Stock Market  Pudhari
अर्थभान

Stock Market Prediction: बिहारमध्ये NDA आघाडीवर! एक्झिट पोलचा शेअर बाजारावर काय परिणाम होणार? कोणते शेअर्स वाढणार?

Bihar Exit Poll Results 2025: बिहार निवडणुकीच्या एग्झिट पोल निकालांनुसार NDAला स्पष्ट बहुमताचे संकेत मिळाले आहेत. तज्ज्ञांच्या मते या निकालांचा भारतीय शेअर बाजारावर मर्यादित परिणाम होईल.

Rahul Shelke

Stock Market Prediction, Bihar Exit Poll Results 2025 impact:

बिहार विधानसभा निवडणुकीच्या 2025च्या एग्झिट पोल निकालांमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) स्पष्ट बहुमत मिळण्याचे संकेत दिसत आहेत. बहुतेक सर्व सर्वेक्षणांनी जसे पीपल्स पल्स, JVC आणि मॅट्रिझ यांनी भाजपा-जनता दल (युनायटेड) सत्तेत येईल असे दाखवले आहे, तर राजद–काँग्रेस महागठबंधन मागे पडल्याचं चित्र आहे. या राजकीय वातावरणाचा भारतीय शेअर बाजारावर (Nifty) किती परिणाम होईल, यावर बाजारतज्ज्ञांनी आपली मते मांडली आहेत.

NDAच्या विजयाचे संकेत

काल मंगळवारी 11 नोव्हेंबर रोजी सायंकाळी जाहीर झालेल्या एग्झिट पोल्सनुसार, बिहारमध्ये NDAला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता आहे.

  • पीपल्स पल्सच्या अंदाजानुसार NDAला 133 ते 159 जागा आणि 46.2% मते मिळू शकतात.

  • JVC एग्झिट पोलने NDAला 135–150, तर महागठबंधनाला 88–103 जागा दिल्या आहेत.

  • मॅट्रिझ आणि दैनिक भास्कर यांच्या सर्व्हेमध्ये NDAला 145–167 जागांदरम्यान बहुमताचा अंदाज आहे.

या अंदाजांवरून असं दिसतं की नीतीश कुमार आणि भाजपाच्या नेतृत्वाखालील NDA पुन्हा सत्तेत येण्याच्या उंबरठ्यावर आहे.

शेअर बाजारावर काय परिणाम होणार?

राजकीय विश्लेषक आणि मार्केट तज्ज्ञांच्या मते, या निकालांचा भारतीय शेअर बाजारावर फारसा परिणाम होणार नाही. कारण गुंतवणूकदारांनी NDAच्या विजयाची शक्यता आधीच गृहित धरली आहे. मंगळवारी संध्याकाळी गिफ्ट निफ्टी फ्लॅट ट्रेडिंग करत होता, ज्यामुळे बाजारात मोठी हालचाल अपेक्षित नाही, असे संकेत मिळत आहेत.

तज्ज्ञांचे मत

सेबी नोंदणीकृत मार्केट तज्ज्ञ विपिन डिक्सेना म्हणाले की, “बिहार एग्झिट पोलचे निकाल गुंतवणूकदारांसाठी राजकीय स्थैर्याचे संकेत आहेत, पण ते बाजाराच्या वाढीसाठी निर्णायक ठरणार नाहीत.” त्यांच्या मते, एग्झिट पोलचा प्रभाव भावनिक (sentimental) स्वरूपाचा असेल, पण बाजाराची दिशा ग्लोबल मार्केट, कॉर्पोरेट निकाल आणि परदेशी गुंतवणुकीच्या प्रवाहांवर अवलंबून राहील.

डिक्सेना पुढे म्हणाले, “जर अंतिम निकाल एग्झिट पोलपेक्षा वेगळे आले, तर काही काळासाठी बाजारात हलकी रिएक्शन दिसेल; पण दीर्घकालीन परिणाम होणार नाही.” जर एग्झिट पोल बरोबर ठरले, तर स्थिर सरकारचा मेसेज बाजारासाठी सकारात्मक ठरेल.

कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार?

जर NDA पुन्हा सत्तेत आली, तर बिहारमधील गुंतवणूक, पायाभूत सुविधा आणि ग्रामीण विकासाशी संबंधित कंपन्यांकडे बाजाराचं लक्ष राहील. या क्षेत्रातील प्रकल्पांना केंद्र सरकारकडून प्रोत्साहन मिळण्याची शक्यता आहे.

गुंतवणूकदारांचे लक्ष कुठे?

या वर्षी निफ्टीने जागतिक बाजारांच्या तुलनेत चांगली कामगिरी केली नाही, यामागे मुख्य कारण म्हणजे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची (FIIs) सततची विक्री. आगामी काळात बाजाराची दिशा महागाईचे दर, कंपन्यांचे तिमाही निकाल, ट्रम्प टॅरिफ आणि जागतिक व्यापार करारावर अवलंबून राहील.

नोंद : या लेखातील माहिती केवळ शैक्षणिक उद्देशाने दिली आहे. कोणताही गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT