Amazon Refund Scam pudhari
अर्थभान

Amazon Refund Scam: रिफंड स्कॅमर गँगचा अमेझॉनला गंडा... टेलिग्रामवरून चालवायचे खास स्कीम, कोट्यावधी रूपयांचा लावला चुना

Anirudha Sankpal

Amazon Refund Scam: ऑनलाईन शॉपिंग अॅपवरून रिफंड मिळवणं सामान्य माणसासाठी कधी कधी डोकेदुखी ठरत असते. मात्र याच ऑनलाईन शॉपिंग अॅप्सना रिफंडच्या मार्फात कोट्यावधी रूपयाचा गंडा घालण्यात आला आहे. जगातील सर्वात मोठी ई कॉमर्स कंपनी अमेझॉनला एका स्कॅमरच्या ग्रुपने जवळपास ३८ कोटी रूपयांचा (४ मिलियन डॉलर्स) गंडा घातला आहे. यात ग्राफिक कार्ड आणि लॅपटॉप सारख्या उत्पादनांच्या रिफंडमार्फत हा स्कॅम करण्यात आला आहे.

आता या प्रकरणी अमेझॉनने वॉशिंग्टन डीसी कोर्टात RBK नावाच्या एका ग्रुपवर आरोप केला आहे की त्यांनी जी उत्पादने कधी परतच आली नाहीत त्याच्या नावावर कोट्यावधी रूपयांचा रिफंड मिळवला आहे. RBK नावाची हा ग्रुप अमेझॉनच्या ग्राहकांना विक्री संदर्भातील सेवा पुरवत होता त्यांनी रिफंड फ्रॉड देला आहे. जी उत्पादने डिलिव्हरच झाली नाहीत त्याचा रिफंड या कंपनीने इश्यू केला. हा ग्रुप अमेझॉनला युएस, कॅनडा, युरोप आणि इतर ठिकाणी देखील टार्गेट करत होता.

अमेझॉनच्या या तक्रारीत डिआस झुमानियाझ, मायकल बुशेल्ट आणि अदनान इस्लाम यांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर २० अज्ञात लोकांचा देखील अमेझॉनने केलेल्या तक्रारीत उल्लेख आहे.

कसा झाला हा स्कॅम?

न्यायालयात दाखल केलेल्या केसमध्ये अमेझॉन म्हणते की rbk ने आपली रिफंड सर्व्हिस ही टेलिग्राम अॅप द्वारे प्रमोट केली. याद्वारे त्यांनी जवळपास १००० पेक्षा जास्त सब्स्क्रायबर मिळवले. आपबीकेने २१०० पेक्षा जास्त वापरकर्त्यांचे अमेझॉन रिफंड व्हाऊचर दाखवले. फेब्रुवारी २०२३ पासून आरबीकेने अमेझॉन रिफंडचे जवळपास ३८ कोटी रूपयांपेक्षा जास्त रूपयाचे व्हाऊचर्स फाईल केले. अमेझॉनच्या तक्रारीत आरबीकेने टेलेग्राम पोस्टसाठी अमेझॉनचे नाव आणि लोगोचा देखील वापर केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

तक्रारीत म्हटल्याप्रमाणे आरबीके युजर्स हे अमेझॉनमधून काही वस्तू खरेदी करत होते. त्यानंतर ते टेलिग्राम अॅप द्वारे या ग्रुपला संपर्क करायचे आणि त्यांचे अमेझॉन लॉग इन इन्फॉर्मेशन शेअर करायचे. त्यानंतर आरबीके त्यांना ऑर्डरवर १५ ते ३० टक्के रक्कम चार्ज करत होती. त्यानंतर ते ग्राहक असल्याचा बनाव करत कस्टमर सर्व्हिसला संपर्क करून जी शिपमेंट आली आहे ती रिकाम्या पॅकेजसह आली आहे असा दावा करत होते.

अमेझॉन दावा करते की आरबीके कस्टमर सपोर्टला धोका देण्यासाठी मिसिंग पॅकेजचे फेक पोलीस रिपोर्ट देखील इतर सोशल इंडिनिअरिंग टेक्निकचा वापर करून दाखवत होते.

अमेझॉनने कशी पकडली चोरी?

अमेझॉनचा तपासकर्त्याने तो आरबीकेच्या सर्व्हिसेससाठी इच्छुक असल्याचा बनाव केला. त्या तपासकर्त्याने १९९ डॉलर्सचे प्ले स्टेशन खरेदी केलं. त्यानंतर प्रोडक्ट डिलिव्हर झाल्यानंतर त्याने आरबीकेला १०० बिटकॉईनमध्ये पेमेंट केलं. तपासकर्त्याने नंतर सांगितलं की त्याला आरबीकेकडून रिफंड मिळाला आहे. तपासकर्त्याने अमेझॉनच्या कस्टमर केअरला त्याला प्रोडक्ट मिळालेलं नाही असं सांगत पोलीस रिपोर्टची देखील कॉपी दाखवली.

विशेष म्हणजे कंपनीच्या तपासकर्त्याला आरबीके टेलिग्राप चॅनलवरील व्हिडिओ आणि फोटेवरून पत्रव्यवहाराचा पत्ता आणि फोन नंबर हा कझाकिस्तान मधील दिआस झुमानियाझचा असल्याचं आढळून आलं. तो या स्कॅमर ग्रपचा अॅडमिनिस्ट्रेटर होता असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे.

अमेझॉनने तपासासाठी मोजली मोठी किंमत

अमेझॉनने आपल्या तक्रारीत सांगितलं की त्यांनी या घोटाळ्याचा तपास करण्यासाठी तब्बल ७५ हजार डॉलर ( जवळपास ७० लाख रूपये) खर्च केले आहेत. आता अमेझॉनने झालेलं नुकसान भरपाई आणि रिफंडचे पैसे तसेच या कोर्ट केससाठी आलेला खर्च मिळावा अशी मागणी केली आहे. तसेच अमेझॉनने आरोपींना टेलिग्राम किंवा अमेझॉन ट्रेडमार्क वापरण्यास देखील बंदी घालावी अशी मागणी कोर्टाकडे केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT