायनान्शिअल तेजीत राहिला तो HDFC AMC HDFC BANK आणि HDFC Life Insurance या त्रयींमुळे बजाज फायनान्स आणि बजाज फिनसर्व्ह हे अजूनही घुटमळतच आहेत. दिवाळीच्या तोंडावर त्यांच्यामध्ये बहार येण्याची अपेक्षा आहे.

Motilal Oswal FSL चा शेअर सप्ताहात 26 टक्के वाढला. 1064 च्या विक्रमी पातळीवर तो पोहोचला. 23 जुलै 2024 रोजी हा शेअर रु.508.65 ला मिळत होता. तीन महिन्यांच्या आत तो दुप्पट झाला. Angel one, Cams, CDSL, BSF, Ananal Rathi, KF in Technologies या सर्व शेअर्सची मागील सहा महिन्यांतील कामगिरी पाहा. 2030 पर्यंत भारतीय शेअर बाजार कुठवर पोहोचेल, याची साधारण कल्पना येण्यास त्याची मदत होईल. एका आठवड्यात पडझड, FIIS ची विक्री या गोष्टी ‘किस झाड की पत्ती’ आहेत. सात टक्के GDP Growth असणारी जगामध्ये भारताशिवाय दुसरी कोणती अर्थव्यवस्था आहे?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT