आरोग्य

X-ray of teeth: दातांचा एक्सरे का गरजेचा?

backup backup

वर वर पाहिल्याने दाताच्या खोलवर समस्या कळत नाहीत. दातांचा एक्स-रे काढल्याने दातांच्या काही समस्या असतील तर त्या लगेच समजण्यासाठी दंतवैद्याला मदत होते. अर्थातच तो कधी आणि किती वेळा काढावा हे सर्वस्वी दातांच्या स्थितीवर अवलंबून असते.
काही लोकांना दर सहा महिन्यांनी दाताचा एक्स-रे काढावा लागतो. नियमित दंतवैद्यांकडे जातात त्यांना दाताचा एक्स-रे काढण्याची गरज लागत नाही. डेंटल एक्स-रेमुळे सामान्य डोळ्यांना दिसणार नाही अशा जागेत असणारी कीड दिसू शकते. दोन दातांमध्ये असणारी कीड, हिरड्यांसंबंधी त्रास, दातांमध्ये संसर्ग या सर्व दातांशी निगडित समस्यासुद्धा या एक्स-रेतून जाणून घेता येतात. एवढेच नाही तर ट्यूमरच्या काही प्रकारांचा शोधही लागतो.

डेंटल एक्स-रे काढून दंतवैद्यांकडे गेल्यास त्यांना आपल्या दातांची प्राथमिक माहिती मिळेल. ही माहिती भविष्यात उपचार केल्यानंतर झालेल्या बदलांशी तुलना करण्यासाठी वापरता येईल. बहुतेकदा, हिरड्यांची समस्या असेल तरीही डेंटल एक्स-रे करण्याचा सल्ला दिला जातो. ही गोष्ट प्रत्येक वयाच्या व्यक्‍तीला लागू होते.

मुलांच्या दातांचा एक्स-रे कधी काढावा?

मुलांचे दात खूप जास्त किडत असतील तर प्रत्येक सहा महिन्यांमध्ये दातांचा एक्स-रे काढावा. जेणेकरून पुन्हा दातात कीड लागत असेल तर तिचा प्रतिबंध करता येईल. तसेच किशोरवयीन मुलांनीही दर 6 ते 12 महिन्यांच्या कालावधीमध्ये डेंटल एक्स-रे करून घ्यावा.
दातांचे किडणे ही सामान्य समस्या असली तरीही वर्ष-दोन वर्षांत एकदा डेंटल एक्स-रे काढणे हिताचे ठरते. डेंटल एक्स-रेचे हे फायदे असले तरी ऊठसूट तो काढणे चुकीचे आहे. लहान-मोठ्या समस्या एक्स-रे न काढताही उपचार केल्या जाऊ शकतात.

डॉ. निखिल देशमुख

SCROLL FOR NEXT