भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDAI) विमा क्षेत्रातील एक क्रांतीकारी पाऊल उचलले आहे. 'बीमा सुगम' नावाचे एक डिजिटल पोर्टल नुकतेच सुरू करण्यात आले आहे. हे पोर्टल 'विकसित भारत २०२७' आणि 'प्रत्येकासाठी विमा २०२७' या सरकारी उद्दिष्टांशी जोडलेले आहे.
हा पोर्टल महत्त्वाचा का आहे?
आजच्या डिजिटल युगात आपल्याला अनेक सेवा एकाच क्लिकवर मिळतात. पण विम्याच्या बाबतीत परिस्थिती वेगळी होती. वेगवेगळ्या कंपन्यांच्या पॉलिसी तपासणे, त्यांची तुलना करणे आणि क्लेमची प्रक्रिया करणे हे खूप गुंतागुंतीचे काम होते. यावर तोडगा म्हणून IRDAI ने 'बीमा सुगम' हे पोर्टल सुरू केले आहे. हे पोर्टल लाइफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स आणि जनरल इन्शुरन्स या सगळ्या गरजा एकाच ठिकाणी पूर्ण करेल.
आता विमा घेणे, क्लेम करणे आणि पॉलिसी समजून घेणे सोपे होईल!
हा पोर्टल ग्राहकांना अधिक सशक्त बनवेल, त्यांना योग्य माहिती देऊन योग्य निर्णय घेण्यास मदत करेल. आता विम्याची प्रक्रिया पारदर्शक, सोपी आणि जलद होईल. 'बीमा सुगम' हे पोर्टल विम्याला एका मोठ्या लोकसंख्येसाठी उपलब्ध करून देईल. 2047 पर्यंत प्रत्येक भारतीयाला विमा कवरेज मिळावे, या सरकारी उद्दिष्टाकडे हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.
'बीमा सुगम' चे फायदे काय?
सर्व कंपन्या एकाच छताखाली: हे पोर्टल विविध विमा कंपन्यांना एकाच डिजिटल मंचावर आणते. यामुळे ग्राहकांना एकाच ठिकाणी सर्व कंपन्यांच्या पॉलिसी तपासता येतील आणि त्यांची तुलना करता येईल.
तुलना करणे सोपे: तुम्हाला लाइफ, हेल्थ किंवा जनरल इन्शुरन्स पॉलिसी घ्यायची असेल, तर तुम्ही वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रीमियम, फायदे आणि अटी यांची सहज तुलना करू शकता. यामुळे तुम्ही तुमच्या गरजेनुसार आणि बजेटनुसार योग्य पॉलिसी निवडू शकता.
पेपरलेस प्रक्रिया: पॉलिसी घेणे, प्रीमियम भरणे आणि क्लेम सेटलमेंटची संपूर्ण प्रक्रिया आता डिजिटल होणार आहे. यामुळे कागदपत्रांचा वापर कमी होऊन वेळ आणि श्रम वाचतील.
क्लेम सेटलमेंट सोपे: क्लेम सेटलमेंट ही विम्याची सर्वात मोठी डोकेदुखी असते. पण 'बीमा सुगम' पोर्टलवर तुम्ही फक्त पॉलिसी नंबर टाकून क्लेमची स्थिती तपासू शकता. यामुळे पारदर्शकता वाढेल आणि क्लेमची प्रक्रिया जलद होईल.
वन-स्टॉप सोल्युशन: हे पोर्टल केवळ ग्राहकांसाठीच नाही, तर विमा कंपन्या, एजंट्स आणि इतर मध्यस्थांसाठीही उपयुक्त आहे. त्यांना एकाच ठिकाणी काम करण्याची सुविधा मिळेल, ज्यामुळे बाजारपेठेत सुलभता येईल.
सुरक्षा आणि विश्वास: या पोर्टलमध्ये वापरकर्त्यांच्या माहितीच्या सुरक्षिततेवर विशेष भर दिला आहे. त्यामुळे तुमच्या सर्व माहितीची सुरक्षितता सुनिश्चित केली जाईल.