जान्हवी शिरोडकर
गुंतवणुकीची सुरुवात करणे ही खूप महत्त्वाची आणि जबाबदारीची पायरी असते; पण अनेक जणांना पैसे कुठे गुंतवायचे, कसे वाढवायचे आणि जोखीम कशी कमी करायची, हे कळत नाही. अशा वेळी मार्गदर्शनासाठी पुस्तकांचा आधार घेणे, हे अत्यंत उपयुक्त ठरते.
आज आर्थिक नियोजन, गुंतवणूक, शेअर बाजार यासंदर्भातील असंख्य पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. यातील जगभरात लोकप्रिय ठरलेली काही पुस्तके विविध गुंतवणूक पद्धती उलगडून सांगतानाच दीर्घकालीन (सक्रिय) गुंतवणूक, अल्पकालीन (सक्रिय) व्यापार, स्टॉक निवड, मूल्यांकन, मानसिकता, आर्थिक शिस्त आणि अधिक फायदेशीर निर्णय कसे घ्यावे, याबाबत मार्गदर्शन करतात. नवशिक्यांसाठी ती समजायला सोपी असून, अनुभवी गुंतवणूकदारांसाठीही ती बौद्धिक संपत्ती ठरतात.
द इंटेलिजंट इन्व्हेस्टर
लेखक : बेंजामिन ग्रॅहम
द सायकोलॉजी ऑफ मनी लेखक - मॉर्गन हॉउझेल
रिच डॅड पुअर डॅड
लेखक : रॉबर्ट कियोसाकी
कॉमन स्टॉक्स अँड अनकॉमन प्रॉफिटस् ः लेखक ः फिलीप फिशर
वन अप ऑन वॉल स्ट्रीट
लेखक : पीटर लिंच
द वॉरेन बफेट वे
लेखक : रॉबर्ट जी. हॅगस्ट्रॉम
द लिटल बुक ऑफ कॉमन सेंस इन्व्हेस्टिंग ः लेखक ः जॉन बोगल
द धंदो इन्व्हेस्टर
लेखक : मोनिश पब्राई
व्हॉट एव्हरी इंडियन शुड नो बिफोर इन्व्हेस्टिंग : विनोद पोट्टायल
गाईड टू इंडियन स्टॉक मार्केट : डॉ. अनिल लाम्बा
ही पुस्तके वाचून आपल्याला योग्य दिशेने विचार करता येईल. चांगल्या कंपन्या ओळखता येतील आणि आपल्या आर्थिक स्वप्नांची पूर्तता करता येईल.