नवी दिल्ली : असंघटित क्षेत्रातील 40 वर्षांपर्यंत वयाच्या कामगारांना प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेमध्ये सहभागी होण्याची संधी येत्या 15 फेब्रुवारीपासून मिळणार आहे. दरमहा 3 हजार रुपयांचे निवृत्तीवेतन देण्याच्या या योजनेची घोषणा अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात केली होती. 15 हजारांपर्यंत मासिक उत्पन्न असणार्या असंघटित कामगारांसाठी ही विशेष योजना आखण्यात आली असून पुढील पाच वर्षांत 10 कोटी कामगारांना तिचा फायदा होईल, असे अर्थमंत्री पियूष गोयल अर्थसंकल्प सादर करताना म्हणाले होते.