राजेश शहा, प्रवर्तक, एस. पी. वेल्थ, कोल्हापूर
अल्गो ट्रेडिंग (Algorithmic Trading) म्हणजे संगणकीय प्रोग्राम्स व अल्गोरिदम्स वापरून शेअर बाजारात स्वयंचलितपणे खरेदी-विक्रीचे व्यवहार करणे. हे अल्गोरिदम्स बाजारातील डेटा (किंमत, व्हॉल्यूम, इ.) विश्लेषण करून ठरावीक नियमांनुसार ऑर्डर्स देतात, ज्यामुळे जलद आणि अचूक ट्रेडिंग शक्य होते.
अल्गोरिदमिक ट्रेडिंग ही वेळ, किंमत आणि व्हॉल्यूम यासारख्या गोष्टींचा विचार करून स्वयंचलित पूर्व-प्रोग्राम केलेल्या ट्रेडिंग सूचना वापरून ऑर्डर अंमलात आणण्याची एक पद्धत आहे. या प्रकारच्या ट्रेडिंगमध्ये मानवी हस्तक्षेपच्या तुलनेत संगणकांचा वेग आणि संगणकीय संसाधने वापरण्याचा प्रयत्न केला जातो.
अल्गोरिदमिक ट्रेडिंग हे गुंतवणूक बँका, पेन्शन फंड, म्युच्युअल फंड आणि हेज फंडांद्वारे मोठ्या प्रमाणात वापरले जाते, ज्यांना मोठ्या ऑर्डरची अंमलबजावणी करावी लागू शकते किंवा manual traders ना प्रतिसाद देण्यासाठी खूप जलद व्यवहार करावे लागू शकतात. इक्विटी, फ्युचर्स, क्रिप्टो आणि परकीय चलन बाजारात अल्गोरिदमिक ट्रेडिंगचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
1 ऑगस्ट 2025 पासून, सेबीने किरकोळ गुंतवणूकदारांना अधिकृतपणे अल्गो ट्रेडिंग करण्यास परवानगी दिली आहे. याआधी ही सुविधा प्रामुख्याने संस्थात्मक गुंतवणूकदारांपुरती मर्यादित होती. या बदलामुळे आता किरकोळ गुंतवणूकदारांना Transparent and Rule based Security चा वापर करून ट्रेड करणे सोपे होणार आहे.
सेबीच्या नवीन नियमांनुसार (1 ऑगस्ट 2025 पासून), किरकोळ गुंतवणूकदार आता अल्गो ट्रेडिंग वापरू शकतात. यासाठी त्यांना Brokers मार्फत अल्गो मंजूर करून नोंदणी करावी लागेल. त्यासाठी अल्गोचा प्रोग्राम हा स्वतः बनवता येईल किंवा थर्ड पार्टीकडून तयार करून घेता येईल.
अल्गोरिदमिक ट्रेडिंगच्या तांत्रिक प्रगतीमुळे निष्पक्षता आणि बाजार समतेशी संबंधित गंभीर नैतिक आव्हाने येतात. या तंत्रज्ञानाची असमान प्रवेश ही मुख्य चिंता आहे. अल्गोरिदमिक ट्रेडिंगच्या अग्रगण्य प्रकारांपैकी एक, उच्च-फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग, अल्ट्रा-फास्ट नेटवर्क्स, को-लोकेटेड सर्व्हर्स आणि लाइव्ह डेटा फीडस्वर अवलंबून आहे, जे फक्त हेज फंडस्, इन्व्हेस्टमेंट बँका आणि इतर वित्तीय संस्थांसारख्या मोठ्या संस्थांसाठी उपलब्ध होते. यांच्या प्रवेशामुळे बाजारपेठेतील सहभागींमध्ये एक दरी निर्माण झाली होती, ती या नवीन नियमामुळे किरकोळ गुंतवणूकदारांना या प्रणालींच्या गती आणि अचूकतेशी जुळवून घेता येऊ शकेल.
व्हाईट-बॉक्स अल्गो : पारदर्शक व नियमाधारित; मंजुरी सोपी. (सर्वसाठी ओपेन)
ब्लॅक-बॉक्स अल्गो : गुप्त किंवा पेटंटधारित; (सेबीचे रिसर्च अॅनालिस्ट (RA) लायसन्स आवश्यक)
ओव्हरफिटिंग स्ट्रॅटेजीज मागील डेटावर काम करू शकतात; परंतु वास्तविक बाजारपेठेत अपयशी ठरू शकतात. तांत्रिक बिघाड कनेक्टिव्हिटी, किंवा चुकीची माहिती, किंवा चुकीच्या प्रोग्रॉममुळे मोठे नुकसान होऊ शकते. मोठ्या प्रमाणातील ट्रेड (लार्ज वॉल्यूम) अल्गोमुळे शेअर्सच्या किमतींवर मोठा परिणाम होऊ शकतो. अचानक काही बातम्या किंवा काही मोठे व लहान बदल लगेच विचारात घेतले जाऊ शकत नाहीत. त्यामुळे मोठे नुकसान होऊ शकते.
हा अल्गो तुमच्या ब्रोकर्समार्फत शेअर बाजाराकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल. मंजुरी मिळाल्यावर, तो तुमच्या ट्रेडिंग खात्याशी जोडला जाईल. अल्गो मंजूर आणि नोंदणीकृत असावा.
जर अल्गो स्वतःसाठी वापरत असाल, तर काही अडचण नाही. पण, जर तो दुसर्यांना विकायचा असेल किंवा थर्ड पार्टीचा अल्गो वापरवयाचा असेल, तर सेबी आणि ब्रोकरची परवानगी गरजेची आहे.
SEBI Registered Advisors (RA), यांचे पूर्णपणे स्वयंचलित अल्गो (Auto Algo) किरकोळ गुंतवणूकदार वापरू शकतात.
तुमच्या अल्गोला ब्रोकरकडून युनिक आयडी मिळेल, ज्यामुळे सेबी आणि एक्सचेंज तुमचे व्यवहार ट्रॅक करू शकतील.
API वापरताना 2FA Authentication आणि IP address यासारख्या सुरक्षा उपायांचे पालन करावे लागेल. अल्गोरिदमिक ट्रेडिंग प्रोग्राम केलेल्या कोडवर आधारित ट्रेड घेण्यासाठी आणि बंद करण्यासाठी संगणक सॉफ्टवेअर आणि वित्तीय बाजारपेठा एकत्र आणते. किरकोळ गुंतवणूकदार जसे नोकरदार वर्ग, विद्यार्थी, व्यावसायिक, गृहिणी यांना ट्रेड कधी घ्यायचा किंवा बंद करायचा हे सूचना ते सेट करू शकतात व आपला अनमोल वेळ वाचवून आपली उत्तुंग आर्थिक भरारी करू शकतात.
समजा, तुम्ही किरकोळ गुंतवणूकदार आहात आणि तुम्हाला HDFC BANK चा शेअर खरेदी-विक्री करायचा आहे. या साठी अल्गो तयार करावयाचा किंवा वापरावयाचा असेल, तुम्ही एक साधा अल्गो बनवू शकता, जो खालील नियमांवर काम करतो :
जर HDFC BANK ची किंमत 50-दिवसांच्या मूव्हिंग अॅव्हरेजपेक्षा 2% कमी झाली, तर 100 शेअर्स खरेदी कर.
जर किंमत 5% वाढली, तर सर्व शेअर्स विक.
हा अल्गो तुम्ही Python किंवा Brokers च्या API वापरून तयार करू शकता.
ट्रेडिंग प्रक्रिया :
अल्गो बाजार डेटाचे सतत विश्लेषण करेल आणि नियमांनुसार स्वयंचलितपणे ऑर्डर्स देईल.
उदाहरणार्थ, HDFC BANK ची किंमत
रु. 2000 वरून रु. 1960 (2% घसरण) झाली, तर अल्गो 100 शेअर्स खरेदी करेल. नंतर किंमत रु.2058 (5% वाढ) झाली, तर अल्गो शेअर्स विकेल.
या सर्व तांत्रिक गोष्टी किरकोळ गुंतवणूकदारासाठी प्रथम दर्शनी अवघड आहेत; परंतु नवीन तंत्रज्ञान (AI-ALGO) याचा वापर करून आपले भविष्यातील ट्रेडिंग एकदम सोपे व सोयीस्कर होईल. भविष्यात हे तंत्रज्ञान वापर करून ट्रेड नाही केले, तर तो या बाजारामधून बाहेर फेकला जाऊ शकतो, असे काही तज्ज्ञ ब्रोकर्स लोकांचे म्हणणे आहे.
(हा लेख केवळ शैक्षणिक माहितीसाठी दिला आहे. गुंतवणूक करताना आपल्या सल्लागाराला विचारून गुंतवणूक करावी.)
वेगवान - मानवी वेगापेक्षा जास्त (मिलिसेकंड मध्ये ट्रेड)
अचूकता - ऑर्डर प्लेसमेंटमध्ये मॅन्युअल चुका कमी करते.
बॅकटेस्टिंग - मागील ऐतिहासिक डेटावर ट्रेडची तपासणी केली जाऊ शकते.
शिस्त - मानवी भावनिक त्रुटी टाळता येतात.
कमी खर्च - मानवी हस्तक्षेप कमी करून खर्च कमी करता येतो.
24/7 बाजाराचे निरीक्षण आणि ट्रेडिंग शक्य आहे.
Pairs trading
Delta-neutral strategies
Arbitrage
Scalping Market timing
Order Slicing
Price Band
Trend Following Strategies