१ मे पासून 'एटीएम' व्यवहार महागणार! Pudhari Photo
अर्थभान

१ मे पासून 'ATM' व्यवहार महागणार, जाणून घ्या काय आहेत नवे नियम!

ATM charges hike 2024 | रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केले नियमांत बदल

करण शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : आता एटीएममधून पैसे काढणे आणि बॅलन्स तपासणे थोडे महाग होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने एटीएम इंटरचेंज फी वाढवण्यास मान्यता दिली आहे. अशा परिस्थितीत, १ मे पासून, रोख रक्कम काढण्यासारख्या आर्थिक व्यवहारांसाठी शुल्क २ रुपयांनी वाढेल आणि शिल्लक तपासणीसारख्या गैर-आर्थिक व्यवहारांसाठी शुल्क १ रुपयांनी वाढेल. म्हणजेच आता रोख रक्कम काढण्याचे इंटरचेंज शुल्क १७ रुपयांवरून १९ रुपये आणि शिल्लक तपासणीचे शुल्क ६ रुपयांवरून ७ रुपये होईल.

या बदलांचा परिणाम लहान बँकांवर जास्त होणार आहे, विशेषतः ज्या बँकांचे स्वतःचे लहान एटीएम नेटवर्क आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हाईट-लेबल एटीएम ऑपरेटर्सनी शुल्क वाढवण्याची मागणी केली होती. कारण जुन्या शुल्कामुळे त्यांचे कामकाज चालवणे कठीण होत होते. अशा परिस्थितीत, स्वतःवरील भार कमी करण्यासाठी, बँका शुल्क वाढवून ग्राहकांकडून त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न करु शकतात.

इंटरचेंज फी म्हणजे काय?

एटीएम इंटरचेंज फी म्हणजे एका बँकेने दुसऱ्या बँकेला एटीएम वापरताना दिलेले शुल्क. हे शुल्क व्यवहाराचा भाग असतात आणि बहुतेकदा ग्राहकाच्या बिलात जोडले जातात. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने १३ मार्च रोजी बँकांना या बदलाची माहिती दिली होती. NPCI ने शुल्क वाढवण्यासाठी RBI कडून परवानगी मागितली होती, ज्याला आता हिरवा कंदील मिळाला आहे.

आता काय आहेत नियम?

सध्या, महानगरांमध्ये, जर ग्राहक इतर बँकांचे एटीएम वापरतात, तर त्यांना दरमहा ५ मोफत व्यवहार मिळतात. तर नॉन-मेट्रो भागात ही मर्यादा ३ व्यवहार आहे. यानंतर, प्रत्येक व्यवहारावर शुल्क आकारले जाते. आता, शुल्क वाढल्याने, लहान बँकांचा खर्च आणखी वाढेल, कारण त्यांच्या ग्राहकांना इतर बँकांच्या एटीएमचा वापर करावा लागतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT