8th Pay Commission Update pudhari
अर्थभान

8th Pay Commission Update: बेसिक पगारातच महागाई भत्ता समाविष्ट होणार, ८ व्या वेतन आयोगाकडून आनंदाची बातमी मिळणार?

Anirudha Sankpal

8th Pay Commission Update: आठवा वेतन आयोग जसजशी १८ महिन्यांची डेटलाईन जवळ येत आहे तसतशी अॅक्शन मोडमध्ये आला आहे. आठव्या वेतन आयोगात आता रिपोर्ट तयार करण्याच्या हालचालींना वेग आला असून कर्मचारी संघटनांसोबत बैठकी सुरू आहेत. त्यातच आता चेन्नई आणि पदुचेरीमधील कर्मचारी संघटनांसोबत आयोगाने चर्चा केली आहे. या बैठकीत केंद्रीय कर्मचारी संघटनांनी अनेक मागण्या केल्या आहेत. त्यातील महागाई भत्ता अर्थात डीए बेसिक परागात समाविष्ट करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

नेमकी मागणी काय?

केंद्र यरकारच्या मुख्य कर्मचारी संघटनांनी शिफारस केली आहे की ज्यावेळी डीए २५ टक्क्यापेक्षा जास्त होईल त्यावेळी तो डीए मूळ वेतनात समाविष्ट करण्यात यावा. ही मागणी नॅशन काऊन्सील, जॉईंट कंसल्टेटिव्ह मशनरी, ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशन आणि ऑल इंडिया न्यू पेन्शन स्कीम एम्प्लॉईज फेडरेशन यांनी केली आहे. AINPSEF यांनी डीए बेसिक सॅलरीत मर्ज केल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात अपेक्षेप्रमाणे वेगाने वाढ होऊ शकते.

AINPSEF च्या म्हणण्यानुसार डीए बेसिक सॅलरीत मर्ज केल्यानं सॅलरी वेगाने वाढेल आणि कर्मचाऱ्यांना चांगली सॅलरी हाईक मिळवण्यासाठी १० वर्षे वाट पहावी लागणार नाही. AINPSEF ने सांगितलं की या मर्जिंगमुळे खासकरून खालच्या स्तरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना चांगला फायदा होणार आहे. यांचा पगार कमी असतो अन् मोठ्या शहरात रहात असताना खर्च जास्त असतो. भारतीय रेल्वे पर्यवेक्षक संघाने आणि प्रगतिशील शिक्षक न्याय मंचाने डीए ५० टक्के झाल्यावर तो बेसिक पे मध्ये मर्ज करण्यात यावा असा सल्ला दिला आहे.

पगाराचे उदाहरण

NC-JCM ने आठव्या वेतन आयोगाला दिलेल्या आपल्या मेमोरेंडममध्ये ज्यावेळी डीए २५ टक्क्याच्या पार जाईल त्यावेळी त्याला बेसिक पे मध्ये मर्ज केलं जावं. उदाहरण म्हणून घ्यायचं झालं तर एखाद्या कर्मचाऱ्याचा बेसिक पे १८,००० रूपये असेल. जर आठव्या वेतन आयोगाचा फिटमेंट फॅक्टर २.१ लागू झाला तर १ जानवारी २०२६ ला त्यांची सुधारित मूळ सॅलरी ही ३७,८०० रूपये होईल. जर कर्मचाऱ्याला वर्षाला सरासरी ४ टक्के डीए हाईक मिळत असेल तर आणि वर्षाला मिळणारी वाढ ७ टक्क्यांवर पोहचली तर १ जानेवारी २०३३ मध्ये त्या कर्मचाऱ्याची ग्रॉस सॅलरी ही (बेसिक पे अधिक डीए) जवळपास ७७ हजार ६९४ रूपये होईल. ही सुधारीत ३७ हजार ८०० बेसिक पे पेत्रा १०६ टक्क्यांनी अधिक आहे.

मात्र इथं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की डीए बेसिक पेमध्ये मर्ज करण्याला सरकारची परवानगी मिळालेली नाहीये. तसेच २.१ फिटमेंट फॅक्टर वर्षाला ७ टक्के पगारवाढ आणि ४ टक्के डीए वाढ या गोष्टी देखील उदाहरण म्हणून घेण्यात आल्या आहेत. ती आकडेवारी अंदाजे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT